बारामतीत मुसळधार पाऊस

दमदार पावसाने कऱ्हा नदी वाहू लागली
दमदार पावसाने कऱ्हा नदी वाहू लागली

पुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या तालुक्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी (शनिवारी) दमदार पाऊस पडला. बारामती तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. वडगाव निंबाळकर येथे सर्वाधिक १२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 

शनिवारी बारामती तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. वडगाव निंबाळकरसह माळेगाव येथे ११८ मिलिमीटर, बारामतीत ९०, पणदरे येथे ६० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद महसूल विभागाकडे झाली आहे. या पावसाने रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले. दुष्काळी भागातील ओढे खळाळून वाहिले. या भागातील जलसंधारणाच्या कामांमध्ये भरपूर पाणी जमा झाले. या पाण्यामुळे या भागातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. भोर, मावळ, जुन्नर, आंबेगाव, इंदापूर, दौंड, पुरंदर या तालुक्यातही चांगला पाऊस पडला. यामुळे पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळणार असून, उर्वरित पेरण्यांनाही वेग येणार आहे.  

रविवारी (ता. २१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये : (स्रोत - महसूल विभाग) : थेऊर १८, पिरंगुट १५, भोर २८, नसरापूर २९, किकवी २७, आंबवडे २६, निगुडघर २३, वडगाव मावळ १७, कार्ला १५, खडकाळा ३७, शिवणे १५, जुन्नर २३, नारायणगाव २९, डिंगोरे २८, आपटाळे १५, ओतूर ५८, कुडे ३५, घोडेगाव १५, आंबेगाव (डिंभे) २९, कळंब १६, पारगाव २०, मंचर २१, शिरूर ३०, बारामती ९०, माळेगाव ११८, पनदरे ६०, वडगाव १२७, मोरगाव २५, उंडवडी १५, भिगवण २०, लोणी ३२, सणसर ५७, देऊळगाव राजे ३५, पाटस ५५, कडेगाव २९, वरवंड २५, रावणगाव ५६, कुंभारवळण १६, जेजुरी ३७. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com