Agriculture news in Marathi, Heavy rain in crop damage | Agrowon

अतिवृष्टीनंतर आता धुक्‍याचे संकट 
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

महाळुंगे पडवळ, जि. पुणे : आंबेगाव तालुक्‍यातील महाळुंगे पडवळ, साकोरे, चास, लौकी, कळंब आदी ३० गावांत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडत असलेल्या धुक्‍यामुळे भाजीपाला पिकांवर करपा, तांबेरा, डाउनी, भुरी रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उत्पादनखर्चात वाढत आहे. अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. 

महाळुंगे पडवळ, जि. पुणे : आंबेगाव तालुक्‍यातील महाळुंगे पडवळ, साकोरे, चास, लौकी, कळंब आदी ३० गावांत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडत असलेल्या धुक्‍यामुळे भाजीपाला पिकांवर करपा, तांबेरा, डाउनी, भुरी रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उत्पादनखर्चात वाढत आहे. अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. 

शेतकऱ्यांनी बटाटा, टोमॅटो, कारली, कांदा, सोयाबीन, बीट, काकडी, दोडका, आले आदी प्रमुख पिके घेतली आहेत. गेल्या १५ दिवसांपूर्वी चास, साकोरे, महाळुंगे पडवळ परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसात अनेक सखल भागातील पिके सडून गेली आहेत. परंतु पाण्याचा निचरा झालेल्या जागेतील पिके पावसातून वाचली आहेत, त्यातच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सकाळी आठ ते नऊपर्यंत पडत असलेल्या धुक्‍यामुळे पिकांवर रोगराईचे प्रमाण वाढले आहे. धुके असताना आणि धुके निवळताना दवबिंदूच्या स्वरूपात जमा होणारे पाणी पिकांच्या नासाडीस कारणीभूत ठरत आहे. 

‘‘लौकी येथे दोन एकर क्षेत्रात बटाटा लागवड केली आहे. नुकत्याच मुसळधार पावसातून पीक वाचविण्यात यश आले. परंतु दोन दिवसांपासून पडत असलेल्या धुक्‍यामुळे १० ते १५ टक्के बटाट्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे,’’ अशी माहिती शेतकरी अशोक थोरात यांनी दिली.

धुके पडल्यामुळे पिकांवर करपा व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. अन्नद्रव्ये शोषण प्रक्रिया मंदावून झाडांचे नुकसान होते. प्रादुर्भाव झालेली पिके आढळून आल्यास शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या. 
-टी. के. चौधरी, तालुका कृषी अधिकारी, आंबेगाव 
 

इतर ताज्या घडामोडी
वाशीम जिल्ह्यात रब्बीत होणार एक लाख...वाशीम : जिल्ह्यात या रब्बी हंगामासाठी एक लाख...
खानदेशातील बाजारांमध्ये ज्वारीची आवक...जळगाव : अतिपावसामुळे खानदेशात ज्वारीचे आतोनात...
कापूस वेचणीला परप्रांतीय मजुरांचा आधारअकोला : अकोट तालुक्यातील ग्राम तरोडा व परिसरात...
अमरावती जिल्ह्यात २४५० कोटींचे नुकसानअमरावती : मॉन्सुनोत्तर पावसामुळे जिल्ह्यात तीन...
नाशिक जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवर...नाशिक : ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे जिल्ह्यातील...
 बारामती उपविभागात ४३ हजार हेक्टरवरील...पुणे ः मॉन्सूनोत्तर पावसाने बारामती...
मराठवाड्यात ४१ लाख ४९ हजार हेक्टरवरील...औरंगाबाद  : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील ४१...
पुणे बाजार समितीत ‘आंबेमोहर’च्या दरात...पुणे  ः आंबेमोहर तांदळासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी...सोलापूर  ः कोरड्या आणि ओल्या दुष्काळामुळे...
नगर : रब्बी ज्वारीचा १ लाख ९१ हजार...नगर  ः मॉन्सूनोत्तर पाऊस जोरात झाला असला तरी...
सातारा जिल्ह्यात रब्बीची १३ टक्के...सातारा  : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत...अर्धापूर, जि. नांदेड  : शेतकऱ्यांच्या...
शिवसेनेची गुरुवारी तुरंबे येथे ऊस परिषदकोल्हापूर  : येत्या गळीत हंगामासाठी ऊस दर...
आंदोलनाचा दणका; केळी पीकविमा...अकोला  ः २०१८-१९ या वर्षात केळी उत्पादक...
ऊस दराबाबत आज कोल्हापुरात बैठककोल्हापूर : यंदाच्या ऊस दरावर सकारात्मक तोडगा...
शिवसेनाप्रमुखांचा आज स्मृतिदिनमुंबई  : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा...
पीकविम्यासाठी पुण्यात चौथ्या दिवशीही ...पुणे  ः गेल्या वर्षीचा खरीप पीकविमा न...
औरंगाबादमध्ये कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
ढगातील हिमकणांच्या निर्मितीची प्रक्रिया...एकत्रित प्रकारच्या ढगांमध्ये हवेच्या उभ्या...
किमान तापमानात घसरण, थंडीला सुरुवातमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा...