Agriculture news in Marathi, heavy rain Damage to vegetable crops in Ambegaon taluka | Agrowon

आंबेगाव तालुक्यात तरकारी पिकांचे नुकसान
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

महाळुंगे पडवळ, जि. पुणे : आंबेगाव तालुक्‍यात दहा ते १२ दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे कोबी, फ्लॉवर, मेथी, कोथिंबीर आदी भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा सर्वाधिक फटका लौकी, कळंब, चास, महाळुंगे पडवळ आदी गावांतील शेतकऱ्यांना बसला आहे. 

महाळुंगे पडवळ, जि. पुणे : आंबेगाव तालुक्‍यात दहा ते १२ दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे कोबी, फ्लॉवर, मेथी, कोथिंबीर आदी भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा सर्वाधिक फटका लौकी, कळंब, चास, महाळुंगे पडवळ आदी गावांतील शेतकऱ्यांना बसला आहे. 

पावसामुळे सूर्यदर्शन होत नाही, तसेच दररोज कोसळत असलेल्या सरींमुळे पिकांमध्ये पाणी साचल्याने कोबी, फ्लॉवर, मिरची, टोमॅटो, मेथी, कोथिंबीर आदी पिके सडू लागली आहेत. तसेच, किडीचा उपद्रव वाढला आहे. मार्च ते एप्रिलदरम्यान टोकन पद्धतीने लागवड केलेल्या भुईमूग पिकाची काढणीची कामे रखडली आहेत. वेळेत काढणी न झाल्यास भुईमूगाच्या शेंगांना जमिनीतच मोड येण्याची शक्‍यता आहे. पाऊस जर असाच सुरू राहिला, तर भुईमूग शेंगाचे नुकसान होऊन भुईमूग पीक वाया जाण्याचा धोका आहे, असे रामचंद्र थोरात, आदिनाथ थोरात व राजाराम थोरात यांनी सांगितले. 

कळंब येथील शेतकरी संजय कानडे व आकाश 
अर्जुन कानडे यांच्या एक एकर क्षेत्रातील फ्लॉवर पिकात पाणी साचत असल्याने पीक सडू लागले आहे. त्यांनी बियाणे, खते, औषधे असा एकूण पन्नास हजार रुपये खर्च केला होता. सततच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास या निसर्गाने हिरावून घेतला आहे. प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, माजी सभापती वसंतराव भालेराव व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद कानडे यांनी केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली,...उस्मानाबाद : मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद...
धुळे : कांदा दरप्रश्‍नी शेतकरी संघटनेचे...धुळे  ः कांद्याचे दर बऱ्यापैकी वाढल्याने...
शिराळा तालुक्यात भाताचे उत्पादन २०...सांगली : शिराळा पश्‍चिम भाग हा भातपिकाचे माहेरघर...
शेतकऱ्यांना दरवर्षी दहा हजार देणारच :...इस्लामपूर, जि. सांगली  : ‘‘ गेल्या पाच...
उत्पादन खर्चावर आधारित दर हवेत :...भारत हा शेतीप्रधान देश असे आपण म्हणत असतो. मात्र...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारच : उध्दव...सोलापूर : ‘‘शिवसेना बोलते ते करते, आम्ही...
अकोला जिल्ह्यात शासनाच्या हमीभाव...अकोला ः शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळवून...
पीकविम्याबाबत असुरक्षिततेचीच भावना...केंद्र सरकारने मोठा गाजा-वाजा करीत जाहीर केलेल्या...
`चासकमान`मधील आवर्तन तब्बल ८९...चास, जि. पुणे  ः चासकमान (ता. खेड) धरणातून...
पाण्याची कार्यक्षमता वाढविण्यावर भर...आपला देश सध्या आर्थिक संकटातून जात आहे. हे संकट...
परभणीत सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यातील यंदाच्या रब्बी हंगामातील...
पाच जिल्ह्यात पीकविमा योजनेत ४५ लाख ९०...लातूर : खरीप हंगाम २०१९ मध्ये लातूर,...
नांदेड : पावसात भिजल्यामुळे पिकांचे...नांदेड : गेल्या आठवड्यात नांदेड, परभणी, हिंगोली...
जळगावात कोबी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
नारळ बागेत आंतरपिके फायदेशीरसुरवातीच्या काळात नारळ बागेत भाजीपाला, केळी, अननस...
मेहकर तालुक्यात कृषी कर्मचाऱ्यांनी...अकोला ः मेहकर तालुक्यात यावर्षी समाधानकारक...
खामगावात टेक्सटाइल पार्क होणारच ः...बुलडाणा  ः तरुणांना रोजगार उपलब्ध करून...
खारपाण पट्ट्यात रब्बीत हजार हेक्टरवर...अकोला  ः जिल्ह्यात असलेल्या खारपाण पट्ट्यात...
जळगाव जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रांत...जळगाव  ः जिल्ह्यात शासकीय हमीभाव कडधान्य व...
वाघाच्या दहशतीखालील गावे टाकणार...वर्धा  ः कारंजा घाडगे तालुक्‍यातील अनेक...