संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल असेंब्लीच्या ७४ व्या अधिवेशनात २०२१ हे ‘आंतरराष्ट्रीय फळे आणि भाजीप
ताज्या घडामोडी
पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीग्रस्तांना ४५० कोटींचे वितरण
पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी ५१६ कोटी ९५ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून, त्यापैकी ४४९ कोटी ५१ लाखांचे वितरण पूर्ण केले आहे. तसेच, उर्वरित अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने द्यावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. तसेच शेतजमिनींच्या दुरुस्तीसाठी रोहयोअंतर्गत मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. गोऱ्हे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे विभागातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘पुणे विभागातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. जुलै-ऑगस्ट २०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले, त्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना ३८९ कोटी ३५ लाख रुपये देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली. ही अनुदानाची रक्कम प्राप्त झालेली नाही. पडझड झालेल्या घरांच्या भरपाईसाठी २२० कोटी ३६ लाख रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे, त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.’’
ऑक्टोबरमध्ये अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या भरपाईची रक्कम देण्यासाठी ५२५ कोटी ६८ लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी केली, त्यापैकी पहिल्या टप्प्यात दीडशे कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्याचे पूर्ण वितरण झाले. पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे शेतजमीन आणि बंधाऱ्यांचे नुकसान झाले. नरेगांतर्गत बंधारे दुरुस्तीसाठी केंद्राला प्रस्ताव पाठविला आहे. शेतजमिनीच्या दुरुस्तीसाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत मदत करण्यात येणार आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठिकाणे हलविणार
वारी मार्गांवर सातत्याने होणारे अपघात टाळण्यासाठी या मार्गांवरील विविध घाटांमधील धोकादायक ठिकाणे हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या. या ठिकाणी मजबूत संरक्षक कठडे बसविण्यात येणार आहे. यामध्ये कात्रज घाट, सातारा रस्ता, बोपदेव घाट, दिवे घाटासह अन्य ठिकाणींचा समावेश आहे. तसेच, आळंदी विकास आराखडा, जेजुरी गड, एकवीरादेवी, मांढरदेवी यांसह अन्य देवस्थानांच्या ठिकाणी रस्त्यांची कामे आणि सुविधा देण्याचे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी या वेळी दिले.
- 1 of 1029
- ››