Agriculture news in Marathi heavy rain damaged crop producer take 450 crore distribute | Page 3 ||| Agrowon

पश्‍चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीग्रस्तांना ४५० कोटींचे वितरण

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

पुणे ः पश्‍चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी ५१६ कोटी ९५ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून, त्यापैकी ४४९ कोटी ५१ लाखांचे वितरण पूर्ण केले आहे. तसेच, उर्वरित अनुदानाची रक्‍कम शेतकऱ्यांना तातडीने द्यावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. तसेच शेतजमिनींच्या दुरुस्तीसाठी रोहयोअंतर्गत मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे ः पश्‍चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी ५१६ कोटी ९५ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून, त्यापैकी ४४९ कोटी ५१ लाखांचे वितरण पूर्ण केले आहे. तसेच, उर्वरित अनुदानाची रक्‍कम शेतकऱ्यांना तातडीने द्यावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. तसेच शेतजमिनींच्या दुरुस्तीसाठी रोहयोअंतर्गत मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. गोऱ्हे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे विभागातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘पुणे विभागातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. जुलै-ऑगस्ट २०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले, त्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना ३८९ कोटी ३५ लाख रुपये देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली. ही अनुदानाची रक्कम प्राप्त झालेली नाही. पडझड झालेल्या घरांच्या भरपाईसाठी २२० कोटी ३६ लाख रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे, त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.’’

ऑक्‍टोबरमध्ये अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या भरपाईची रक्कम देण्यासाठी ५२५ कोटी ६८ लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी केली, त्यापैकी पहिल्या टप्प्यात दीडशे कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्याचे पूर्ण वितरण झाले. पश्‍चिम महाराष्ट्रात पुरामुळे शेतजमीन आणि बंधाऱ्यांचे नुकसान झाले. नरेगांतर्गत बंधारे दुरुस्तीसाठी केंद्राला प्रस्ताव पाठविला आहे. शेतजमिनीच्या दुरुस्तीसाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत मदत करण्यात येणार आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठिकाणे हलविणार
वारी मार्गांवर सातत्याने होणारे अपघात टाळण्यासाठी या मार्गांवरील विविध घाटांमधील धोकादायक ठिकाणे हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या. या ठिकाणी मजबूत संरक्षक कठडे बसविण्यात येणार आहे. यामध्ये कात्रज घाट, सातारा रस्ता, बोपदेव घाट, दिवे घाटासह अन्य ठिकाणींचा समावेश आहे. तसेच, आळंदी विकास आराखडा, जेजुरी गड, एकवीरादेवी, मांढरदेवी यांसह अन्य देवस्थानांच्या ठिकाणी रस्त्यांची कामे आणि सुविधा देण्याचे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी या वेळी दिले.


इतर ताज्या घडामोडी
साखर उद्योगाच्या इंडोनेशियाकडून अपेक्षा...कोल्हापूर : निर्यातीसाठी महत्त्वाचा देश असणाऱ्या...
दूध, मांस, अंडी, लोकर उत्पादनवाढीसाठी...मुंबई  : राज्यात दूध, अंडी, मांस व लोकर...
थकीत एफआरपीसाठी साखर सहसंचालक...नांदेड : एफआरपीनुसार ऊस देयकाची रक्कम एकरकमी...
कृषी सहसंचालकपदाचा पदभार तात्पुरता...पुणे  : राज्याच्या ‘पोकरा’ प्रकल्पाचे कृषी...
शेतकरी अपघात विमा योजनेत कुटुंबातील...सोलापूर ः शासनाने शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे...
अकोल्यात शनिवारपासून महाराष्ट्र सिंचन...अकोला  ः  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत करडईचा पेरा घटलानांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली या...
सोलापूर ‘झेडपी’चे कृषी, पशुसंवर्धनच्या...सोलापूर : जिल्हा परिषदेतील चार विषय समिती...
सिल्लोडमध्ये प्रात्यक्षिकांतून लष्करी...पळशी ता. सिल्लोड : मका पिकावर लष्करी अळीचा...
हरितगृहामध्ये आर्द्रता कमी करण्यासोबत...हरितगृहामध्ये वातावरण नियंत्रणासाठी सातत्याने...
शेतकऱ्यांच्या वाटेत विमानतळाचा अडथळाजळगाव : नाइट लॅंडिंगसाठी विमानतळावरील धावपट्टीचे...
शासकीय विभागांना निधी खर्चाची ३१ मार्च...सातारा : पाच महिने निवडणुकीच्या आचारसंहितेत...
सिंचन आवर्तनांचे योग्य नियोजन करा :...नाशिक : ‘‘विभागातील रब्बी व उन्हाळा हंगामांसाठी...
खानापुरातील द्राक्ष निर्यातीच्या...सांगली : जिल्ह्यातून निर्यातक्षम द्राक्षासाठी...
‘गाव तिथे काँग्रेस’ अभियान राबविणार ः...मुंबई : राज्यात काँग्रेस पक्षसंघटना मजबूत...
परभणी जिल्ह्यात महसूल मंडळे अधिसूचित...परभणी : जिल्ह्यातील महसूल मंडळांची पुनर्रचना...
अशी करा पपईची लागवडपपई लागवड वर्षभर मुख्यत्वे जून-जुलै, सप्टेंबर-...
नियोजन कलिंगड लागवडीचेकलिंगड लागवडीसाठी हलकी, पोयट्याची, वालुकामय,...
नवीन द्राक्ष बागेमध्ये रिकट घेण्याचा काळसध्या वातावरण कमी होत असून, काही ठिकाणी ढगाळ...
हिंगोली जिल्ह्यात ज्वारीवर लष्करी अळीचा...हिंगोली : जिल्ह्यातील रब्बी ज्वारीवर अमेरिकन...