अतिवृष्टी बाधितांना एकरी ५० हजार रुपये भरपाई द्या

heavy rain damaged farmer demand per acres 50 thousand Compensation
heavy rain damaged farmer demand per acres 50 thousand Compensation

पुणे ः अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली. संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना सोमवारी (ता. २) दिले. 

या वेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव महादेव मातेरे, प्रशांत धुमाळ, संदीप लहाने पाटील, प्रमोद धुमाळ, सपना माळी, सुनीता भगत, वंदना मोडक, दीपाली कवडे, रोहिणी सावंत आदी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे म्हणाले, की पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केलेले आहे. या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा पंचनामा पीकविमा कंपन्या व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून व्यवस्थित पाहणी झालेली नाही. 

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. खरिपात भात, मका, ऊस, फुले, सोयाबीन, तूर, कांदा, बाजरी, द्राक्ष, कापूस, उडीद, फळ, फळ उत्पादन व भाजीपाला पिकांचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले होते. मात्र, अतिवृष्टीने भोर, वेल्हा, मुळशी, हवेली, मावळ, पुरंदर, जुन्नर, इंदापूरसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात वादळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com