पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस

पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस
पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस

पुणे  ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. तसेच, उन्हाच्या चटक्यात वाढ झाली. परंतु, शुक्रवारी (ता. ४) अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. जुन्नर तालुक्यातील निमगाव येथे ५९ मिमी पावसाची नोंद झाली. 

शुक्रवारी (ता. ४) सकाळपासूनच उन्हाचा चटका वाढला होता. दुपारनंतर अचानक ढग जमा होऊन दुपारी तीन वाजेपासून जिल्ह्याच्या काही भागांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्यास सुरवात झाली. अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. 

हवेली तालुक्यातील भोसरी, चिंचवड येथे सर्वाधिक ४५ मिमी पाऊस झाला. खडकवासला येथे २६, कोथरूड येथे १६, खेड शिवापूर येथे १७, वाघोली येथे १२, कळस येथे ११ मिमी पावसाची नोंद झाली. थेऊर, उरूळी कांचन, केशवनगर, हडपसर येथेही हलका पाऊस झाला. मुळशीतील घोटावडे येथे १५ मिमी पाऊस झाला. माले येथे पाच मिमी पावसाची नोंद झाली. भोरमध्ये १९, किकवी येथे १७, वेळू येथे १४, संगमनेर येथे १२, नसरापूर येथे १० मिमी पावसाची नोंद झाली. भोलावडे, निगुडघर येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. मावळमधील लोणावळा येथे १८, कार्ला येथे २ मिमी पावसाची नोंद झाली. वडगाव मावळ, तळेगाव, काळे कॉलनी, खडकाळा, शिवणे या परिसरात हवामान ढगाळ होते.  जुन्नरमधील डिंगोरे येथे २६, ओतूर येथे १८, जुन्नर येथे १४, बेल्हे येथे १४, वडगाव आनंद येथे ११ मिमी पाऊस झाला.

नारायणगाव, आपटाळे येथे हलका पाऊस झाला. खेडमधील राजगुरुनगर परिसरात २८.१ मिमी पावसाची नोंद झाली. कन्हेरसर येथे २२, कडूस येथे २३ मिमी पावसाची नोंद झाली. चाकण, आळंदी, शेळपिंपळगाव, वाडा परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. आंबेगावमधील घोडेगाव येथे ४२, मंचर येथे १६, आंबेगाव येथे ८ मिमी पाऊस झाला. शिरूरमधील रांजणगाव येथे ३५, पाबळ येथे २२, शिरूर येथे १७, कोरेगाव, मलठण येथे १५, न्हावरा येथे १२ मिमी पावसाची नोंद झाली.

बारामतीतील दुष्काळग्रस्त असलेल्या मोरगावमध्ये ५५ तर लोणी भापकर येथे २३, सुपा येथे १८ मिमी पावसाची नोंद झाली. इंदापुरातील काटी येथे ३३, अंथुर्णे येथे ३०, निमगाव केतकी येथे १६ मिलिमीटर पाऊस झाला. भिगवण आणि सणसर येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. दौंडमधील देऊळगाव राजे येथे ३० मिमी पाऊस झाला. यवत, केडगाव, राहू, वरवंड हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या. पुरंदरमधील जेजुरी येथे सर्वाधिक ४९ मिमी पाऊस झाला. कुंभारवळण येथे ४६, राजेवाडी येथे ४०, सासवड, परिंचे येथे २२, भिवडी येथे १२, वाल्हे येथे ११ मिमी पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com