पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी कायम

कुरुंगवडी येथे पावसामुळे पिकांचे नुकसान झाले
कुरुंगवडी येथे पावसामुळे पिकांचे नुकसान झाले

पुणे  : जिल्ह्यातील मुळशी, भोर, मावळ, जुन्नर, आंबेगाव, हवेली या तालुक्यांच्या काही भागांत रविवारी (ता. ६) मुसळधार वादळी पाऊस झाला. जुन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर अधिक होता. फुलोऱ्यात असलेल्या भात पिकाला आणि रब्बीच्या पेरणीला हा पाऊस पोषक ठरणार आहे. मात्र मुसळधार पावसामुळे भाजीपाला, फुले, कांदारोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.

दिवाळी आणि दसऱ्यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागांत फुलांची लागवड करण्यात आली आहे. यंदा पाऊस चांगला असल्याने सोयाबीन, बाजरीसह खरिपाची पिके जोमदार वाढली आहेत. ही पिके परिपक्व होत असताना पडणाऱ्या जोरदार पावसामुळे नुकसान वाढणार आहे. तर रब्बी कांदा लागवडीसाठी रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. रोप वाढीच्या काळातच पावसाने दणका दिल्याने शेतकऱ्यांना पुन्हा रोपे तयार करावे लागणार आहे.  

मावळ तालुक्यातील कामशेत परिसरात झालेल्या पावसाने फुलोऱ्यात आलेल्या भात पिकाला फायदा होणार आहे, तर दुसरीकडे भोर तालुक्‍यातील कुरुंगवडी परिसरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे बांध व रस्ते वाहून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभे भातपीक दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. कुरुंगवडी येथील डोंगराकडील वाघजाईदरा, गुणनदरा आदी भागांत शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. डोंगरावरून वाहिलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने परिसरातील शेतीचे ओढ्यात रूपांतर केले आहे. शेतीचे बांध फुटले आहेत. दगडीताली वाहून गेल्या आहेत. शेतरस्तेदेखील पूर्ण वाहून गेले आहेत.

जिल्ह्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) (स्रोत - महसूल विभाग) : पौड ४९, पिरंगुट ४५, संगमनेर ५३, खडकाळा १६, जुन्नर ३३, वडगाव आनंद २३, राजूर ६१, डिंगोरे ५४, आपटाळे २०, पारगाव १८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com