सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने झोडपले

जोरदार पावसामुळे शूक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली
जोरदार पावसामुळे शूक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली

सिंधुदुर्ग ः जिल्ह्याला मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले. पावसाच्या सरीवर सरी कोसळत असून, अनेक नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात बुधवारी सकाळपर्यंत सर्वाधिक १४८ मिमी पावसाची झाली आहे. भुईबावडा (ता. वैभववाडी) घाटात दरड कोसळली असून, खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या मार्गावरील वाहतूक करूळ घाटमार्गे वळविण्यात आली आहे.

जिल्ह्यात रविवारपासून पुन्हा पावसाला सुरवात झाली. त्यानंतर गेले दोन दिवस पाऊस सुरू आहे. सोमवारी जिल्ह्यातील कणकवली, मालवण आणि कुडाळ तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. त्यामुळे येथील नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली होती. मंगळवारी रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरवात झाली. सर्वच तालुक्यात संततधार सुरूच आहे. दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून, तिलारी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

या तालुक्यातील बहुतांशी नद्या दुथडी भरून वाहत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कणकवली, वैभववाडी, देवगड या तीन तालुक्यांत देखील ९० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर कायम होता. वैभववाडी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे शुक, शांती, अरुणा आणि इतर नद्यांतून पाण्याचा मोठा प्रवाह वाहत आहे. हे सर्व पाणी कणकवली तालुक्यातील खारेपाटण शहरात जात असल्यामुळे या भागाला पुन्हा पुराचा तडाख्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com