पूर्व विदर्भ, कोकणात मुसळधार कायम

ऊस नुकसान
ऊस नुकसान

पुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाने जोर धरला आहे. कोकणासह पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची मुसळधार कायम आहे. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर कमी होता. शनिवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे सर्वाधिक २९० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

मध्य भारतात असलेले कमी दाबाचे क्षेत्र, पोषक स्थितीमध्ये असलेला मॉन्सूनचा आस यामुळे राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीपासूनच पाऊस वाढला आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, आणि पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. घाटमाथ्यासह सातारा, पुणे, नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. शनिवारी सकाळपासून विदर्भ आणि कोकण किनाऱ्यावर दाट ढगांची गर्दी झाली होती. उर्वरित राज्यात हलके ढग होते.   शनिवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : डहाणू ५१, जव्हार ७३, मोखेडा ४५, तलासरी ७५, विक्रमगड ७८, वाडा ४६, अलिबाग ११४, भिरा १०९, कर्जत ८५, खालापूर ६०, महाड ६५, माणगाव ११०, माथेरान १८६, म्हसळा ११७, मुरूड १२८, पनवेल ६५, पेण १२०, पोलादपूर ८७, रोहा ११०, श्रीवर्धन १३३, सुधागडपाली १०४, तळा १५४, उरण ७४, चिपळूण ८०, गुहागर ४८, हर्णे ७७, खेड ११६, लांजा ४०, मंडणगड १२५, पवारवाडी ९६, राजापूर ९६, रत्नागिरी ५९, संगमेश्वर ७७, दोडामार्ग १५५, कणकवली ८९, कुडाळ ४५, सावंतवाडी ८८, वैभववाडी ६०, वेंगुर्ला ८४, शहापूर ७०.  मध्य महाराष्ट्र : शिरपूर ५३, सिंदखेडा ३२, अंमळनेर ४९, आजरा ७५, चंदगड ६६, गगणबावडा १२२, गारगोटी ३२, पन्हाळा ४६, राधानगरी १००, शाहूवाडी ५०, इगतपुरी ७०, ओझरखेडा ३७, पौड ६२, जावळीमेढा ३८, महाबळेश्वर ९८. मराठवाडा : अहमदपूर २१, जळकोट २६, देगलूर ३१, कंधार २०, मुखेड ३१, नायगाव खैरगाव २३, सेलू ४२. विदर्भ : लाखंदूर ६८, पवनी १९२, ब्रह्मपुरी १३४, चिमूर ४२, नागभिड १०४, अहेरी ५१, अरमोरी ६१, चामोर्शी ४७, देसाईगंज ४७, धानोरा ७८, एटापल्ली ७७, गडचिरोली ६८, मुलचेरा ६७, भिवापूर २९०, कामठी १०३, कुही १४३, मौदा १८४, नागपूर ७८, सावनेर ६७, उमरेड १२०. विदर्भात अतिजोरदार पावसाचा इशारा मॉन्सून सक्रिय असल्याने आज (ता. ८) विदर्भात अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यासह उर्वरीत महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथा, विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, नागपूरसह पूर्व विदर्भात अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. १०० मि.मी.पेक्षा अधिक पावसाची ठिकाणे   भिवापूर २९०  मौदा १८४  कुही १४३  उमरेड १२०  कामठी १०३ (नागपूर)  पवनी १९२ (भंडारा)  ब्रह्मपुरी १३४, चिमूर ४२, नागभिड १०४ (चंद्रपूर)  माथेरान १८६, तळा १५४, श्रीवर्धन १३३, मुरूड १२८, पेण १२०, म्हसळा ११७, अलिबाग ११४, माणगाव ११०, रोहा ११०, भिरा १०९, सुधागडपाली १०४ (रायगड)    खेड ११७ (रत्नागिरी)  दोडामार्ग १५५ (सिंधुदुर्ग)  गगनबावडा १२२, राधानगरी १०० (कोल्हापू्र).  धरणांतून सूरू असलेला विसर्ग (क्युसेकमध्ये)   

धरण   विसर्ग नदी
खडकवासला १८,४९१   मुठा 
उजनी   ३०,०००  भिमा
राधानगरी  ५६८४ भोगावती
कोयना  ४१५१४   कोयना  
मुळशी १५,४०० मुळा 
भाटघर   ८,५८० नीरा
वीर   २३,२३५ नीरा
दौंड बंधारा २७,५२४    भिमा
निरा नृसिंहपूर ५३,९४०    नीरा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com