पूर्वविदर्भात जोरदार पाऊस 

राज्यातील काही भागांत पावसाचा दणका सुरूच आहे. कोकणात व पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.
rain
rain

पुणे : राज्यातील काही भागांत पावसाचा दणका सुरूच आहे. कोकणात व पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजापूर, दोडामार्ग, कुडाळ, मालवण, मुलदे (कृषी), सावंतवाडी, वेंगुर्ला येथे मुसळधार पाऊस पडला. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व पश्‍चिम विदर्भात पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली आहे. 

कोकणातील बहुतांशी भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. तर घाटमाथ्यावर अतिवृष्टी होत असल्याने ओढे, नाले खळाळून वाहत आहेत. पावसामुळे भात खाचरे भरू लागली आहेत. डुंगरवाडी, लोणावळा, अंबोने, कोयना, ताम्हिणी, शिरगाव, दावडी, भिरा, खोपोली, लोणावळा, वडळवण, भिवपुरी, खंद या घाटमाथ्यावर पावसाची बऱ्यापैकी संततधार सुरू आहे. पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यांच्या पश्‍चिम पट्ट्यात पावसाच्या अधूनमधून सरी बरसत आहेत. या भागात भात रोपवाटिकेच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. काही ठिकाणी रोपवाटिकेतील रोपे उगवून वर आल्याने रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. पूर्व भाग व खानदेशात अंशतः ढगाळ वातावरण आहे. तर अधूनमधून कडक ऊन पडत आहे. 

मराठवाड्यात तुरळक सरी  मराठवाड्यातील परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली भागांत पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी पडल्या. काही ठिकाणी हलक्या सरी पडल्याने मशागतीचे कामे वेगाने सुरू आहेत. औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यांत पावसाचा प्रभाव कमी आहे. नांदेडमधील विष्णुपुरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने बऱ्यापैकी उपलब्धता झाली आहे. 

विदर्भात शिडकावा  विदर्भाच्या पूर्व भागात पावसाच्या बऱ्यापैकी सरी पडत आहे. यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, भंडारा या भागांत काही प्रमाणात जोरदार पाऊस पडत आहे. बल्लारपूर, कोपर्णा, अर्जुनीमोरगाव, अरेहरी, जेवती या ठिकाणी जोरदार पाऊस पडला. त्या तुलनेत बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती या भागांत पावसाचा शिडकावा होत आहे. 

राज्यात मंगळवारी (ता.१५) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय पाऊस (मि.मी.मध्ये) : स्रोत - हवामान विभाग  कोकण : महाड २८, म्हसळा ४३, श्रीवर्धन ७०, गुहागर ७०, हर्णे ४५.४, खेड ३९, राजापूर १५५, देवगड ८९, दोडामार्ग १३२, कणकवली ७०, कुडाळ १२९, मालवण १३२, मुलदे (कृषी) १५९.८, सावंतवाडी ९९, वैभववाडी ५८, वेंगुर्ला १३४.२.  मध्य महाराष्ट्र : चंदगड २९, गगनबावडा ९१, महाबळेश्‍वर २६.५.  मराठवाडा : औंढा नागनाथ ४५, हिंगोली २१, परतूर ४२, भोकर ३२, किनवट ३२, लोहा २७, सोनपेठ ३३.  विदर्भ : अमरावती ३४.५, चांदूर रेल्वे ५३.२, लाखणी ४०.८, साकोली ५९.८, बल्लारपूर ७६.६, भद्रावती ३१.३, चंद्रपूर ५५.५, गोंडपिंपरी ५५.५, जेवती ६६.६, कोर्पणा ७०.१, राजूरा ४२, सावळी ३०.८, वरोरा ३३.८, अहेरी ७३.२, अरमोरी ४२.४, भामरागड ४७.१, धानोरा ३५.५, कोर्ची ७२.९, कुरखेडा ५८.८, सिरोंचा ३९.५, अर्जुनीमोरगाव ७३.९, देवळी ५८.४, बाभूळगाव ४४.७, घाटंजी ३४.३, महागाव ३७.५, मारेगाव ४२.६, पांढरकवडा ४९.९, वणी ५१.८.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com