agriculture news in Marathi heavy rain in east Vidarbha Maharashtra | Page 2 ||| Agrowon

पूर्वविदर्भात जोरदार पाऊस 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 जून 2021

राज्यातील काही भागांत पावसाचा दणका सुरूच आहे. कोकणात व पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. 

पुणे : राज्यातील काही भागांत पावसाचा दणका सुरूच आहे. कोकणात व पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजापूर, दोडामार्ग, कुडाळ, मालवण, मुलदे (कृषी), सावंतवाडी, वेंगुर्ला येथे मुसळधार पाऊस पडला. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व पश्‍चिम विदर्भात पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली आहे. 

कोकणातील बहुतांशी भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. तर घाटमाथ्यावर अतिवृष्टी होत असल्याने ओढे, नाले खळाळून वाहत आहेत. पावसामुळे भात खाचरे भरू लागली आहेत. डुंगरवाडी, लोणावळा, अंबोने, कोयना, ताम्हिणी, शिरगाव, दावडी, भिरा, खोपोली, लोणावळा, वडळवण, भिवपुरी, खंद या घाटमाथ्यावर पावसाची बऱ्यापैकी संततधार सुरू आहे.

पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यांच्या पश्‍चिम पट्ट्यात पावसाच्या अधूनमधून सरी बरसत आहेत. या भागात भात रोपवाटिकेच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. काही ठिकाणी रोपवाटिकेतील रोपे उगवून वर आल्याने रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. पूर्व भाग व खानदेशात अंशतः ढगाळ वातावरण आहे. तर अधूनमधून कडक ऊन पडत आहे. 

मराठवाड्यात तुरळक सरी 
मराठवाड्यातील परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली भागांत पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी पडल्या. काही ठिकाणी हलक्या सरी पडल्याने मशागतीचे कामे वेगाने सुरू आहेत. औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यांत पावसाचा प्रभाव कमी आहे. नांदेडमधील विष्णुपुरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने बऱ्यापैकी उपलब्धता झाली आहे. 

विदर्भात शिडकावा 
विदर्भाच्या पूर्व भागात पावसाच्या बऱ्यापैकी सरी पडत आहे. यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, भंडारा या भागांत काही प्रमाणात जोरदार पाऊस पडत आहे. बल्लारपूर, कोपर्णा, अर्जुनीमोरगाव, अरेहरी, जेवती या ठिकाणी जोरदार पाऊस पडला. त्या तुलनेत बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती या भागांत पावसाचा शिडकावा होत आहे. 

राज्यात मंगळवारी (ता.१५) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय पाऊस (मि.मी.मध्ये) : स्रोत - हवामान विभाग 
कोकण : महाड २८, म्हसळा ४३, श्रीवर्धन ७०, गुहागर ७०, हर्णे ४५.४, खेड ३९, राजापूर १५५, देवगड ८९, दोडामार्ग १३२, कणकवली ७०, कुडाळ १२९, मालवण १३२, मुलदे (कृषी) १५९.८, सावंतवाडी ९९, वैभववाडी ५८, वेंगुर्ला १३४.२. 
मध्य महाराष्ट्र : चंदगड २९, गगनबावडा ९१, महाबळेश्‍वर २६.५. 
मराठवाडा : औंढा नागनाथ ४५, हिंगोली २१, परतूर ४२, भोकर ३२, किनवट ३२, लोहा २७, सोनपेठ ३३. 
विदर्भ : अमरावती ३४.५, चांदूर रेल्वे ५३.२, लाखणी ४०.८, साकोली ५९.८, बल्लारपूर ७६.६, भद्रावती ३१.३, चंद्रपूर ५५.५, गोंडपिंपरी ५५.५, जेवती ६६.६, कोर्पणा ७०.१, राजूरा ४२, सावळी ३०.८, वरोरा ३३.८, अहेरी ७३.२, अरमोरी ४२.४, भामरागड ४७.१, धानोरा ३५.५, कोर्ची ७२.९, कुरखेडा ५८.८, सिरोंचा ३९.५, अर्जुनीमोरगाव ७३.९, देवळी ५८.४, बाभूळगाव ४४.७, घाटंजी ३४.३, महागाव ३७.५, मारेगाव ४२.६, पांढरकवडा ४९.९, वणी ५१.८. 
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी...पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने...
हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे...
कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली...
राज्याची फळबाग लागवड योजना बंद नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या...
विना नांगरणी तंत्राने कपाशी, तुरीची शेतीदेवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील,...
हिंमत, परिश्रमातून पूर्णाबाईंनी साधली...शिरेगाव (जि. नगर) येथील अल्पभूधारक पूर्णाबाई होन...
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...
सर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर...रत्नागिरी : ‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी...
बहुपीक पद्धतीतून साधले नफ्याचे सूत्रकोल्हापूर जिल्ह्यातील शेंडूर (ता. कागल) येथील...
पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह...
सांगलीत चौदा हजार जनावरांचे स्थलांतरसांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील...
कोसळलेला प्रसंग मोठा; तुमचं पुनर्वसन...मुंबई ः तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे....
पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची...पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह,...