Agriculture news in Marathi Heavy rain in eastern part of Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात दमदार पाऊस

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जून 2020

नाशिक : गत सप्ताहापासून पावसाने दडी दिल्याने शेतकऱ्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मात्र, जिल्ह्याच्या पूर्व भागात प्रामुख्याने नांदगाव व मालेगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.

नाशिक : गत सप्ताहापासून पावसाने दडी दिल्याने शेतकऱ्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मात्र, जिल्ह्याच्या पूर्व भागात प्रामुख्याने नांदगाव व मालेगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याचे दिसून आले. तर येवल्याच्या पूर्व भागातही रविवारी (ता. २८) काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

जिल्ह्यात आत्तापर्यंत चार लाख हेक्टर क्षेत्रावर एकूण ६१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक पेरण्या या सटाणा, नांदगाव, मालेगाव, देवळा व येवला तालुक्यात झालेल्या आहेत. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा होती. आता पिके जोमाने उभी राहण्याच्या कालावधीत पावसाने दडी दिल्याने पिके कोमेजू लागली होती.मात्र, या पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मालेगाव तालुक्याच्या शहर परिसरसह पूर्व भागात झोडगे व निमगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. तर पश्चिम भागात कौळाणे, सायने, दाभाडी परिसरातील अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. नांदगाव तालुक्यातील शहर परिसरसह सर्वदूर जोरदार पाऊस झाला. पूर्व भागात साकोरे, मूळडोंगरी, चांदोरे, नाग्यासाक्या धरण व हिंगणवाडी परिसरात शेतांमधून पाणी साचून वाहिले. येवला तालुक्याच्या पूर्व भागात दोन पाऊस दमदार झाले आहेत.

अंदरसुल मंडळात पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली; मात्र पश्चिम भागात अद्यापही पावसाची वाट पहावी लागत आहे. सटाणा तालुक्यातील लाडुद परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर काही भागांमध्ये हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे संकट कमी झाले आहे. सटाणा व देवळा तालुक्यातील अनेक भागात पावसाची वाट पाहावी लागत आहे.

नाशिक तालुक्यातील अनेक भागात दमट वातावरण होते.पाऊस येईल, अशी शेतकाऱ्यांना अपेक्षा असताना पावसाने दांडी मारली. दिंडोरी, कळवण, देवळा, पेठ, सुरगाणा, सिन्नर तालुक्यातही हीच परिस्थिती आहे. निफाड तालुक्यातील अनेक भागांमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. गोदाकाठ परिसरात पाऊस पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या असून दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर आहे.सिन्नर तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन व मका पेरणी वाया जाण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मंडळनिहाय झालेला पाऊस (मिमी मध्ये) ः
येवला तालुका ४, सावरगाव २, अंदरसुल १८.
नांदगाव तालुका ः नांदगाव, ४३ मनमाड ५, वेहेळगाव १९, जातेगाव ७, हिसवळ ५.
मालेगांव तालुका ः मालेगांव ३४, दाभाडी ४, वडनेर २, झोडगे ६५, कळवाडी १२, कोळाने ४२, सायने १८, निमगाव ३८.

तालुकानिहाय झालेला एकूण पाऊस
तालुका पाऊस (मिमी सरासरी
नांदगाव ७९ १५.८
मालेगाव २१४ २१.४०
येवला २४

 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...