agriculture news in marathi, heavy rain in eight district, parbhani, maharashtra | Agrowon

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील १५१ मंडळांमध्ये पाऊस

टीम अॅग्रोवन
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील १५१  मंडळांमध्ये रविवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील ईट मंडळात सर्वाधिक ७५ मिमी पाऊस झाला. परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये वादळी वाऱ्यामुळे कपाशी, तूर, ऊस ही पिके आडवी पडली. काढणी सुरू असलेले सोयाबीन भिजल्याने नुकसान झाले. औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील अनेक मंडळांत पाऊस झाला. रविवारी (ता. ६) दुपारी परभणी शहर तसेच परिसरात विजांच्या कडकडात पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी २७ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.

औरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील १५१  मंडळांमध्ये रविवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील ईट मंडळात सर्वाधिक ७५ मिमी पाऊस झाला. परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये वादळी वाऱ्यामुळे कपाशी, तूर, ऊस ही पिके आडवी पडली. काढणी सुरू असलेले सोयाबीन भिजल्याने नुकसान झाले. औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील अनेक मंडळांत पाऊस झाला. रविवारी (ता. ६) दुपारी परभणी शहर तसेच परिसरात विजांच्या कडकडात पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी २७ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.

औरंगाबाद,गंगापूर, खुल्ताबाद तालुक्यातील काही मंडळांमध्ये चांगला पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी २८ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. बदनापूर, भोकरदन, मंठा, अंबड, घनसावंगी तालुक्यांतील अनेक मंडळांमध्ये चांगला पाऊस झाला. परभणी जिल्ह्यतील ३९ पैकी परभणी, जिंतूर, सेलू तालुक्यातील ४ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी हिंगोली, कळमनुरी, औंढानागनाथ, सेनगाव तालुक्यातील ८ मंडळांमध्ये पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ६ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.

लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी २२ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. रेणापूर, शिरूरअनंतपाळ तालुक्यांतील अनेक मंडळांत चांगला पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ३० मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब, भूम, वाशी तालुक्यांतील अनेक मंडळांमध्ये चांगला पाऊस झाला. ईट मंडळात अतिवृष्टी झाली. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी २६ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. बीड, वडवणी, पाटोदा तालुक्यांतील अनेक मंडळांमध्ये चांगला पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (मिमी) ः औरंगाबाद जिल्हा ः औरंगाबाद ४, उस्मानपुरी ८, भावसिंगपुरा २५, लाडसावंगी १८, करमाड १७, काचंनवाडी ४४, हर्सूल ५०, पिरबावडा २५, आडूळ ५, लाडगाव १६, मांजरी १७, सिद्धनाथ वडगाव ३१, वेरूळ २२, सुलतानपूर ५, बाजारसावंगी ७. जालना जिल्हा ः जालना ६, जालना ग्रामीण ५, बदनापूर ५२, रोषणगाव २२, धावडा ५, पिंपळगाव रेणुकाई ४०, हस्नाबाद १२, तळणी ४०, अंबड ६, जामखेड ११, वडीगोद्री ७, गोंदी ३७, रोहिला गड ४५, सुखापुरी ४७, घनसावंगी ३५, तीर्थपुरी २२, कुंभार पिंपळगाव २२, अंतरवेली १६. परभणी जिल्हा ः झरी ५, जिंतूर ११, सेलू १८, देऊळगाव ५. हिंगोली जिल्हा ः माळहिवरा १६, आखाडा बाळापूर ३१, गोरेगाव ७, औंढानागनाथ ६, येळेगाव ७. नांदेड जिल्हा ः मुगट ९, कुरुला ४०, फुलवळ ५, लोहगाव १६. लातूर जिल्हा ः रेणापूर ५, कारेपूर ६, पानगाव ३०, देवर्जन १०, नळेगाव १९, अंबुलगा २०, कासारबालकुंदा ५, वलांडी ७, शिरूर अंनतपाळ २५, साकोळ २२. उस्मानाबाद जिल्हा ः उस्मानाबाद शहर ७, तेर ३४, ढोकी २६, बेम्बाळी ८, केशेगाव ४७, तुळजापूर १५, जळकोट ६, सालगरा ४६, इटकळ २०, मुरुम २२, डाळिंब ९, लोहरा १४, माकणी ६, कळंब ४०, शिराढोण ११, येरमाळा १७, मोहा ३६, भूम १७, ईट ७५, वाशी ८, तेरखेडा १९, पारगाव ३१. बीड जिल्हा ः मांजरसुभा १७, चौसाळा ४०, नेकनूर ४३, पिॆपळनेर १४, पाटोदा २०, धानोरा ९, चकलंबा १४, मादळमोही ६, कौडगाव १२, माजलगाव १०, गंगामसला ५, तालखेड ५, केज ५, विडा १४.


इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्ह्यातील ६३ हजारांवर...सातारा  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी...
मुख्यमंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवादअमरावती : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या...कोल्हापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी...
मातीचं सोनं करणारे भवरलाल जैन...“बळीवंत आम्ही, मातीतला दास धरलेली कास, मरणाची”...
वाशीम जिल्ह्यात ४३७ शेतकऱ्यांचा यादीत...वाशीम  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याचा विकास गतीने...
शेतकरी कर्जमुक्तीसाठी सोलापुरात आधार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
राज्य सरकारकडून २४ हजार कोटींच्या...मुंबई  : राज्य विधिमंडळाच्या...
नाशिकमध्ये आल्याच्या आवकेत वाढ, दरात घट नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरला गवार, शेवग्याच्या दरात तेजी कायम नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची...
खासदार डॅा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य...सोलापूर  ः सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ....
कर्जमुक्तीत रत्नागिरी जिल्ह्यातील २३४...रत्नागिरी ः महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
नगर जिल्ह्यात मिळणार डिजिटल स्वाक्षरीचा...नगर  ः ऑनलाइन सात-बारा संगणकीकरणाच्या...
पुणे जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या...पुणे  ः जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले...
नाशिक  : चांदोरी,सोंनाबे येथे...नाशिक  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांचा...नगर  ः  सायेब, मागच्या काळात...
सांगलीच्या ५९६ शेतकऱ्यांचा...सांगली ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
भंडारा जिल्ह्यात ३५ हजार शेतकरी...भंडारा ः राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त...
टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९ पंप सुरूसांगली  ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९५०...
नगर, नाशिकच्या शेतकऱ्यांची ८८ कोटींवर...नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांतील पंधरा...