मराठवाड्यातील अकरा मंडळांत अतिपाऊस

औरंगाबाद: मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील अकरा मंडळांत गुरुवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत अतिपाऊस झाला.
 Heavy rain in eleven circles in Marathwada
Heavy rain in eleven circles in Marathwada

औरंगाबाद: मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील अकरा मंडळांत गुरुवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत अतिपाऊस झाला. या मंडळांत औरंगाबाद जिल्ह्यातील पाच, जालना जिल्ह्यातील दोन, बीड जिल्ह्यातील एक, लातूर जिल्ह्यातील एक, उस्मानाबाद जिल्ह्यातील एका व परभणी जिल्ह्यातील एका मंडळाचा समावेश आहे.

दुसरीकडे औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील नऊ तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. यात औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, जालना जिल्ह्यातील घनसावंगी, मंठा, लातूर जिल्ह्यातील चाकूर, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर मंडळाचा समावेश आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील खंडाळा, बोरसर, कन्नड तालुक्यातील चिंचोली, करंज, खेडा, तर सिल्लोड तालुक्यातील बोरगाव मंडळांत अधिक पाऊस नोंदला गेला. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुका अंतर्गत अंतरवाली व मंठा, बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुका अंतर्गत शिरूर, लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील घटना साकूर मंडळात अति पावसाची नोंद झाली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात अंतर्गत जळकोट, तर परभणी जिल्ह्यातील शेळगाव मंडळाचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्‍यात सरासरी ४१.१ मिमी पाऊस झाला.

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात सरासरी १८ मिमी पाऊस झाला. रोहिलागडसह बुधवारी (ता. ९) सायंकाळी  बदापूर, चिकनगाव, साडेसावंगी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नदीला पूर आला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com