जळगाव जिल्ह्यास पावसाने झोडपले

जळगाव : जिल्ह्यात गुरुवारी (ता.२३) अनेक भागांत जोरदार, मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे पिकांची हानी सुरूच आहे. पावसामुळे कापूस वेचणी, तणनिंत्रण, फवारणी, खते देणे आदी कामे ठप्पच आहेत.
heavy rain fall in Jalgaon district
heavy rain fall in Jalgaon district

जळगाव  : जिल्ह्यात गुरुवारी (ता.२३) अनेक भागांत जोरदार, मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे पिकांची हानी सुरूच आहे. पावसामुळे कापूस वेचणी, तणनिंत्रण, फवारणी, खते देणे आदी कामे ठप्पच आहेत. 

नुकसानीची पातळी पावसामुळे वाढत आहे. गुरुवारी सायंकाळी जळगाव तालुक्यात तापी, गिरणा काठी जोरदार पाऊस झाला. तसेच एरंडोल, धरणगाव, चोपडा, धुळ्यातील शिरपूर येथेही जोरदार पाऊस झाला. चोपडा येथे तर रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. जळगाव जिल्ह्यात सरासरीएवढा पाऊस चोपडा, जळगाव, धरणगाव, एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, जामनेर या तालुक्यांत झाला आहे. धुळ्यातही शिरपूर, साक्री तालुक्यात पावसाने सरासरी गाठली आहे. 

नंदुरबारातही अक्कलकुवा, धडगाव, नवापुरात सरासरीएवढा पाऊस झाला आहे. या महिन्यात पावसाची टक्केवारी जोमात वाढली. कारण जोरदार, अतिपाऊस या महिन्यात झाला आहे. तसेच जलसाठ्यांमधील पाण्याची आवकही वाढली. अनेक प्रकल्प याच महिन्यात १०० टक्के भरले. त्यात धुळ्यातील पांझरा, कनोली, मालनगाव, जळगावमधील तोंडापूर, मन्याड, बहुळा, हिवरा, वाघूर या प्रकल्पांचा समावेश आहे. पावसाची टक्केवारी वाढली. परंतु पिकांची हानी अधिक झाली आहे. 

मळणीवर आलेला सोयाबीन, उडीद, वेचणीवर आलेला कापूस या पिकांना मोठा फटका बसला आहे. वित्तीय नुकसान वाढतच आहे. गेले तीन दिवस खानदेशात काही तालुक्यांचा अपवाद वगळता मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे. काही भागात वारा, अतिपावसात कापूस पीक आडवे झाले आहे. प्रशासनाने पंचनामे सुरू केले आहेत. परंतु तोकडी भरपाई शेतकऱ्यांना  पुरेशी नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com