agriculture news in marathi Heavy rain fall in Tamilnadu capital chennai faces rain | Page 3 ||| Agrowon

तमिळनाडूला पावसाने झोडपले..

वृत्तसेवा
मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021

तमिळनाडूत चेन्नईसह अनेक जिल्ह्यात रविवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. राजधानीत २०१५ नंतर प्रथमच झालेल्या मोठ्या पावसाने सखल भाग जलमय झाला आहे.

चेन्नई : तमिळनाडूत चेन्नईसह अनेक जिल्ह्यात रविवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. राजधानीत २०१५ नंतर प्रथमच झालेल्या मोठ्या पावसाने सखल भाग जलमय झाला आहे.

येत्या दोन दिवसात तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. तमिळनाडूतील पूरस्थिती पाहून मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी मदतकार्याला वेग येण्यासाठी मंत्र्यांना आणि शासकीय यंत्रणांना कामाला लावले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सायंकाळी ट्विट करत मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याशी चर्चा करून केंद्राकडून सर्वप्रकारची मदत देण्याचे आश्‍वासन दिल्याचे सांगितले.

चेन्नईत रविवारी रात्रभर पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. आज सकाळी ७.३० वाजेपर्यंत चेन्नईत २०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नुंगमबक्कममध्ये १४५ मिलिमीटर, विल्लोवाक्कम येथे १६२ मिलिमीटर आणि पुझल येथे १११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचले. त्यामुळे रेल्वेसेवा स्थगित करण्यात आली आहे. चेन्नई सेंट्रल आणि एग्मोरकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. कोरात्तूर, पेरम्बदूर, अन्नासलाई, टी नगर, गिंडी, अडयार, पेरुंगुडी, ओएमआरसह चेन्नईच्या अनेक भागात पाणी साचले आहे.
तत्पूर्वी चेन्नईत शनिवारपासून मुसळधार पावसास सुरवात झाली. त्यामुळे चेन्नईच्या सखल भागात पाणी साचण्यास सुरवात झाली.

उत्तर चेन्नईतील थिरुवूत्रियूर आणि इन्नोर आणि दक्षिण चेन्नईतील वेलचेरी येथे पाण्याने रस्ते जलमय झाले. या पावसाने २०१५ च्या भयावह महापुराची आठवण झाली. या महापुरात दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी जमले होते. कालच्या पावसाने चेन्नईच्या टी नगरला जबर फटका बसला आहे. तसेच कोरात्तूर येथे देखील गुडघ्याभर पाणी साचले आहे. सखल भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले असून मोटारीच्या मदतीने पाणी उपसले जात आहे. आज पावसाने विश्रांती घेतल्यानंतर मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. बचाव पथकावर देखरेख ठेवण्यासाठी १२ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. मंत्र्यांना देखील पूरग्रस्त भागात जाण्याचे निर्देश दिले आहेत.

दोन दिवस शाळा कॉलेज बंद
मुसळधार पावसामुळे सरकारी कार्यालयास आज सुटी देण्यात आली. तसेच शाळा आणि कॉलेजला दोन दिवस सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. चेन्नई परिसरातील पाणीसाठ्यात पातळी वाढू लागल्याने पाणी सोडण्यात येत आहे. खबरदारीचा
उपाय म्हणून पाणी सोडले जात असल्याचे प्रशासनाने सांगितले.
तमिळनाडू, आंध्रात मुसळधारेचा इशारा
येत्या१० आणि ११ नोव्हेंबर रोजी तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे सखल भागात आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आणखी पाणी साचण्याची शक्यता आहे. राज्यात दोन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता गृहित धरून आपत्ती व्यवस्थापनाने चेन्नई आणि मदुराई जिल्ह्यात ४४ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले दोन पथके रवाना केली आहेत. सोमवारी काही भागात पाऊस थांबल्यानंतर मंगळवारी पावसाला पुन्हा जोर येण्याची शक्यता आहे. 


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांनाही थंडी जाणवते भाऊ!जलालखेडा, जि. नागपूर ः नरखेड तालुक्यात रब्बी...
‘मँगोनेट’ अंतर्गत सात वर्षांत ४, ५६६... रत्नागिरी : हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील...
‘जलजीवन मिशन’च्या कामात सातारा अग्रेसरसातारा : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात २३७...
नाशिकमधील उन्हाळ कांद्याचा साठा अखेरीकडेनाशिक : फेब्रुवारी २०२१पासून उन्हाळ कांद्याची...
पाणीपट्टी ऊसबिलातून वसूल केल्यास आंदोलनसांगली ः  शेतकऱ्यांकडील पाणीपट्टीची रक्कम...
अकोला जिल्हा परिषदेत नववर्षातही राजकीय...अकोला ः गेले वर्षभर जिल्हा परिषदेत सुरू असलेले...
पुणे विभागात ज्वारी क्षेत्रात...पुणे : परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने...
येल्लकी वाणाच्या केळीला क्विंटलला चार...जळगाव  ः वढोदा (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील...
घरच्या घरी भाजीपाल्यासाठी ‘जिजाई नॅनो...सोलापूर ः घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने आणि अगदी...
बलून बंधाऱ्यांसाठी गिरणा परिक्रमा सुरू जळगाव ः  गिरणा नदीवर प्रस्तावित बलून...
घाटणे बॅरेजमध्ये गेलेल्या जमीनीची...सोलापूर ः मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन...
पुणे जिल्ह्यात ९ हजारांवर कुटुंबांना...पुणे ः ‘‘राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जिल्ह्यात...
पाटण तालुक्यात पुराच्या धोक्याकडे...मोरगिरी, जि. सातारा : तालुक्यात वाढत्या पावसाच्या...
मराठवाड्यात २१ लाख २१ हजार हेक्‍टरवर...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा रब्बी पेरणीत आजवर २१...
परभणी, हिंगोलीत ‘शेतमाल तारण’द्वारे दोन...परभणी ः ‘‘शेतीमाल तारणकर्ज योजनेअंतर्गत परभणी...
‘सिद्धेश्वर’ च्या अध्यक्षपदी काडादी, ...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर...
सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळावर... सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
लासलगाव येथे खत विक्रेत्याकडून जादा...नाशिक: रब्बी हंगामातील पेरण्या सुरू असून काही...
उष्णता ताणाचे वासराच्या आरोग्यावर दीर्घ...दुधाळ जनावरांवर उष्णतेच्या ताणाचा...
नांदुरा येथे कापसाचे दर नऊ हजार रुपये...नांदुरा, जि. बुलडाणा ः कॉटनबेल्ट म्हणून ओळख...