agriculture news in marathi, heavy rain, hailstrom affected to get 625 crore | Agrowon

अतिवृष्टी, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ६२५ कोटी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 जून 2018

मुंबई : राज्यात अतिवृष्टी, अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे मागील काळात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना ६२५ कोटी रुपयांची मदत वितरित करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (ता. ५) मान्यता देण्यात आली. राज्यात २०१६ मध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिके आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. फेब्रुवारी २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांना गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. मोठ्या क्षेत्रावरील शेतपिके आणि फळबागांचे नुकसान झाले होते.

मुंबई : राज्यात अतिवृष्टी, अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे मागील काळात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना ६२५ कोटी रुपयांची मदत वितरित करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (ता. ५) मान्यता देण्यात आली. राज्यात २०१६ मध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिके आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. फेब्रुवारी २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांना गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. मोठ्या क्षेत्रावरील शेतपिके आणि फळबागांचे नुकसान झाले होते.

तसेच या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागात शेतीचे तसेच काढणी झालेल्या मालाचे नुकसान झाले होते. १९ जिल्ह्यातील २ लाख ९० हजार ३९५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा व रब्बी हंगामामधील फळ पिकांचा यात समावेश होता. अमरावती जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान झाले होते, जिल्ह्यात सुमारे ४६ हजार हेक्टरचे नुकसान झाले होते. त्यापाठोपाठ बुलडाणा जिल्ह्यात ४१ हजार हेक्टर तर जालना जिल्ह्यातील ३२ हजार हेक्टरचा समावेश होता. 

महसूल विभागाच्या स्थायी आदेशानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतपिके आणि फळबागांना मदत दिली जाते. त्यानुसार कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी ६ हजार ८०० रुपये, बागायतीसाठी १३ हजार ५०० रुपये आणि फळबागांसाठी १८ हजार रुपये मदत दिली जाते. दोन हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. गेल्या काळातील या नुकसानीपोटी ६२५ कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे एकूण २६ लाख २६ हजार १५० शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...
पक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...
पुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...
‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...
जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...
अमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही...