अकोला जिल्ह्यात अतिवृष्टी, करपा, कंदकुजमुळे हळदीला फटका

यंदा दिवाळीपर्यंत सलग पाऊस पडत होता. त्यामुळे वातावरणात आर्द्रता कायम होती. यामुळे हळदीवर करपा आला. अतिपावसाने कंदसड झाली. आदी कारणांमुळे उत्पादकतेत घट आली असावी. - डॉ. गजानन तुपकर, विषय विशेषतज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, अकोला यंदा एकरात १६ क्विंटल वाळलेली हळद झाली. म्हणजेच ओली हळद एकरात ८० क्विंटल झाली होती. दरवर्षी ओल्या हळदीचे उत्पादन १२५ क्विटंलपेक्षा अधिक राहत होते. अनेक शेतकऱ्यांचे हळदीचे उत्पादन घटले आहे. - स्वप्निल कोकाटे, हळद उत्पादक,शिर्ला, ता. पातूर, जि. अकोला
 Heavy rain hit to turmeric in Akola district
Heavy rain hit to turmeric in Akola district

अकोला : या भागात शेतकऱ्यांना हमाखास उत्पादन देणारे पीक म्हणून हळदीची ओळख आहे. दरवर्षी या पिकाचे लागवड क्षेत्र वाढत आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने शेवटपर्यंत पाणीही उपलब्ध होते. मात्र, आता काढणी केल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांना कमी प्रमाणात उत्पादन मिळत असल्याचे समोर आले आहे. सरासरी उत्पादन ४० ते ५० टक्क्यापर्यंत घटले असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

अकोला, वाशीम, बुलडाणा जिल्हयांत हळदीचे क्षेत्र मोठे आहे. त्यातही वाशीम जिल्हयात हळदीची लागवड अधिक प्रमाणात केली जाते. गेल्या महिनाभरापासून हळद काढणी सुरु झाली होती. आता हा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. एकरी सरासरी १०० क्विंटलपेक्षा अधिक ओली हळद होणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा ७० ते ८० क्विंटलदरम्यान उतारा मिळाला आहे. यंदा अतिपाऊस झाल्याने, हळदीवर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादकतेला फटका बसला.

ओली हळद १०० क्विंटल होत असेल तर ती उकळून वाळविल्यानंतर २० क्विंटल राहते. म्हणजेच पाचवा हिस्साच उत्पादन म्हणून गृहीत धरावा लागतो. यंदा बहुतांश शेतकऱ्यांना एकरी १० ते १८ क्विंटलपर्यंत वाळलेली हळद झाली आहे.  विक्रीही होईना, घरात साठवणूक  

हळद तयार करून साठविण्यात येत आहे. या भागात हळदीची बाजारपेठ प्रामुख्याने हिंगोलीत आहे. संचारबंदीमुळे बाजारपेठा बंद आहेत. वाहतुकीला ठिकठिकाणी आडकाठी आणली जाते. यामुळे तयार झालेली हळद घरातच साठवून ठेवावी लागत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com