agriculture news in marathi Heavy rain hits some parts of Marathawada | Agrowon

मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

पुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत. मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी शिडकावा होत आहे.

पुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत. मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी शिडकावा होत आहे. पावसाने उघडीप दिल्याने राज्यात शेतीकामांना वेग आला असून बाजरी, मूग, उडीद पिकांची काढणी सुरू झाली आहे.  

कोकणात तीन ते चार दिवस दमदार हजेरी लावल्यानंतर या भागातील पाऊस कमी झाला आहे. मात्र, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असून पावसामुळे हळवी भातपिके धोक्यात आली आहे. पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे शेतकरी पीक काढणीचे नियोजन करू लागला आहे. पण शेतात वाफसा नसल्याने पीक काढणीसाठी थांबवे लागत आहे. 

निफाड, चांदवड, सुरगाणा तालुक्यातील अनेक भागात पावसाचा जोर दिसून आला. देवळा, त्र्यंबकेश्वर, पेठ,इगतपुरी, कळवण, सिन्नर, येवला, नांदगाव  बागलाण तालुक्यात जोर कमी होता. तर नाशिक, दिंडोरी, मालेगाव तालुक्यात पावसाने ओढ दिली आहे.

खानदेशात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. ऊन तापू लागले आहे. काही दिवसांपासून मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाचा कमी-अधिक प्रमाणात असलेला जोर शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात काही अंशी कमी असल्याचे चित्र आहे. औरंगाबादमधील पाचोड व जालन्यातील सुखापुरी या दोन मंडळात मात्र अतिवृष्टी झाली.

इतर मंडळात तुरळक ते हलक्‍या स्वरूपाचा होता. वऱ्हाडातही काही अंशी ढगाळ हवामान असले तरी अधूनमधून ऊन पडत असल्याने शेतात वाफसा अवस्था होत आहे. पूर्व विदर्भातही पाऊस नसल्याने भात पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी (ता.२५) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्त्रोत, हवामान विभाग)

  •     कोकण : कुलाबा २५, महाड १६, माणगाव ४६, माथेरान १६.६, म्हसळा १०, मुरूड १४, पेण १०, रोहा १४, सुधागडपाली १०, गुहागर २५, मंडणगड १५,रत्नागिरी १३.६, देवगड १३, दोडामार्ग ३१, कणकवली १८, कुडाळ ११, रामेश्वर १४.२, सावंतवाडी २४.२, भिवंडी २२,
  •     मध्य महाराष्ट्र ः जामखेड १३, पारनेर १६, राहुरी १०, श्रीरामपूर ३३, गगणबावडा १४, पन्हाळा १०, चंदगड २३.५, इगतपुरी १४, निफाड २२.९, सुरगाणा १२.१, लोणावळा कृषी १३.२, शिरूर ३०, महाबळेश्वर १०.९,
  •     मराठवाडा ः औरंगाबाद १४.४, गंगापूर ११, पैठण १३, अंबड ४४, घनसांगवी १६,
  •     विदर्भ : लाखंदूर १३.२, कुरखेडा १३.३.

इतर बातम्या
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
इंदापुरातील सिंचन सर्वेक्षणासाठी पाच...पुणे : ‘‘इंदापूर तालुक्यातील प्रलंबित शेती...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...