agriculture news in marathi, Heavy rain in the Khandesh | Agrowon

खान्‍देशात जोरदार पाऊस

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 ऑगस्ट 2018
जळगाव : खानदेशात मागील २४ तासांत अनेक ठिकाणी जोरदार; तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. सोमवारी (ता.२०) रात्रीपासून संततधार कायम आहे. मंगळवारपर्यंत (ता.२१) अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाल्याची माहिती मिळाली.
 
जळगाव : खानदेशात मागील २४ तासांत अनेक ठिकाणी जोरदार; तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. सोमवारी (ता.२०) रात्रीपासून संततधार कायम आहे. मंगळवारपर्यंत (ता.२१) अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाल्याची माहिती मिळाली.
 
जळगाव जिल्ह्यातील ८९ महसूल मंडळांपैकी सुमारे २१ मंडळांमध्ये दमदार पाऊस झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाचोरा येथे ३५ मिलिमीटर, रावेरात ४०, यावलमध्ये ५०, चोपडा येथे ५०, जळगावात ४०, धरणगाव येथे ४१, एरंडोलात ४०, चाळीसगाव येथे ४५, जामनेरात ४५ मिलिमीटर पाऊस झाला. मंगळवारी सकाळी ८ पर्यंत भुसावळ येथे २२ तर, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, शिरपूर येथे अनुक्रमे ३५ व ३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. साक्री व धुळे येथील काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती मिळाली आहे.
याबरोबरच नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्‍यात मंगळवारी सकाळपर्यंत १३ मिलिमीटर, नवापुरात २८, शहादा येथे ३१, तळोदा येथे १५, धडगावात ५६ तर, अक्कलकुवा येते २७ मिलीलिमीटर पावसाची नोंद झाली.

उडीद, मूग धोक्‍यात
या पावसामुळे उडीद व मुगाच्या तोडणीवर आलेल्या शेंगांचे नुकसान होण्याची स्थिती आहे. तापी व गिरणा काठानजीकच्या अनेक गावांमध्ये मूग तोडणीवर आला आहे. त्याच्या कोरड्या होत आलेल्या शेगांमध्ये कोंब निघण्याची स्थिती आहे. नुकसानीच्या भीतीने काही शेतकऱ्यांनी सकाळीच मूग तोडणी अनेक ठिकाणी सुरू केल्याचे सांगण्यात आले.

धरण साठ्यात वाढ
धरणसाठा फारसा वाढलेला नाही. हतनूरचे आठ दरवाजे उघडे आहेत. त्यात ४० टक्के जलसाठा आहे. गिरणामध्ये ३९ टक्के, वाघूरमध्ये ३७.७६ टक्के, अनेरमध्ये ५१, अभोरामध्ये ७५, मोर धरणात २८ टक्के जलसाठा झाला. मंगरूळ, सुकी हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर पश्‍चिम भागातील अग्नावती, भोकरबारी, बहुळा, मन्याड, अंजनी या मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्केच जलसाठा असल्याची स्थिती आहे.

इतर अॅग्रो विशेष
‘गोकूळ’चे दूध आता टेट्रापॅकमध्येही...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (...
खाद्यतेल आयातशुल्क कपातीने सोयाबीन,...पुणे: केंद्र सरकारने खाद्यतेल आयातशुल्कात कपात...
कांदा लिलाव अखेर सुरूनाशिक: जिल्हा उपनिबंधकांनी तातडीने लिलाव सुरू...
केंद्र सरकार खाद्यतेल आयात शुल्क...नवी दिल्ली ः देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाचे...
कांदा खरेदीनंतर अवधीच्या निर्णयात गोंधळ...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...
सांगली बाजार समितीत हळदीची उलाढाल २८०...सांगली ः कोरोना विषाणूमुळे बाजार समित्या बंद...
मोसंबी फळपिक विमा अर्जात गारपीटीचा कॉलम...पुणे ः आंबिया बहारातील मोसंबी, डाळिंब,...
पुरानं आमचं जगणंच खरवडून नेलंयसोलापूर ः नदीकाठी शेत असल्यानं दरवर्षी ऊस करतो,...
गुणवत्तापूर्ण सीताफळ उत्पादन हेच ध्येयबाजारपेठेचा अभ्यास आणि योग्य नियोजन केल्यास...
स्पॉन, अळिंबी उत्पादनाचा ‘कोल्हापूर...शिरटी (ता.शिरोळ,जि.कोल्हापूर) येथील उच्चशिक्षित...
धुके पडण्यास प्रारंभ...पुणे ः परतीचा मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
मोह फुलांचा वाढेल गोडवाराज्यामध्ये ऐन नवरात्रीमध्ये मॉन्सून देवतेने...
देखो तो कहीं चुनाव है क्या?‘स रहद पर तनाव है क्या, देखो तो कहीं चुनाव है...
कांदा खरेदीनंतर व्यापाऱ्यांना मिळणार...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...
मराठवाड्यात साठ टक्के कपाशीवर गुलाबी...नांदेड : ‘‘मराठवाड्यात लवकर येणारे कापूस वाण...
कंपन्यांनी सर्वेक्षण न केल्यास विमा...पुणे: राज्यात विमा कंपन्यांनी पीक नुकसानीचे...
इथेनॉल दरात तीन रुपयांपर्यंत वाढकोल्हापूर : यंदाच्या हंगामात इथेनॉलनिर्मितीला गती...
एक लाख टन कांदा आयातीची शक्यतानवी दिल्ली ः देशातील कांदा दरवाढीवर नियंत्रण...
कापूस खरेदीसाठी तीस केंद्रे अंतिमनागपूर : गेल्या हंगामात नव्वद केंद्र आणि १५०...
फळ पीकविमा योजनेवर केळी उत्पादकांचा...जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी...