कोकण, मध्य महाराष्ट्रात संततधार

कोकणातील बहुतांश भागांत पावसाचा कहर सुरू आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होत असल्याने रस्त्यांना पुराचे स्वरूप आले आहे. मुंबईच्या उपनगरात दरडी कोसळण्याच्या घटना घडत असून मोठी वित्तहानी झाली.
kop rain
kop rain

पुणे : कोकणातील बहुतांश भागांत पावसाचा कहर सुरू आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होत असल्याने रस्त्यांना पुराचे स्वरूप आले आहे. मुंबईच्या उपनगरात दरडी कोसळण्याच्या घटना घडत असून मोठी वित्तहानी झाली. नाशिकमधील ओझरखेडा येथे ३२९.८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे नद्यांचे पाणी प्रवाहाच्या बाहेर जात असल्याने अनेक गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. 

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईच्या सर्व उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. विक्रोळी येथे पुन्हा दरड कोसळली. रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा बसला. राजापूर तालुक्यात अर्जुना नदीला पूर आला. नाटे येथील ठाकरेवाडी जवळील साकव पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. रायगडमध्ये नागोठणे परिसरातील आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. नागोठणे शहरातही पाणी शिरले. त्यामुळे नदी गावाजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस बरसत आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यांतही अतिवृष्टीसदृष्य पाऊस कोसळत आहे. पनवेल येथे २८४.२ मिलिमीटर पाऊस पडला. 

मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात जोरदार  कोल्हापूर, नाशिक, पुणे जिल्ह्यांतील बहुतांश भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडला. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोल्हापुरातील गगनबावडा येथे १७९ मिलिमीटर पाऊस पडला. नाशिकमधील हर्सूल १२६.२, पेठ १४३, सुरगाणा ११७.१, पुण्यातील लोणावळा कृषी १६७.१ मिलिमीटर पाऊस पडला. नगर, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात व खानदेशातही ढगाळ वातावरण आहे. 

मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार  मराठवाड्यातील बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे उशिराने पेरणी केलेल्या पिकांना आधार मिळाला. विदर्भातही अकोला, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस पडला. 

येथे झाला २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस  मोखेडा २१०.८, विक्रमगड २१५, माणगाव २०७, माथेरान २६८.४, मुरूड २७०, रोहा २०२, तळा २१०, दापोली २४३, लांजा २०५, कणकवली २४०, देवगड २००, शहापूर २००, ठाणे २१०, उल्हासनगर २००, इगतपुरी २२२. 

राज्यात सोमवारी (ता.१९) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटर) : स्त्रोत ः हवामान विभाग  कोकण : कुलाबा ४२.६, महालक्ष्मी ४६.५, सांताक्रुझ ७०.४, जव्हार १९२, पालघर ३१, तलासरी ८२, वसई ४२, वाडा १०९, अलिबाग १५८, कर्जत १९४.६, खालापूर १९५, महाड ८९, म्हसळा १५९, पेण १८०, पोलादपूर १२२, श्रीवर्धनन १६३, सुधागडपाली १६६, उरण १५१, चिपळूण ७३, गुहागर १६७, हर्णे १९०.४, खेड १४२, मंडणगड ८९, राजापूर ११८, रत्नागिरी १५१.६, संगमेश्वर ८३, वाकवली १५४, दोडामार्ग ११९, कुडाळ १४४, मालवण १९०, मुलदे (कृषी) १२७.४, सावंतवाडी १३०, वैभववाडी १७०, वेंगुर्ला १४५.८, आंबरनाथ १५३.६, भिवंडी १५५, कल्याण १८०, मुरबाड ५६. 

मध्य महाराष्ट्र : अकोले ८६, आजरा ४८, चंदगड ४३, गडहिंग्लज ४८, कागल ३२, राधानगरी ७२, त्र्यंबकेश्वर ७१,महाबळेश्वर ९७.८. 

मराठवाडा : बीड ४२.२, औंढा नागनाथ ४२, घनसांगवी ७३, मंठा  ४४, शिरूर अनंतपाळ ४५, हादगाव ३२, उमरी ४८, जिंतूर ३३.  विदर्भ : बटकुली ३०.२, चांदूरबाजार ४०.५, बल्लारपूर ४५, कोर्पणा ३९.३, सावळी ४५, वरोरा ४२.१, मारेगाव ३३, पांढरकवडा ३४. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com