agriculture news in Marathi, heavy rain in kokan and central Maharashtra, Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पाऊस

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूरात अनेक ठिकाणी सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शुक्रवारपर्यंत (ता. १७) कोकण, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक पावसाचा अंदाज आहे. आज (ता. १४) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशाराही देण्यात आला आहे. 

पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूरात अनेक ठिकाणी सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शुक्रवारपर्यंत (ता. १७) कोकण, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक पावसाचा अंदाज आहे. आज (ता. १४) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशाराही देण्यात आला आहे. 

ओडिशा आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरात सोमवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असून, मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकण्यास सुरवात झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा दणका सुरूच आहे. बुधवारपर्यंत केरळ, कर्नाटक, घाटमाथ्यावर पाऊस आणखी वाढणार आहे. मॉन्सूनचे प्रवाह वाढल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रातही पाऊस वाढणार असून, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये अति जोरदार पावसाची शक्यता अाहे. तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर समुद्र खवळणार असून, मासेमरीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे १२७ मिलिमीटर सिंधुदुर्गमधील आंबोली येथे १०५ मिमी, तर सातारा जिल्ह्यातील तापोळा येथे १४७ मिमी आणि लामज येथे १५३ मिमी पावसाची नोंद झाली.

धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने पाणीसाठा वाढत असून, अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्गही करण्यात येत आहे. तर पूर्व विदर्भातही मध्य स्वरुपाचा पाऊस झाला असून, पश्‍चिम विदर्भासह, मराठवाड्यात हलक्या पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. 

साेमवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्रोत कृषी विभाग) :
कोकण : खालापूर चौक ४३, पेण ६०, हमरापूर ४०, खामगाव ४०, खेर्डी ४६, मार्गताम्हाणे ४५, रामपूर ६५, कळकवणे ६५, शिरगांव ५७, दापोली ४९, बुरोंडी ५२, दाभोळ ५९, अंजर्ला ५१, वाकवली ६३, पालगड ४७, वेळवी ४९, खेड ४४, कुलवंडी ५१, भरणे ४८, दाभील ४५, तळवली ४९, मंडणगड ४५, देव्हरे ६३, खेडशी ४३, कोंडगाव ५४, देवरुख ४०, तुलसानी ४३, राजापूर १२७, कोंडिया ६०, ओणी ४९, भांबेड ५९, पुनस ३८, विलवडे ६०, देवगड ५४, शिरगाव ६१, बांदा ४५, अंबोली १०५, भेडशी ४२.
मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ३०, त्र्यंबकेश्‍वर ४०, शेंडी ५९, पौड ३१, घोटावडे ३२, माले ५६, मुठे ८१, पिरंगुट ३०, भोलावडे ४२, काले ६९, लोणावळा ६४, वेल्हा ४३, पानशेत ३९, राजूर ४७, आपटाळे ३५, सातारा ४३, खेड ३९, केळघर ४४, हेळवाक ७५, मरळी ३९, मोरगिरी ३१, महाबळेश्‍वर ७९, तापोळा १४७, लामज १५३, वाडी-रत्नागिरी ३३, कळे ४१, बाजार ५२, करंजफेन ६७, मलकापूर ३१, आंबा ८३, राधानगरी ६०, सरवडे ३५, आवळी ३४, राशिवडे ३८, कसबा ४३, गगनबावडा ४८, साळवण ९२, शिरोली-दुमाला ४०, खडकेवाडा ३०, मुरगुड ३८, पिंपळगाव ३३, कडेगाव ४८, कराडवाडी ५८, गवसे ४८, चंदगड ६४, नारंगवाडी ३५, तुर्केवाडी ३१, हेरे ५९.
मराठवाडा : मोघाळी ४०, मरखेल २०, वानोळा २०.
विदर्भ : मेटिखेडा २१, पाटणबोरी २०, तेलकामठी २२, गंगाझारी २४, काट्टीपूर ४९, आमगाव ३२, कवरबांध २५, सालकेसा ३८, मूल २७, बेंबळ २५, कोपर्णा २२, सावळी २९, पाथरी ३०, विहाड ३१, देऊळगाव २८, चामोर्शी ४४, कुंघाडा २९, घोट ४२, बामणी २४, पेंटीपका २१, असारळी २१, एटापल्ली २०, कासंसूर ३२, जरावंडी ३१, गाट्टा २९, धानोरा २३, चाटेगाव २५, पेंढरी २२, मुलचेरा २०, भामरागड २०. 
 


इतर अॅग्रो विशेष
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
कोरोनामुळे वाढल्या कृषी व्यापार संधीचीनच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची...
कृषी ‘समृद्धी’चा मार्गबाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...
सोशल मिडीयावर ‘#ओला_दुष्काळ’ ट्रेंडनांदेड : राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर...
`समृद्धी`वर उभारणार गोदामे, शीतगृहे पुणेः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना शेतमाल...
पुण्यातील फूल बाजाराच्या कामाला गती पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने...
राज्यात ठिकठिकणी जोरदार पाऊस पुणेः राज्यातील पावसाचा प्रभाव कमी...
केळी निर्यातीसाठी ‘बनानानेट’च्या...नागपूर: राज्यातून केळीची निर्यात वाढल्यानंतर आता...
देशातील सूतगिरण्या ९५ टक्के क्षमतेने...जळगाव ः देशातील सुमारे ७१५ सूतगिरण्या ९५ टक्के...
जिल्हानिहाय ऑनलाइन निविष्ठा परवाने वाटप...पुणे: राज्यात खते, बियाणे व कीडनाशकांच्या...
ओतूरमध्ये कांद्याला किलोला कमाल ८०...पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर बाजार समितीच्या...