agriculture news in Marathi heavy rain in Kokan and central maharashtra Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्राला झोडपले

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

अरबी समुद्र व उत्तर महाराष्ट्राच्या परिसरात झालेल्या चक्राकार वाऱ्यामुळे मुंबईसह कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत धुव्वाधार पाऊस झाला.

पुणे ः अरबी समुद्र व उत्तर महाराष्ट्राच्या परिसरात झालेल्या चक्राकार वाऱ्यामुळे मुंबईसह कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत धुव्वाधार पाऊस झाला. सांताक्रुझ येथे सर्वाधिक २६८.२ तर कुलाबा येथे २५२.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी जोरदार ते मध्यम पावसाने हजेरी लावली. तर, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. पावसामुळे या भागातील नदीनाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. 

दरम्यान, सोमवारी (ता.३) रात्री अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने मुंबई व उपनगरांतील सर्व शासकीय कार्यालयांना मंगळवारी (ता.४) सुट्टी जाहीर केली होती.   

गेल्या काही दिवसांपासून कोकणातील काही भागात पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, सोमवारपासून सर्वच जिल्ह्यांत वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी दिवसभर पाऊस सुरू होता. वाऱ्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील दांडेली फणसमाडे येथील देवेंद्र माणगावकर यांच्या घरावर झाड कोसळले. त्यामुळे तेथील वीजेचे खांब देखील मोडला.

वीजवाहिन्या कोसळून पडल्या. याशिवाय वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा-आडारी मार्गावरील आडारी पुलावर भगदाड पडल्यामुळे हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला होता. जिल्ह्यात पावसाचा सर्वाधिक जोर सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, वैभववाडी, कणकवली या तालुक्यांमध्ये आहे. सह्याद्रीपट्ट्यात पावसाचा जोर अधिक असून त्या भागातील नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातही जोर
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यांच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने दमदार हजेरी लावली. नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पूर्वेकडील भागातही मंगळवारी (ता.४) दिवसभर कमी अधिक स्वरूपात पावसाच्या सरी पडत होत्या. पाऊस आणि वाऱ्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. कोल्हापुरातील गगनबावडा येथे १४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

धरणांमध्ये पाणीसाठा वाढला
कोयना व अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. पंचगंगा नदीवरील इचलकरंजी, शिंगणापूर व रूई, भोगावती नदीवरील खडक कोगे व वारणा नदीवरील-चिंचोली असे एकूण पाच बंधारे पाण्याखाली आहेत. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. धरण क्षेत्रातील कोयना, नवजा व महाबळेश्वर येथे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे कोयना धरणासह, धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी, निरा- देवघर, भाटघर, वीर या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव, सोलापूर या भागात हवामान ढगाळ असून तुरळक ठिकाणी पावसाचा  शिडकावा झाला.  

मराठवाड्यात शिडकावा
गेल्या आठवड्यात मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी या भागात बऱ्यापैकी पावसाने हजेरी होती. मात्र, रविवारपासून या भागात पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली आहे. सध्या या भागात हवामान ढगाळ असले तरी बीड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांत अधूनमधून ऊन पडत आहे. तर जालना, उस्मानाबाद, लातूर तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद पिकांना दिलासा मिळाला आहे. काही ठिकाणी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.  

विदर्भात मध्यम पाऊस 
जुलै महिना संपला तरी पाऊस पडत नसल्याने पश्चिम विदर्भातील वर्धा, वाशीम, अकोला या भागात पिके धोक्यात आली होती. मात्र सोमवारी पश्चिम भागात कमी अधिक स्वरूपात पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकांना जीवदान मिळणार आहे.
मंगळवारीही दिवसभर हवामान ढगाळ होते. तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. विदर्भातील पूर्व भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. गोंदियातील सडकअर्जुनी येथे सर्वाधिक पाऊस पडला.

१५० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणी
कुलाबा २५२.२, सांताक्रुझ २६८.२,  वसई १७५,  भिरा १६७,  माणगाव १६०,  म्हसळा १६५, पोलादपूर १९७, रोहा १९८, सुधागडपाली १६०, मंडणगड १६५,  रत्नागिरी १५६.६ , महाबळेश्वर १८०.८.

 पावसाने दिलासा

  •   पावसामुळे खरीप पिकांना दिलासा
  •   नद्या-नाले ओसंडून वाहले
  •   धरणांत पाण्याची आवक वाढली 
  •   ठिकठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत
  •   कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी
  •   मुंबई व उपनगरातील शासकीय कार्यालयांना मंगळवारी सुट्टी

मंगळवारी (ता.४) सकाळी आठ वाजेपर्यत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये
कोकण : कुलाबा २५२.२, सांताक्रुझ २६८.२, डहाणू ६१.४, जव्हार २०.०, पालघर ४६.८, वसई १७५, विक्रमगड २६.५, वाडा ३१, अलिबाग ९२.८, भिरा १६७, कर्जत ६०.६, खालापूर ६५, महाड ९७, माणगाव १६०, माथेरान ८७, म्हसळा १६५, मुरूड ९२, पनवेल ७२.८, पेण ६०, पोलादपूर १९७, रोहा १९८, श्रीवर्धन ९८, सुधागडपाली १६०, तळा १२६, उरण १३४, चिपळूण १२९, दापोली १४०, गुहागर १४०, हर्णे ७२.८, खेड १०३, लांजा ११०, मंडणगड १६५, राजापूर १२१, रत्नागिरी १५६.६, संगमेश्वर १४०, देवगड ८४, दोडामार्ग १३३, कणकवली ९२, कुडाळ ११४, मालवण ८०, रामेश्वर ११४.६, सावंतवाडी १४०, वैभववाडी १२८, वेंगुर्ला १२८.४, अंबरनाथ ८४.५, भिवंडी ७५, कल्याण ९०, ठाणे १२६, उल्हासनगर १०१.
मध्य महाराष्ट्र :  आजरा ८५, चंदगड ९३, गगणबावडा १४६, राधानगरी ९४, भोर ४०, लोणावळा कृषी ८३, वेल्हे ६५, महाबळेश्वर १८०.८, पाटण ४४.
मराठवाडा :  माहूर २३,
विदर्भ ः लाखंदूर ३९.२, साकोली ५०.६, ब्रह्मपुरी ३६.४, अहेरी ३६.८, अरमोरी ४५.४, भामरागड ३९.१, देसाईगंज ४६, गोरेगाव ३६.६, सडकअर्जुनी ६८.२, तिरोरा ४७,२, पारशिवणी ४७.९


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...
बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग...नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...