कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण 

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर व घाटमाथ्यावर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर कोल्हापुरातील गगनबावडा येथे २८१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.
rain 17 june
rain 17 june

पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर व घाटमाथ्यावर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर कोल्हापुरातील गगनबावडा येथे २८१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत अजूनही जोरदार पाऊस न झाल्याने चांगलीच ओढ दिली आहे. 

सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत मागील चार ते पाच दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. काही ठिकाणी जवळपास २५० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडत असल्याने ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. नगर, पुणे, सातारा, सांगली, नाशिक जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात पावसाचा शिडकावा होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून, काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. 

मराठवाड्यात पेरण्या खोळंबल्या  मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना या जिल्ह्यांत अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. तर परभणी, नांदेड, लातूर, उस्नानाबाद, हिंगोली या जिल्ह्यांतही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. 

पश्‍चिम विदर्भात पावसाची प्रतीक्षा  पूर्व विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली आहे. मात्र पश्‍चिम विदर्भात जोरदार पाऊस झालेला नाही. येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास वेळेवर पेरण्या होतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.  राज्यात गुरुवारी (ता.१७) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटर) : स्रोत ः हवामान विभाग  कोकण : सांताक्रूझ ३१.४, महाड ६७, माथेरान ८१, मुरूड ९९, पनवेल ५२.६, पेण ३६, पोलादपूर ७८, रोहा ५३, सुधागड पाली ५२, तळा ८४, उरण ७८, गुहागर ७५, मंडणगड ७९, रत्नागिरी ६४.६, देवगड ८७, मालवण ७०, सावंतवाडी ८९, वेंगुर्ला ९०.४, ठाणे ४८. 

मध्य महाराष्ट्र : भाडगाव ३०, भुसावळ ४७.२, जळगाव ३६, पारोळा ४७, यावल ७०, गडहिंग्लज ८७, करवीर ८५.३, शाहूवाडी ६५, गिरणाधरण ४१.४, सांगली ८५.२, कराड ९५, सातारा ५१.७. 

मराठवाडा : सोयगाव ६०, औंढा नागनाथ ३५, भूम ३०, पूर्णा ४३. 

विदर्भ : पवनी २३.६, बुलडाणा २३.८, चिखली २८.७, सेलू २३.  शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेली ठिकाणे   कुलाबा १०२, माणगाव १०१, श्रीवर्धन १००, चिपळूण १७१, हर्णे १९९.६, खेड १५१, लांजा १३०, राजापूर १९६, संगमेश्‍वर ११०, दोडामार्ग १३७, कणकवली १४७, कुडाळ १२८, मुलदे (कृषी) १३३.२, वैभववाडी १६१, महाबळेश्‍वर २११.८, आजरा १८१, चंदगड १६०, राधानगरी १७२.  कोल्हापुरातील ४७ बंधारे पाण्याखाली  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून उपलब्ध माहितीनुसार गुरुवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत दहा नद्यांवरील ४७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये पंचगंगा नदीवरील सात, भोगावती नदीवरील दोन, तुळशी, वारणा आणि कुंभी नदीवरील प्रत्येकी चार, दूधगंगा व कासारी नदीवरील प्रत्येकी एक, वेदगंगा नदीवरील आठ, हिरण्यकेशी नदीवरील सात आणि घटप्रभा नदीवरील सहा बंधारे पाण्याखाली आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com