agriculture news in Marathi heavy rain in Kokan and Marathwada Maharashtra | Agrowon

कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 जून 2021

राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मराठवाडा व विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस होत आहे.

पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मराठवाडा व विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस होत आहे. रत्नागिरी येथे २४३.५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. 

सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये पावसाचा प्रभाव अधिक असल्याने दरडी कोसळल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. जोरदार पावसामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले असून धरणांत नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे. ठाणे, पालघर, मुंबई परिसरात पावसाचा जोर कमी असला तरी तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. मध्य महाराष्ट्रात कडक ऊन पडत आहे. काही भागांत पावसाचा शिडकावा होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून अनेक ठिकाणी तुरळक सरी पडल्याची स्थिती आहे. 

मराठवाड्यात पाऊस 
मराठवाड्यात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर भागांत पाऊस होत असला तरी जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. धर्माबाद येथे ८५ मिलिमीटर पाऊस पडला. तर परभणी येथे ७२.८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. 

विदर्भात जोर ओसरला 
विदर्भात पावसाचा जोर ओसरला आहे. काही ठिकाणी तुरळक सरी पडत असल्याने पेरणीच्या कामांची 
चांगलीच लगबग सुरू आहे. यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ जिल्हयात हलक्या सरी कोसळत आहे. अर्णी, बल्लारपूर, गोंडपिंपरी, उमरखेड या मंडळात पावसाच्या मध्यम ते जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे अजूनही धरणसाठ्यात वाढ झालेली नाही. 

सोमवारी (ता.१४) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय पाऊस (मि.मी.)मध्ये : स्त्रोत ः हवामान विभाग 
कोकण : महाड ५७, माणगाव ८३, म्हसळा ९०, पेण ५६, पोलादपूर ६५, सुधागडपाली ३३, तळा ६५, , गुहागर ९०, हर्णे ५४.४, खेड ५३, लांजा ९५, मुलगुंद ५५, संगमेश्वर ९५, देवगड ३५, कुडाळ ७०, मालवण ४९, वैभववाडी ३७. 

मध्य महाराष्ट्र : आजरा २२, चंदगड ४५, गगणबावडा ५१. 

मराठवाडा : वसमत ३०, अहमदपूर ५५, चाकूर ३४, देवणी ३२, अर्धापूर ३८, भोकर ६६, धर्माबाद ८५, हादगाव ६४, 
किनवट ५४, माहूर ५०, मुदखेड ३४, उमरी ४२, जिंतूर ४१, पालम ३५, परभणी ७२.८. 

विदर्भ : बल्लारपूर ५२.४, चंद्रपूर ३४.६, गोंडपिंपरी ५०, जेवती २७, अर्णी ८१.५, घाटंजी २८.८, उमरखेड ३९.९. 

शंभर मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झालेली ठिकाणे 
रत्नागिरी २४३.५, राजापूर १२९, दापोली १११दोडामार्ग १२४, कणकवली १३५, मुलदे (कृषी) १०९.४, सावंतवाडी १२०.८. 


इतर बातम्या
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...