agriculture news in Marathi, Heavy rain in Kokan and west Maharashtra | Agrowon

कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

पुणे : कोकण, घाटमाथा व मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी धरणे तुडुंब भरली असून विसर्ग सुरूच आहे. कोकणातही पावसाचा जोर कायम आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. तर सिंधुदुर्गमधील सावंतवाडी येथे सर्वाधिक १८० मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर वेंगुर्ला, भिरा, मुल्दे, कुडाळ, चिपळूण, दोडामार्ग, कणकवली, सुधागड, पोलादपूर, महाड, मालवण, मंडणगड येथेही मुसळधार पाऊस पडला.

पुणे : कोकण, घाटमाथा व मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी धरणे तुडुंब भरली असून विसर्ग सुरूच आहे. कोकणातही पावसाचा जोर कायम आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. तर सिंधुदुर्गमधील सावंतवाडी येथे सर्वाधिक १८० मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर वेंगुर्ला, भिरा, मुल्दे, कुडाळ, चिपळूण, दोडामार्ग, कणकवली, सुधागड, पोलादपूर, महाड, मालवण, मंडणगड येथेही मुसळधार पाऊस पडला. तसेच ताम्हीणी, दावडी, शिरगाव, अंबोणे, लोणावळा, शिरोटा, वळवण या घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस पडला. 

मराठवाड्यातही पावसाचा जोर काही प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे कंधार, मुखेड येथे सर्वाधिक ७० मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर नायगाव, बिल्लोळी, देगलूर, पालम, गंगाखेड, मानवत, लोहा, जळकोट, लोहारा, अमहदपूर, परळी वैजनाथ, उमरी, परतूर, उमरगा, खुलताबाद, सोनपेठ या ठिकाणीही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. 

विदर्भातील अनेक भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. धरणी येथे सर्वाधिक १३० मिलिमीटर पाऊस पडला. तर धानोरा, गोंदिया, अकोट, गडचिरोली, मलकापूर, भामरागड, गोंदिया, कुरखेडा, चिखलदा, संग्रमापूर, आमगाव येथे मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. 

अरबी समुद्र ते केरळ या दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच मध्य महाराष्ट्र ते केरळ यादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. विदर्भ व छत्तीसगड या भागातही कमी दाबाचे क्षेत्र आहे. यामुळे आज (शुक्रवारी) कोकण, मध्य महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता आहे.

गुरुवारी (ता. ८) सकाळी साडेआठपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्रोत - हवामान विभाग)
कोकण ः सावंतवाडी १८०, वेंगुर्ला १७०, भिरा १४०, मुल्दे १४०, कुडाळ १३०, चिपळूण ११०, दोडामार्ग, कणकवली, सुधागड १००, पोलादपूर, महाड ८०, मालवण, मंडणगड ७०, खेड, लांजा ६०, वाकवली, मानगाव ५०, गुहागर, संगमेश्वर देवरूख, तला, कर्जत ४०

मध्य महाराष्ट्र ः महाबळेश्वर २७०, चांदगड २१०, राधानगरी १९०, गगनबावडा १७०, आजरा, गारपोटी, बुदरगड १५०, शाहूवाडी ११०, पन्हाळा, पाटण, त्र्यंबकेश्वर, वेल्हे, लोणावळा, धडगाव ९०, जावळी मेढा, यावल, गडहिग्लज ८०, पड, शिराळा, मुक्ताईनगर, भुसावळ ७०, कागल ६०, इगतपुरी, वाई, वाळवा, पेठ, रावेर ५०, हातकणंगले, कडेगाव, भोर, कोल्हापूर, खेड, कराड, सिंदखेडा, सुरगाणा, बोदवड ४०

मराठवाडा ः कंधार, मुखेड ७०, नायगाव ६०, बिल्लोळी ५०, देगलूर, पालम, गंगाखेड, मानवत, लोहा, जळकोट ४०, लोहारा, अमहदपूर, परळी वैजनाथ, उमरी, परतूर, उमरगा, खुलताबाद, सोनपेठ ३०, पाथरी, धर्माबाद, सेलू, पुर्णा, तुळजापूर, घनसांगवी, नांदेड, गेवराई, माहूर २०.

विदर्भ ः धरणी १३०,धानोरा ८०, गोंदिया ७०, अकोट, गडचिरोली ६०, मलकापूर, भामरागड, गोंदिया, कुरखेडा, चिखलदा, संग्रमापूर ५०, आमगाव ४०.
घाटमाथा ः ताम्हिणी २९०, दावडी २८०, शिरगाव २१०, अंबोणे १८०, लोणावळा, शिरोटा १००, वळवण ९०, वाणगाव, खांड ६०, ठाकूरवाडी, डुंगरवाडी ५०, खोपोली ३०, भिवपुरी २०.

 


इतर अॅग्रो विशेष
शेतकरी कंपन्यांचाही ‘ई-नाम’मध्ये समावेश नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर...
राज्यात उन्हाचा चटका वाढला पुणे: एप्रिल महिना सुरू होताच राज्यात उन्हाच्या...
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ३० हजार...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरटंचाई...
कोल्हापुरात तीस हजार ऊस तोडणी कामगार...कोल्हापूर: जिल्ह्यातील सुमारे तीस हजार ऊस तोडणी...
औरंगाबादमध्ये २९ टन मालाची थेट विक्रीकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद शहरात 'शेतकरी...
कोरोनामुळे कृषी पर्यटन व्यवसाय अडचणीत सातारा : कोरोनाच्या संसर्गामुळे दिवसेंदिवस बळी...
संकटावेळी तरी पंतप्रधानांनी गंभीर...मुंबई : देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून...
‘कोरोना विरोधात जाणिवेसाठी रविवारी...पुणे : ‘‘कोरोना विरोधात उभारलेल्या लढ्याची...
कोरोनाच्या निदानासाठीच्या ‘मायलॅब'ला...पुणे ः देशातील कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाच्या...
कांदा विक्रीसाठी ‘पणन’चे प्रयत्नपुणे: कोरोना लॉकडाऊनमध्ये शेतमालाची पुरवठा साखळी...
दूध संकलनास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई...वर्धा ः  दूध संकलनास टाळाटाळ करणाऱ्या दूध...
पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यात भूकंपाचे...मुंबई: पालघर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून...
मोसंबी मागणीअभावी बागेतचऔरंगाबाद: परिपक्व झालेल्या मोसंबीच्या मृग...
लॉकडाऊनमुळे ‘निविष्टा’ कंपन्यांची उधारी...पुणे: लॉकडाऊनमुळे राज्यातील खते, बियाणे व कीडनाशक...
तीन दिवसांत एक हजार वीस टन द्राक्ष ...पुणे ः कोरोना विषाणूमुळे राज्यातील द्राक्ष...
विदर्भ, मराठवाड्यात पुर्वमोसमी पावसाचा...पुणे : राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने...
हरभरा खरेदीच्या नोंदणीसाठी मुदतवाढमुंबई: किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमी...
हापूसच्या निर्यातीसाठी युद्धपातळीवर...मुंबई: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
लॉकडाऊन संपल्यानंतर राज्यांनी गर्दी...मुंबई : लॉकडाऊन संपविल्यानंतर १५ एप्रिलला लगेच...
रासायनिक खतांचा काळाबाजार होईल; गाफील...पुणे: “देशात रासायनिक खतांचा मुबलक साठा आहे....