कोकणात पावसाचा जोर

पाऊस
पाऊस

पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोकणात पावसाचा जोर कायम आहे. गुरुवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे जिल्ह्यांतील अनेक भागांत जोरदार पाऊस होता. पडेल येथे सर्वाधिक १६५.५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली, तर कोकणातील अनेक ठिकाणी ७० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडल्याची नोंद झाली. येत्या दोन ते तीन दिवस कोकणात पावसाचा जोर कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसतील, तर अधूनमधून ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहील. मॉन्सून दाखल झाल्यानंतर कोकणात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. ठाणे व पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी असला तरी काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील अनेक भागांत पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.  काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. तर आंबलोली, हेदवी, म्हाप्रळ, देव्हारे, रत्नागिरी, खेडशी, पावस, जयगड, फसोप, कोतवडे, मालगुंड, तरवल, पाली, माखजन, फुंणगुस, देवळे, तुळसानी, माभळ, राजापूर या ठिकाणी जोरदार पाऊस पडला.  मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नगर, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील अनेक भागांत पावसाच्या सरी बरसत होत्या. तर पूर्व पट्ट्यात ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता. अनेक भागात हवामान ढगाळ असल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केल्याचे दिसून येते, तर खान्देशातील धुळे, नंदुरबार जळगाव या जिल्ह्यांतही पावसाने चांगलीच हजेरी लावली.  वाडेगव्हाण, कोळेगाव, एैनपूर या ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाने चांगलीच हजेरी लावली. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड या जिल्ह्यांत हवामान ढगाळ असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भातही हवामान अंशत ढगाळ होते. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला असून शेतकर्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. यामुळे कमाल तापमानात घट झाली असली उकाड्यात मात्र वाढ झाल्याचे दिसून येते.   कोकण विभाग ठाणे : देहरी ७२.५,अलिबाग ४२.०, किहीम ४०.५, चौल ३६, खोपोली ३०, बिरवडी ४५.३, करंजवडी ४७.८, पोलादपूर ४५.८, कोंडवी ५५.८, वाकण ५९.०, बोरलीपंचटण ४३.८, म्हसळा ४३.८, खामगाव ३४.५, चिपळूण ५४.५ , खेर्डी ५३.५, मार्गताम्हाणे ३३.३, वहाळ ५४.५, सावर्डे ४०.५, शिरगांव ४९.५,दापोली ४२.८, आंजर्ले ३५.८, वाकवली ५२.५,  पालगड ५५.०, वेळवी ६१.५,खेड ४२.८, शिर्शी ५९.०, आंबवली ५६.३, कुळवंडी ४५.५, दाभीळ ३१.८, धामणंद ७७.३, गुहाघर ३३.५, तळवली ४०.३, आंबलोली १०३.८,  हेदवी ८०.३. मंडणगड ३६.३, म्हाप्रळ ७०.०, देव्हारे९७.३, रत्नागिरी १२८.०, खेडशी ९४.०, पावस १३७.८, जयगड ७१.०, फसोप १२८.५, कोतवडे १२१.३, मालगुंड १०२.३,  तरवल ९४.५, पाली ७६.०, मुरडव ३०.५, माखजन ४२.५, फुंणगुस ६५.३, देवळे ४४.८, देवरुख ३७.५, तुळसानी ६३.०, माभळ ८९.०, राजापूर ११८.५, सौंदळ ४७.०,  कोंडये ६०.५, जैतापूर १३४.३, कुंभवडे ७१.८, नाटे १३६.३, ओणी ७१.०, पाचल ६०.५, लांजा ३५.०,पुनस ५४.८, साटवली १३५.५, विलवडे ४०, पडेल १६५.५, शिरगाव ९९.०,  पाटगाव ६६.०, बापरडे ७६.५., मालवण १४१.५, पेंडूर ९७.८, मासुरी ९८.०, श्रावण ८६.५, आचरा १०३.८, अमबेरी १५२.०, पोइप ७०.८, सावंतवाडी ८७.०,आजगाव ४७.०,  अंबोली ४३.३, मदुरा ४०.०, वेंगुर्ला ११४.८, शिरोडा ८५.३, म्हापण ९४.५, वेटोरे १०८.५, कुडाळ ९८.८, कडवल ७२.५, कसाल ५७.३, वलवल १२९.३, पिंगुली ९४.८, भेडशी ८३.०. मध्य महाराष्ट्र ः कौलाने  ३३.०, नांदगाव ४५.०, मनमाड ६१.३, वेहेलगाव ४४.०, हिसवल ७८.३, नाशिक ३६.०, इगतपुरी ५५.८, घोटी ३७.८, रायपूर ५६.८,  लामकाणी ३२.८, कासारे ३९.३, म्हसदी ३८.०,  खिर्डी ३७.०, ऐनपूर ६५.०, मुक्ताईनगर ४१.३, अंतुर्ली ६१.३, शिरसगाव ४७.३, मेहुणबारे ४४.८, खडकी ४४.८.  मालदाभाडी ४५.३,  केडगाव ३६.३, वाळकी ४८.५, चास ३०.५, रुईछत्तीसी ३३. सुपा ४३.०, वाडेगव्हाण ६७.३, मांडवगण ३९.०, देवदैठण ४९.३, कोळेगाव ६१.३.  कर्जत ३३.८, राहूरी ४९.५, देवळाली ४६.०, वेळू २८.८, आंबेगाव २४.०, सुपा ३४.३, वरवंड ३७.८, जावळीमेढा ४६.३, बामणोली ४७.३, केळघर ४१.३, पसरणी ३९.३, महाबळेश्‍वर ३२.३,  तापोळा ६४.८, लामज ५४.८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com