कोकणात मनसोक्त बरसला पाऊस

कोकण पाऊस
कोकण पाऊस

पुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकणात धुवाधार पाऊस पडत आहे. शनिवारी (ता. २९) कोकणात पन्नासहून अधिक ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक, तर ७ ठिकाणी ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम भागातही जोरदार सरी कोसळल्या. मराठवाडा, विदर्भात बहुतांशी ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.     मॉन्सून दाखल झाल्यानंतर कोकण वगळता राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झाला आहे. तर मुंबईसह कोकणातील सर्वच जिल्ह्यांत पावसाने धुव्वाधार हजेरी लावली असून, अनेक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. घाटमाथा आणि सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे धरणांना पाणीपुरवठा करणाऱ्या भागातून झारे, ओहळ, नदी, नाले वाहण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे तळाशी गेलेल्या धरणांच्या पाणी पातळीत लवकरच वाढ होणार आहे. मात्र समाधानकारक पाणीसाठ्यासाठी आणखी जारेदार पावसाची आवश्यकता आहे. 

शनिवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : कृषी विभाग)       कोकण : ठाणे २४५, बलकुम २६८, मुंब्रा २३४, दहिसर २३७, बेलापूर ३००, अप्पर २३६, ठाकुरली २०१, देहरी २३२, भिवंडी २३१, अंगाव २१७, खारबाव २२६, अंबरनाथ २०४, पनवेल ३०८, पवयंजे २६३, ओवले ३०७, कर्नाळा ३२२, तलोजे २६८, मोराबी २५९, कर्जत २६६, नेरळ २४१, कडाव २०३, कळंब २४२, कशेले २२६, खानापूर चौक ३२५, वौशी २१३, खोपोली ३०८, जसई २१८, जांभूळपाडा २३१, पेण २२९, कामरली २३४, रोहा २०७, कोलाड २२३, वसई २३३, मांडवी २६७, अगशी २३३, निर्मल २५७, विरार ३२९, मानिकपूर २७१, डहाणू २०४, मालयण २३३, कसा २२२, चिंचणी २२९, पालघर २६९, मनवर २५८, बोयसर २७१, सफला २७७, अगरवाडी २४९, झरी २०१.

मध्य महाराष्ट्र : चिंचवड ९७, पौड ९८, माले १५०, मुठे १६८, पिरंगुट ९०, वडगाव मावळ १३१, तळेगाव १३६, काले १५२, कार्ला २४२, खडकाळा १८४, लोणावळा २४०, शिवणे १३६, पानशेत ९४, विंझर १०३, चाकण ९१, पाईट १०९, कडुस ८२, आंबेगाव १२३, बामनोली ८१, हेळवाक ११६, मोरगिरी ८७, महाबळेश्‍वर १६७, लामज ८१, आंबा ८६, गगनबावडा ११२.

मराठवाडा : भोकरदन ३०, राजूर ५७, शेवळी ३९, जामखेड ३१, कुंडलवाडी ३२, लोहगाव ३६, कंधार ४८, कुरूळा ३७, फुलवळ ३१, बारूळ ३१, मोघाळी ३२, नरसी ४१, माजंरम ४७, पालम ३१.

विदर्भ : शेलगाव ३०, हिरडव ३६,  पिंपळगाव ३३, शेलापूर ४९, हिवरखेड ७९, वारळा ३५, वाकद ४१, केनवड ३९, जऊळका ३६, शेलू बाजार ६२, पार्डी ४६, उमरी ४५, उमरखेड ३२, नाकडोंगरी ३२, शिवरा ३२, मिटेवणी ४३, गाऱ्हा ३१.८, तिरोडा ४३, चंद्रपूर ८१, घुगस ७२, पडोली ५८, गोंडपिंपरी ५९, भिसी ४०, राजूरा ३३, कोपर्णा १४४, गडचांदूर ९१, सावळी ५९, पाथरी ७७, बल्लारपूर ६४, पाटण ६५, पोरळा ७०, येवळी ४५. 

कोकणात ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे  विरार ३२९ (पालघर), खानापूर चौक ३२५, कर्नाळा ३२२, पनवेल ३०८, खोपोली ३०८, ओवले ३०७, (रायगड), बेलापूर ३०० (ठाणे).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com