agriculture news in Marathi, heavy rain in Kokan, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कोकणात मनसोक्त बरसला पाऊस
टीम अॅग्रोवन
रविवार, 30 जून 2019

पुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकणात धुवाधार पाऊस पडत आहे. शनिवारी (ता. २९) कोकणात पन्नासहून अधिक ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक, तर ७ ठिकाणी ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम भागातही जोरदार सरी कोसळल्या. मराठवाडा, विदर्भात बहुतांशी ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.   

पुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकणात धुवाधार पाऊस पडत आहे. शनिवारी (ता. २९) कोकणात पन्नासहून अधिक ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक, तर ७ ठिकाणी ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम भागातही जोरदार सरी कोसळल्या. मराठवाडा, विदर्भात बहुतांशी ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.   

 मॉन्सून दाखल झाल्यानंतर कोकण वगळता राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झाला आहे. तर मुंबईसह कोकणातील सर्वच जिल्ह्यांत पावसाने धुव्वाधार हजेरी लावली असून, अनेक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे.

घाटमाथा आणि सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे धरणांना पाणीपुरवठा करणाऱ्या भागातून झारे, ओहळ, नदी, नाले वाहण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे तळाशी गेलेल्या धरणांच्या पाणी पातळीत लवकरच वाढ होणार आहे. मात्र समाधानकारक पाणीसाठ्यासाठी आणखी जारेदार पावसाची आवश्यकता आहे. 

शनिवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : कृषी विभाग)     
कोकण : ठाणे २४५, बलकुम २६८, मुंब्रा २३४, दहिसर २३७, बेलापूर ३००, अप्पर २३६, ठाकुरली २०१, देहरी २३२, भिवंडी २३१, अंगाव २१७, खारबाव २२६, अंबरनाथ २०४, पनवेल ३०८, पवयंजे २६३, ओवले ३०७, कर्नाळा ३२२, तलोजे २६८, मोराबी २५९, कर्जत २६६, नेरळ २४१, कडाव २०३, कळंब २४२, कशेले २२६, खानापूर चौक ३२५, वौशी २१३, खोपोली ३०८, जसई २१८, जांभूळपाडा २३१, पेण २२९, कामरली २३४, रोहा २०७, कोलाड २२३, वसई २३३, मांडवी २६७, अगशी २३३, निर्मल २५७, विरार ३२९, मानिकपूर २७१, डहाणू २०४, मालयण २३३, कसा २२२, चिंचणी २२९, पालघर २६९, मनवर २५८, बोयसर २७१, सफला २७७, अगरवाडी २४९, झरी २०१.

मध्य महाराष्ट्र : चिंचवड ९७, पौड ९८, माले १५०, मुठे १६८, पिरंगुट ९०, वडगाव मावळ १३१, तळेगाव १३६, काले १५२, कार्ला २४२, खडकाळा १८४, लोणावळा २४०, शिवणे १३६, पानशेत ९४, विंझर १०३, चाकण ९१, पाईट १०९, कडुस ८२, आंबेगाव १२३, बामनोली ८१, हेळवाक ११६, मोरगिरी ८७, महाबळेश्‍वर १६७, लामज ८१, आंबा ८६, गगनबावडा ११२.

मराठवाडा : भोकरदन ३०, राजूर ५७, शेवळी ३९, जामखेड ३१, कुंडलवाडी ३२, लोहगाव ३६, कंधार ४८, कुरूळा ३७, फुलवळ ३१, बारूळ ३१, मोघाळी ३२, नरसी ४१, माजंरम ४७, पालम ३१.

विदर्भ : शेलगाव ३०, हिरडव ३६,  पिंपळगाव ३३, शेलापूर ४९, हिवरखेड ७९, वारळा ३५, वाकद ४१, केनवड ३९, जऊळका ३६, शेलू बाजार ६२, पार्डी ४६, उमरी ४५, उमरखेड ३२, नाकडोंगरी ३२, शिवरा ३२, मिटेवणी ४३, गाऱ्हा ३१.८, तिरोडा ४३, चंद्रपूर ८१, घुगस ७२, पडोली ५८, गोंडपिंपरी ५९, भिसी ४०, राजूरा ३३, कोपर्णा १४४, गडचांदूर ९१, सावळी ५९, पाथरी ७७, बल्लारपूर ६४, पाटण ६५, पोरळा ७०, येवळी ४५. 

कोकणात ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे 
विरार ३२९ (पालघर), खानापूर चौक ३२५, कर्नाळा ३२२, पनवेल ३०८, खोपोली ३०८, ओवले ३०७, (रायगड), बेलापूर ३०० (ठाणे).

इतर अॅग्रो विशेष
विमा कंपन्यांचे आस्ते कदम; पंचनाम्याकडे...पुणे : राज्यातील लाखो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त...
अकोला, बुलडाण्याला खरिपात ७२५ कोटींचा...अकाेला ः गेल्या महिन्यात झालेल्या संततधार पाऊस व...
पावसाचा मराठवाड्यात ४१ लाख हेक्‍टर...औरंगाबाद : मराठवाड्यात मॉन्सूनोत्तर पावसाने...
ग्रामपरिवर्तनाची दिशा दाखविणारे शेंदोळा...जन्म, मृत्यू, विवाहनोंदणी प्रमाणपत्र हवे असेल; तर...
रत्नागिरी : गतवर्षीच्या तुलनेत भात...रत्नागिरी ः अतिवृष्टीमुळे कोकणातील शेतकरी चांगलाच...
दक्षिण आफ्रिकेतील 'मालावी हापूस'...पुणे  ः दक्षिण आफ्रिकेतील मालावी प्रांतात...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागांना आता...सांगली ः गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी...
राज्यात रब्बीसाठी सव्वासहा हजार शेतीशाळापुणे : रब्बी हंगामात राज्यात सव्वासहा...
केंद्र सरकारकडून एक लाख टन कांदा...पुणे: मॉन्सूनचा वाढलेला मुक्काम, अतिवृष्टी,...
बाजार समित्या बरखास्त करणार : केंद्रीय...नवी दिल्ली : बाजार समित्यांची कार्यपद्धती आणि...
राज्य झाले टॅंकरमुक्त; केवळ बुलडाण्यात...पुणे: मॉन्सून आणि मॉन्सूनोत्तर काळात राज्यात...
केसर आंब्याचे उत्पादन ४५ टक्के घटणार;...औरंगाबाद : गंध आणि चवीसाठी केसर आंब्याची आपली...
किमान तापमानात चढ-उतारपुणे: मॉन्सूनोत्तर पावसाने उघडीप दिल्यानंतर...
अवर्षणग्रस्त माळरानावर फुलवली प्रगतशील...नगर जिल्ह्यात कायम अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील...
साठ देशी गायींच्या संवर्धनाचा आदर्शपुणे जिल्ह्यातील मंचर येथील सोनेचांदीचे पारंपरिक...
साखर निर्यातीला डिसेंबरपर्यंत मुदतवाढकोल्हापूर : पावसाळी स्थितीमुळे निर्यात न होऊ...
काजू उत्पादन ३० टक्क्यांनी घटणारसिंधुदुर्ग : जुलै, ऑगस्टमध्ये झालेली अतिवृष्टी,...
द्राक्ष बागांचे पंचनामे करताना दिशाभूलनाशिक  : द्राक्ष बागांचे पंचनामा केल्यास...
कृषी कौशल्य प्रशिक्षणांद्वारे उभी...केंद्र शासनाची प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना २....
गारठा वाढला; नगर येथे नीचांकी तापमानपुणे  : उत्तरेकडून येणारे थंड वारे,...