कोकणात अतिवृष्टी 

कोकणात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मध्य महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली.
rain
rain

पुणे : कोकणात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मध्य महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर सांताक्रूझमध्ये सर्वाधिक २३२ मिलिमीटर, तर ठाणेमध्ये २२८ मिलिमीटर पाऊस पडला. यामुळे मुंबईत वाहतूक कोंडी, तर इतर भागांत झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतातील कामे सुरू केली आहे. 

पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, सोलापूर, धुळे, जळगाव, नगर जिल्ह्यांच्या विविध भागांत पावसाचे आगमन झाले. नगरमधील श्रीरामपूर, राहाता, अकोले, संगमनेर, नगरसह अन्य तालुक्यांमध्ये मॉन्सूनने हजेरी लावली आहे. भंडारदरा आणि मुळा पाणलोटात गत दोन दिवसांपासून मॉन्सूनने हजेरी लावली. यामुळे भंडारदरा पाणलोटातील धबधबे आणि ओढेनाले खळखळू लागले आहेत. या धरणात नवीन पाण्याची आवकही सुरू झाली आहे. नुकतेच झालेल्या पावसाने भंडारदरा धरणात नव्याने २१ दलघफू पाण्याची आवक झाली. तर ७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मुळा पाणलोटातही पावसास सुरुवात झाली आहे. कळसूबाई शिखर, हरिश्‍चंद्र गड व आंबितमध्ये पावसामुळे ओढेनाले सक्रिय झाले आहेत. पाऊस होत असल्याने करोनातून मुक्त झालेला शेतकरी आता मशागतीच्या कामांत गुंतला आहे. नाशिक जिल्ह्यातील अंगुलगाव (ता. येवला) येथे झालेल्या जोरदार पावसामुळे शिवारातील पाझर तलाव पूर्ण भरले. झालेल्या पावसामुळे शिवारात ओढे नाले भरून वाहिले. 

कोकणातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी भात मशागतीच्या कामांत व्यक्त आहे. काही ठिकाणी भात रोपवाटिकेची वेगाने तयारी सुरू झाली असून, भात रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिकेत बियाणे टाकण्याचे कामे वेगाने सुरू झाली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील गोळेगाव परिसरात विजांचा कडकडासह पाऊस झाला. आळंद परिसरात जवळपास तीस मिनिटे जोरदार पाऊस झाला. पळशी (ता. सिल्लोड) परिसरात जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. 

पडलेला पाऊस (मि.मी.मध्ये) कोकण : कुलाबा ८५.८, डहाणू ४५.५, जव्हार ६२, तलासरी ५७, कर्जत ७९.५, खालापूर ६९, म्हसळा ५४, मुरूड ६९, पेण ८०, रोहा ९७, श्रीवर्धन ८७, सुधागडपाली ८४, तळा ६७, दापोली ८५, हर्णे ६८.६, देवगड ५५, दोडामार्ग ५५, मालवण ९५, आंबरनाथ ९८.  मध्य महाराष्ट्र : धुळे ९०, ओझरखेडा ३८.६, महाबळेश्‍वर ४७.८.  मराठवाडा : फुलंब्री ४१, परळी वैजनाथ ४७, अंबड ६३, भोकरदन ३६, परतूर ६२, देवणी ४०, परभणी ६९.२.  विदर्भ : अंजणगाव ४२.६, नांदगाव काझी ३०.४, आर्वी ३४.६, नेर ३७.२.  सर्वाधिक पाऊस झालेली ठिकाणे (मि.मी.मध्ये) सांताक्रूझ २३१.३, पालघर ११२.६, वसई १०५, माथेरान १२२.२, पनवेल १६०.४, उरण १११, भिवंडी १०५, कल्याण १४०, ठाणे २२८, उल्हासनगर १४७. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com