agriculture news in Marathi heavy rain kokan Maharashtra | Agrowon

कोकणात अतिवृष्टी 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 जून 2021

कोकणात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मध्य महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. 

पुणे : कोकणात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मध्य महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर सांताक्रूझमध्ये सर्वाधिक २३२ मिलिमीटर, तर ठाणेमध्ये २२८ मिलिमीटर पाऊस पडला. यामुळे मुंबईत वाहतूक कोंडी, तर इतर भागांत झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतातील कामे सुरू केली आहे. 

पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, सोलापूर, धुळे, जळगाव, नगर जिल्ह्यांच्या विविध भागांत पावसाचे आगमन झाले. नगरमधील श्रीरामपूर, राहाता, अकोले, संगमनेर, नगरसह अन्य तालुक्यांमध्ये मॉन्सूनने हजेरी लावली आहे. भंडारदरा आणि मुळा पाणलोटात गत दोन दिवसांपासून मॉन्सूनने हजेरी लावली. यामुळे भंडारदरा पाणलोटातील धबधबे आणि ओढेनाले खळखळू लागले आहेत. या धरणात नवीन पाण्याची आवकही सुरू झाली आहे.

नुकतेच झालेल्या पावसाने भंडारदरा धरणात नव्याने २१ दलघफू पाण्याची आवक झाली. तर ७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मुळा पाणलोटातही पावसास सुरुवात झाली आहे. कळसूबाई शिखर, हरिश्‍चंद्र गड व आंबितमध्ये पावसामुळे ओढेनाले सक्रिय झाले आहेत. पाऊस होत असल्याने करोनातून मुक्त झालेला शेतकरी आता मशागतीच्या कामांत गुंतला आहे. नाशिक जिल्ह्यातील अंगुलगाव (ता. येवला) येथे झालेल्या जोरदार पावसामुळे शिवारातील पाझर तलाव पूर्ण भरले. झालेल्या पावसामुळे शिवारात ओढे नाले भरून वाहिले. 

कोकणातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी भात मशागतीच्या कामांत व्यक्त आहे. काही ठिकाणी भात रोपवाटिकेची वेगाने तयारी सुरू झाली असून, भात रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिकेत बियाणे टाकण्याचे कामे वेगाने सुरू झाली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील गोळेगाव परिसरात विजांचा कडकडासह पाऊस झाला. आळंद परिसरात जवळपास तीस मिनिटे जोरदार पाऊस झाला. पळशी (ता. सिल्लोड) परिसरात जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. 

पडलेला पाऊस (मि.मी.मध्ये)
कोकण :
कुलाबा ८५.८, डहाणू ४५.५, जव्हार ६२, तलासरी ५७, कर्जत ७९.५, खालापूर ६९, म्हसळा ५४, मुरूड ६९, पेण ८०, रोहा ९७, श्रीवर्धन ८७, सुधागडपाली ८४, तळा ६७, दापोली ८५, हर्णे ६८.६, देवगड ५५, दोडामार्ग ५५, मालवण ९५, आंबरनाथ ९८. 
मध्य महाराष्ट्र : धुळे ९०, ओझरखेडा ३८.६, महाबळेश्‍वर ४७.८. 
मराठवाडा : फुलंब्री ४१, परळी वैजनाथ ४७, अंबड ६३, भोकरदन ३६, परतूर ६२, देवणी ४०, परभणी ६९.२. 
विदर्भ : अंजणगाव ४२.६, नांदगाव काझी ३०.४, आर्वी ३४.६, नेर ३७.२. 

सर्वाधिक पाऊस झालेली ठिकाणे (मि.मी.मध्ये)
सांताक्रूझ २३१.३, पालघर ११२.६, वसई १०५, माथेरान १२२.२, पनवेल १६०.४, उरण १११, भिवंडी १०५, कल्याण १४०, ठाणे २२८, उल्हासनगर १४७. 


इतर बातम्या
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
मराठा आरक्षणासाठी एकत्रित लढणारकोल्‍हापूर : इथून पुढील काळात कोणत्याही...
खानदेशात युरियाची टंचाईजळगाव : खानदेशात खरिपास हवी तशी सुरुवातदेखील...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...