agriculture news in Marathi heavy rain in Kokan Maharashtra | Agrowon

कोकणात जोरदार पाऊस

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 जून 2021

माथेरान येथे २२७ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली भागांतही जोरदार पाऊस पडल्याने कृष्णा, वारणा नद्यांची पाणीपातळी अचानक वाढली. 

पुणे : कोकणातील बहुतांशी भागांत पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. माथेरान येथे २२७ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली भागांतही जोरदार पाऊस पडल्याने कृष्णा, वारणा नद्यांची पाणीपातळी अचानक वाढली. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची बऱ्यापैकी उघडीप होती. 

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडला. काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने भात खाचरे तुडुंब भरून वाहत आहेत. नद्या दुथडी भरून वाहत आहेत. घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस पडत असल्याने दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यांच्या पश्‍चिम पट्ट्यात पावसाचा जोर वाढला आहे. गुरुवारपासून या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 
पडत आहे. 

औरंगाबाद, जालना, नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. काही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी जोरदार पावसाची अजूनही प्रतीक्षा लागून आहे. विदर्भाच्या पूर्व भागात पावसाच्या तुरळक सरी पडल्या. नागपूरमधील कामठी येथे सर्वाधिक ५४.५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. लाखणी, मोहाडी, ब्रह्मपुरी, चिमूर, कोर्ची, भिवापूर, हिंगणा, नेर येथे पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. 

सांगली कोल्हापूरला दणका 
सांगली, कोल्हापूर भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. सांगली जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नद्यांतील पाणीपातळी सात ते दहा फुटांनी वाढल्याने कृष्णा, वारणा दोन्ही नद्यांवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले. नदीकाठावरील हजारो विद्युत पंप बुडाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील चांदोली, वारणावती, मांगले, शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव, मिरज या तालुक्यांसह सांगली शहरात अतिवृष्टी झाली. तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तलाव, बंधारे ओसंडून वाहत आहेत. कोल्हापुरातही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. 

१०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेली ठिकाणे 
डहाणू २१८.८, पालघर १४०, वसई १७६, १००.२, खालापूर १२६., माणगाव १०२, पनवेल १६७, रोहा सुधागड पाली १४०, तळा ११२, चंदगड १२३, लोणावळा १३४.३, महाबळेश्‍वर ११०.६. 

राज्यात शुक्रवारी (ता.१८) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटर) : स्रोत ः हवामान विभाग 
कोकण : सांताक्रूझ ८३.३, वाडा ५८, कर्जत महाड ७४, म्हसळा ६८, पेण ८५, पोलादपूर ८१, श्रीवर्धन ६५, उरण ६०, चिपळूण ८०, खेड ८४, लांजा ८०, मंडणगड ८४, राजापूर ५५, संगमेश्‍वर ७९, दोडामार्ग ७६, कुडाळ ४४, मुलदे (कृषी) ४५, सावंतवाडी ५०.२, वैभववाडी ६३. 

मध्य महाराष्ट्र : आजरा ९२, गगनबावडा ७६, गारगोटी ५३, हातकणंगले ६२, राधानगरी १७७, शाहूवाडी ५०, इगतपुरी ३८, भोर ७४, पौड ६२, वेल्हे ८७, सातारा ७४.६. 

मराठवाडा : सिल्लोड ३८, मंठा १०५, किनवट ६५. 

विदर्भ : बटकुली ३०.३, लाखणी ५२.२, मोहाडी २२.२, ब्रह्मपुरी ३३.२, चिमूर ३०.६, गोंडपिंपरी २४, नागभिड ३०.३, कोर्ची ४९.६, भिवापूर ४८.९, हिंगणा ३६.८, कुही ३२, पारशिवणी ३९.३, उमरेर ३०.२, नेर ४७, यवतमाळ ३२.३. 


इतर बातम्या
रत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड ...रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून पूर...
विदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे...नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता...
मराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम, मोठ्या...
स्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत...आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणूस बथ्थड, मूर्ख होत...
कोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटकाकोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे सुमारे...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
परभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके...परभणी ः अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परभणी...
केंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण...रायगड/रत्नागिरी : ‘‘तळिये गावात पंतप्रधान आवास...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
समृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग बुलडाणा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगतच आता...
नगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन नगर : नगर जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी आता उरकली आहे...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
साताऱ्यात भूस्खलनात आतापर्यंत ३२ जणांचा...सातारा : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...
सर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर...रत्नागिरी : ‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी...
आवक कमी दाखवून बाजार समितीची फसवणूक पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे,...
नदीकाठावरील ऊस वाहून गेलानेर्ले, जि. सांगली : बहे रामलिंग बेटाच्या...