रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मुसळधार 

कोकणात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे धुवाधार पाऊस बरसत आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
sindhudurg rain
sindhudurg rain

पुणे : कोकणात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे धुवाधार पाऊस बरसत आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. कल्याणमध्ये आतापर्यंतची उच्चांकी ३६८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी घरामध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. 

ठाण्यातील भिवंडी येथे ३०० मिलिमीटर, तर अंबरनाथ २५३ आणि ठाणे १५९ मिलिमीटर पाऊस पडला. मुंबईतही मध्यम पाऊस पडला असून, तुळशी, विहार ही तलावे ओसंडून वाहत आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा, वैतरणा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा या तलावातही पाणी पातळी वेगाने वाढत आहे. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर अधिक आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्येही पावसाचा जोर कायम आहे. 

पुणे, कोल्हापुरात जोर  पुण्यातील लोणावळा कृषी १४९.१ मिलिमीटर पाऊस पडला. तर नाशिकमधील ओझरखेडा ११०.२ मिलिमीटर, साताऱ्यातील महाबळेश्‍वर येथे १०९.८ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे या भागातील धरणातील पाणीपातळीत बऱ्यापैकी वाढ होत आहे. नगर, नाशिक, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. 

मराठवाडा, विदर्भात हजेरी  बीड, हिंगोली, जालना, परभणी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. तर जाफराबाद येथे ४५ मिलिमीटर पाऊस पडला. अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला.  १५० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडलेली ठिकाणे  उल्हासनगर २८८, वाकवली १६७.४, हर्णे १५३.२, चिपळूण १२६, दापोली २२८, कर्जत १८९.२, खालापूर १८३, माथेरान २५५.७, पनवेल १८२.२, पेण १८७, रोहा १५३, सुधागडपाली २२०.  राज्यात मंगळवारी (ता.२०) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटर) : स्रोत ः हवामान विभाग  कोकण : कुलाबा ३५.४, महालक्ष्मी ३३, सांताक्रूझ ३८.८, जव्हार ११२, मोखेडा ५८.४, वसई ४५, विक्रमगड ७०, वाडा २७, अलिबाग ६५.४, महाड ९४, माणगाव ९९, म्हसळा ५३, मुरूड ३७, पोलादपूर ६८, श्रीवर्धन १०१, तळा ८७, उरण ७७, गुहागर ११३, खेड ११४, लांजा ६०, मंडणगड ८९, राजापूर १०६, रत्नागिरी ८३.४, संगमेश्‍वर ८१, देवगड ८७, दोडामार्ग ४०, कणकवली ८७, कुडाळ ५०, मालवण ४४, मुलदे (कृषी) ४९.८, रामेश्‍वर ५५.४, सावंतवाडी ६०, वैभववाडी ४२, वेंगुर्ला ४६, मुरबाड ७१, शहापूर १०३, 

मध्य महाराष्ट्र : श्रीरामपूर ५१, जळगाव ३६, गगनबावडा ७५, राधानगरी ३८, शाहूवाडी ३२, हर्सूल ७२, इगतपुरी ८०, पेठ ८२.१, सुरगाणा ७४.३, त्र्यंबकेश्‍वर ४९, पुणे ३२.५, पौंड ५५, वडगाव मावळ ४१, वेल्हे, 

मराठवाडा : माजलगाव २५, परळी वैजनाथ ३५, सेनगाव ३७, पालम २१, पूर्णा २०, सोनपेठ ३३, 

विदर्भ : परतवाडा २२, संग्रामपूर २१.२, गोंडपिंपरी ७२.३, जेवती ४२.७, भामरागड ७१, मुलचेरा २२.२, नागपूर ४०.३, सावनेर ३०.४, घाटंजी ३४.४, नेर २१.५, 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com