agriculture news in Marathi heavy rain in Kokan Maharashtra | Page 2 ||| Agrowon

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मुसळधार 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 जुलै 2021

कोकणात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे धुवाधार पाऊस बरसत आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

पुणे : कोकणात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे धुवाधार पाऊस बरसत आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. कल्याणमध्ये आतापर्यंतची उच्चांकी ३६८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी घरामध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. 

ठाण्यातील भिवंडी येथे ३०० मिलिमीटर, तर अंबरनाथ २५३ आणि ठाणे १५९ मिलिमीटर पाऊस पडला. मुंबईतही मध्यम पाऊस पडला असून, तुळशी, विहार ही तलावे ओसंडून वाहत आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा, वैतरणा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा या तलावातही पाणी पातळी वेगाने वाढत आहे. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर अधिक आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्येही पावसाचा जोर कायम आहे. 

पुणे, कोल्हापुरात जोर 
पुण्यातील लोणावळा कृषी १४९.१ मिलिमीटर पाऊस पडला. तर नाशिकमधील ओझरखेडा ११०.२ मिलिमीटर, साताऱ्यातील महाबळेश्‍वर येथे १०९.८ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे या भागातील धरणातील पाणीपातळीत बऱ्यापैकी वाढ होत आहे. नगर, नाशिक, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. 

मराठवाडा, विदर्भात हजेरी 
बीड, हिंगोली, जालना, परभणी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. तर जाफराबाद येथे ४५ मिलिमीटर पाऊस पडला. अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला. 

१५० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडलेली ठिकाणे 
उल्हासनगर २८८, वाकवली १६७.४, हर्णे १५३.२, चिपळूण १२६, दापोली २२८, कर्जत १८९.२, खालापूर १८३, माथेरान २५५.७, पनवेल १८२.२, पेण १८७, रोहा १५३, सुधागडपाली २२०. 

राज्यात मंगळवारी (ता.२०) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटर) : स्रोत ः हवामान विभाग 
कोकण : कुलाबा ३५.४, महालक्ष्मी ३३, सांताक्रूझ ३८.८, जव्हार ११२, मोखेडा ५८.४, वसई ४५, विक्रमगड ७०, वाडा २७, अलिबाग ६५.४, महाड ९४, माणगाव ९९, म्हसळा ५३, मुरूड ३७, पोलादपूर ६८, श्रीवर्धन १०१, तळा ८७, उरण ७७, गुहागर ११३, खेड ११४, लांजा ६०, मंडणगड ८९, राजापूर १०६, रत्नागिरी ८३.४, संगमेश्‍वर ८१, देवगड ८७, दोडामार्ग ४०, कणकवली ८७, कुडाळ ५०, मालवण ४४, मुलदे (कृषी) ४९.८, रामेश्‍वर ५५.४, सावंतवाडी ६०, वैभववाडी ४२, वेंगुर्ला ४६, मुरबाड ७१, शहापूर १०३, 

मध्य महाराष्ट्र : श्रीरामपूर ५१, जळगाव ३६, गगनबावडा ७५, राधानगरी ३८, शाहूवाडी ३२, हर्सूल ७२, इगतपुरी ८०, पेठ ८२.१, सुरगाणा ७४.३, त्र्यंबकेश्‍वर ४९, पुणे ३२.५, पौंड ५५, वडगाव मावळ ४१, वेल्हे, 

मराठवाडा : माजलगाव २५, परळी वैजनाथ ३५, सेनगाव ३७, पालम २१, पूर्णा २०, सोनपेठ ३३, 

विदर्भ : परतवाडा २२, संग्रामपूर २१.२, गोंडपिंपरी ७२.३, जेवती ४२.७, भामरागड ७१, मुलचेरा २२.२, नागपूर ४०.३, सावनेर ३०.४, घाटंजी ३४.४, नेर २१.५, 


इतर अॅग्रो विशेष
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...
शेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंडनांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार...
कोकणात पावसाचा जोर कायमपुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाजपुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर...
पाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
सेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा...नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...