agriculture news in Marathi, heavy rain in Kolhapur hill area, Maharashtra | Agrowon

कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागात आजपासून (ता. १८) पावसाचा जोर वाढणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाडा, पूर्व विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मंगळवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील विक्रमगड १२७ मिलिमीटर, माथेरान १०४ आणि सुधागड येथे १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागात आजपासून (ता. १८) पावसाचा जोर वाढणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाडा, पूर्व विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मंगळवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील विक्रमगड १२७ मिलिमीटर, माथेरान १०४ आणि सुधागड येथे १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा काहीसा सौम्य झाला आहे. तर आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यालगत असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे या भागात आज (ता. १८) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहे. ही स्थिती पोषक ठरल्याने राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. आजपासून मुंबईसह कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

मंगळवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :
कोकण : विक्रमगड १२७, वाडा ४३, खालापूर ६६, माथेरान १०४, पनवेल ६६, पोलादपूर ४९, सुधागडपाली १०५, कणकवली ४१, कुडाळ ४०, वैभववाडी १३५, वेंगुर्ला ३९, अंबरनाथ ६४, भिवंडी ९०, कल्याण ९२, ठाणे ८०, उल्हासनगर ६४.
मध्य महाराष्ट्र : गगनबावडा ६३, शहादा ३०, ओझरखेडा ५७, लोणावळा कृषी ४५, महाबळेश्‍वर ४६.
मराठवाडा : घनसांगवी १०, अर्धापूर १२, परभणी १४.
विदर्भ : चिखलदरा ३५, कोर्ची ४९, पारशिवणी २३, सेलू ३२.

इतर बातम्या
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन यंदा ७०...नगर  ः जिल्ह्यात यंदा उडदाची उत्पादकता...
पीक उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न...पुणे  ः  कृषी विद्यापीठांकडून शेतकरी...
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार ः...मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त...
आम्ही सत्तेत आल्यास चार महिन्यांत...वणी, जि. यवतमाळ  ः शेतकऱ्यांना कर्जमाफी...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
वाशीम : मानवी साखळीतून साकारले निवडणूक...वाशीम : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा...
नंदुरबार जिल्ह्यात पीक काढणी वेगातनंदुरबार  : जिल्ह्यात खरिपाच्या हंगामातील...
राज्यात साडेचार हजार सावकार अनधिकृतपुणे : शेतकरी आत्महत्येच्या समस्येवर प्रभावी उपाय...
सोयाबीन सुडी पेटविण्याच्या घटनांमध्ये...बुलडाणा  ः वैयक्तिक मतभेद, आपापसातील वाद आदी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
चौथीच्या अभ्यासक्रमातून शिवरायांचा...मुंबई : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
बिगर नोंदणीकृत उत्पादनासाठी हवा कायदा...सध्या खते, कीटकनाशके उत्पादन व विक्रीसाठी दोन...
आपल्या मताची किंमत दाखवून देण्याची वेळ...शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक या विषयांचा...
भिवापूर येथे सोयाबीन खरेदीला सुरवातभिवापूर, नागपूर  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
महायुतीत आमची अवस्था इकडे आड तिकडे...नाशिक  : ‘‘महायुतीच्या जागावाटपात नाराज असलो...
निवडणुकीत शेतकरी प्रश्न शोधावे लागतात...निवडणुकांतून शेतकरी सोडून सारे राजकीय घटक...