कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला

धरण
धरण

कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी (ता. १०) सायंकाळपासून पावसाचा जोर कायम होता. विशेष करून धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्यांसह धरणातील पाण्याची पातळीही जलदगतीने वाढत आहे. यामुळे लहान नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडण्यास सुरवात झाली आहे.  जोरदार पाऊस पडत असल्याने अनेक गावांचे मार्ग बंद होण्यास प्रारंभ झाला आहे. या ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुुरु आहे. गुरुवारी सकाळी चंदगड तालुक्‍यातील ताम्रपणी नदीवरील जांबरे प्रकल्प शंभर टक्के भरून सांडव्यातून पाणी बाहेर पडण्यास प्रारंभ झाला. कोदे लघुप्रकल्पही पूर्णपणे भरला असून, यातून कोणत्याही क्षणी पाणी बाहेर पडू शकते अशी परिस्थिती आहे. गेल्या चार दिवसांपासून धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणे तीस टक्क्यांपर्यंत भरली आहेत. जिल्ह्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या राधानगरी धरणात ४ टी.एम.सी. इतका पाणीसाठा झाला आहे. दूधगंगेत ७, तर वारणा धरणात १४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गुरुवारी सकाळी नऊ वाजता संपलेल्या चोवीस तासांत गगनबावड्यात सर्वाधिक १२२ मि.मी. पावसाची नोंद झाली. शिरोळमध्ये सर्वांत कमी ६ मि.मी. पाऊस झाला.  पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर हे सात, भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे व शिरगाव हे पाच, तुळशी नदीवरील बीड व आरे हे दोन, वारणा नदीवरील चिंचोली, माणगाव, तांदूळवाडी, खोची, कोडोली व शिगाव हे सहा, कासारी नदीवरील यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, वालोली, बाजारभोगाव व करंजफेण हे सहा, कुंभी नदीवरील कळे, वेतवडे, मांडुकली व शेणवडे हे चार, कडवी नदीवरील शिरगाव, सवते सावर्डे व पाटणे हे तीन, वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, शेणगाव, गारगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली हे नऊ, हिरण्यकेशी नदीवरील ऐनापूर, साळगाव व नीलजी हे तीन, घटप्रभा नदीवरील कानडे-सावर्डे, आडकूर, बिजूर भोगोली व हिंडगाव हे चार, ताम्रपर्णी नदीवरील चंदगड, कुर्तनवाडी, हल्लारवाडी, धोलगरवाडी, माणगाव व कोवाड हे सहा, दूधगंगा नदीवरील दत्तवाड, सुळकुड व सिद्धनेर्ली हे तीन, आणि धामणी नदीवरील सुळे व आंबर्डे असे साठ बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.  धरणसाठा (टीएमसी)  तुळशी १.७२ वारणा १४.६६ , दूधगंगा ७.९२ , कासारी १.४९ , कडवी १.५७ , कुंभी १.२९ , पाटगाव १.९५ , चिकोत्रा ०.६५ , चित्री ०.८९ , जंगमहट्टी ०.७२ , घटप्रभा  १.५६ , जांबरे ०.८२ , कोदे (ल पा) ०.२१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com