agriculture news in Marathi, heavy rain in Kolhapur, Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 जुलै 2019

कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी (ता. १०) सायंकाळपासून पावसाचा जोर कायम होता. विशेष करून धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्यांसह धरणातील पाण्याची पातळीही जलदगतीने वाढत आहे. यामुळे लहान नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडण्यास सुरवात झाली आहे. 

कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी (ता. १०) सायंकाळपासून पावसाचा जोर कायम होता. विशेष करून धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्यांसह धरणातील पाण्याची पातळीही जलदगतीने वाढत आहे. यामुळे लहान नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडण्यास सुरवात झाली आहे. 

जोरदार पाऊस पडत असल्याने अनेक गावांचे मार्ग बंद होण्यास प्रारंभ झाला आहे. या ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुुरु आहे. गुरुवारी सकाळी चंदगड तालुक्‍यातील ताम्रपणी नदीवरील जांबरे प्रकल्प शंभर टक्के भरून सांडव्यातून पाणी बाहेर पडण्यास प्रारंभ झाला. कोदे लघुप्रकल्पही पूर्णपणे भरला असून, यातून कोणत्याही क्षणी पाणी बाहेर पडू शकते अशी परिस्थिती आहे.

गेल्या चार दिवसांपासून धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणे तीस टक्क्यांपर्यंत भरली आहेत. जिल्ह्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या राधानगरी धरणात ४ टी.एम.सी. इतका पाणीसाठा झाला आहे. दूधगंगेत ७, तर वारणा धरणात १४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

गुरुवारी सकाळी नऊ वाजता संपलेल्या चोवीस तासांत गगनबावड्यात सर्वाधिक १२२ मि.मी. पावसाची नोंद झाली. शिरोळमध्ये सर्वांत कमी ६ मि.मी. पाऊस झाला. 
पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर हे सात, भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे व शिरगाव हे पाच, तुळशी नदीवरील बीड व आरे हे दोन, वारणा नदीवरील चिंचोली, माणगाव, तांदूळवाडी, खोची, कोडोली व शिगाव हे सहा, कासारी नदीवरील यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, वालोली, बाजारभोगाव व करंजफेण हे सहा, कुंभी नदीवरील कळे, वेतवडे, मांडुकली व शेणवडे हे चार, कडवी नदीवरील शिरगाव, सवते सावर्डे व पाटणे हे तीन, वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, शेणगाव, गारगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली हे नऊ, हिरण्यकेशी नदीवरील ऐनापूर, साळगाव व नीलजी हे तीन, घटप्रभा नदीवरील कानडे-सावर्डे, आडकूर, बिजूर भोगोली व हिंडगाव हे चार, ताम्रपर्णी नदीवरील चंदगड, कुर्तनवाडी, हल्लारवाडी, धोलगरवाडी, माणगाव व कोवाड हे सहा, दूधगंगा नदीवरील दत्तवाड, सुळकुड व सिद्धनेर्ली हे तीन, आणि धामणी नदीवरील सुळे व आंबर्डे असे साठ बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. 

धरणसाठा (टीएमसी) 
तुळशी १.७२ वारणा १४.६६ , दूधगंगा ७.९२ , कासारी १.४९ , कडवी १.५७ , कुंभी १.२९ , पाटगाव १.९५ , चिकोत्रा ०.६५ , चित्री ०.८९ , जंगमहट्टी ०.७२ , घटप्रभा  १.५६ , जांबरे ०.८२ , कोदे (ल पा) ०.२१

इतर बातम्या
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
‘त्या’ बँकांमधील शासकीय खाती बंद करणार...यवतमाळ : बँकांच्या आडमुठेपणामुळे शेतकरी...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सातारा जिल्हा परिषदेचा १०० कोटींचा...सातारा : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मूळ...
पुण्यात पीकविम्यासाठी शिवसेना रस्त्यावरपुणे ः ‘कोण म्हणतो देणार नाय विमा घेतल्याशिवाय...
पुणे विभागातील कोरडवाहू पट्ट्यात टंचाई...पुणे : विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर...
मराठवाड्यातील पाणीटंचाईत वाढऔरंगाबाद : पावसाने पाठ फिरविल्याने...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला १...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गंत खरिपासाठी...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १५ चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील घटलेली चारा छावण्यांची...
अचूक पीक पेरणी अहवाल देणे शक्य नाही ः...बुलडाणा  ः जिल्ह्यातील पीक पेरणीचा...
आडसाली ऊस लागवडीला कोल्हापूर जिल्ह्यात...कोल्हापूर  : जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात...
परभणी कृषी विद्यापीठ उत्पादित अडीच हजार...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी ९१.३३ टक्के ...अकोला  ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम...
एचटी कापूस बियाण्यांबाबतचा अहवाल १५...मुंबई  : प्रतिबंधित एचटी (हर्बीसाइड टॉलरंट)...
शिवसेना शेतकऱ्यांची दिशाभूल करतेय ः...मुंबई  ः पीकविम्यासंदर्भात विमा कंपन्यांवर...
पीकविम्याचे पैसे पंधरा दिवसांत न...मुंबई  : कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची...
फळपीक विमा योजनेला मुदतवाढ देण्याची...पुणे  : राज्यातील दुष्काळी स्थिती आणि...
कृत्रिम पावसाचा मंगळवारी तीन ठिकाणी...मुंबई   ः पश्चिम महाराष्ट्रातील...