कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा   ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणातील पाणीसाठ्याची वाटचाल ५० टीएमसीकडे सुरू आहे. बुधवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंत धरणात एकूण ४९.८२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

राज्याच्या वीज निमिर्तीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कोयना धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत धरण क्षेत्रातील कोयना येथे ८६, नवजा येथे ७९ व महाबळेश्वर येथे ११० मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामुळे २४ तासांत धरणातील पाणीसाठ्यात ३.२१ टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात प्रति सेंकद ३८,६७० क्‍युसेक पाणी आवक सुरू आहे. सध्या धरणात ४९.८२ टीएमसी म्हणजेच ४७.३३ टक्के साठा आहे.

इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. तसेच जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातही पावसाचा जोर टिकून आहे. महाबळेश्वर, जावली, पाटण, सातारा या तालुक्‍यात अनेक ठिकाणी दमदार सरी कोसळत आहेत. जिल्ह्यात बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी १६.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

महाबळेश्वर तालुक्‍यात पावसाचे प्रमाण अधिक असून या तालुक्‍यात सरासरी १०५ मिमी पाऊस झाला आहे. इतर तालुक्‍यांत पावसाचा जोर कमी झाला आहे. बुधवारी सकाळपासून बहुतांशी भागात पावसाचा जोर कमी झाला होता. या पावसामुळे अनेक शेतात तणाचे प्रमाण वाढले आहे. शेतजमीन घातीवर आल्यानंतर आंतरमशागतीच्या कामांना वेग येणार आहे. माण, फलटण या दुष्काळी तालुक्‍यात पावसाचे प्रमाण कमी आहे. यामुळे येथील पिके धोक्‍यात येऊ लागली आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com