पालघरमध्ये महावृष्टी; मुंबई, कोकणला मुसळधारेचा दणका

गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाने दाणादाण उडाली आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झाली.
पालघरमध्ये महावृष्टी; मुंबई, कोकणला मुसळधारेचा दणका
पालघरमध्ये महावृष्टी; मुंबई, कोकणला मुसळधारेचा दणका

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाने दाणादाण उडाली आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झाली. बुधवारी (ता.५) सकाळी आठ वाजेपर्यत पालघर येथे हंगामातील सर्वाधिक ४६०.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे कोकण पट्ट्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.  कोकणातील बहुतांशी भागात अतिवृष्टी झाली आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. त्यातच मंगळवारी रात्रभर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.  कोकणातील बहुतांशी भागात अतिवृष्टी झाली आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. त्यातच मंगळवारी रात्रभर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांनी पूररेषा ओलांडली आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये,वस्तीमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. नद्या, नाल्यांचे पाणी पात्राबाहेरून वाहत असल्यामुळे लगतच्या भातशेतीतून पुराचे पाणी वाहत आहे. त्यामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले चित्र आहे. बुधवारी तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम होता. मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वीजखांब आणि वीजवाहिन्या तुटून पडल्यामुळे मंगळवारी रात्रीपासून वीज पुरवठा खंडीत आहे. या जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळीवारे वाहत असल्यामुळे अनेक घरांवर झाडे कोसळणे, वीजखांब उन्मळून पडण्याचे प्रकार घडले आहेत.

सिंधुदुर्गमधील खारेपाटण (ता.कणकवली) बाजारपेठेला पुराच्या पाण्याने वेढले आहे. या भागातील भातशेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. काही घरांमध्ये पुराचे पाणी घुसले असून तेथील नागरिकांना अन्यत्र हालविण्यात आले आहे. कुडाळ, कणकवली तालुक्यातील गड आणि जानवली या दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेरून वाहू लागले आहे. त्यामुळे शहरात नदीलगत असलेल्या अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे. तळेरे-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाटात दरड कोसळली असून याच मार्गावरील मांडकुली(ता.गगनबावडा)पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे जिल्ह्याचा कोल्हापूरशी संपर्क तुटला आहे. वेंगुर्ले, वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी या तालुक्यांमध्ये वादळ आणि मुसळधार पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. 

मध्य महाराष्ट्रात पावसाची संततधार ः मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून पूर्व भागात हलका पाऊस झाला. महाबळेश्वर येथे ३२०.९ तर, गगनबावडा येथे ३१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, सोलापूर हवामान ढगाळ असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यात बुधवारी ( ता.५) पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात राहिल्याने जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पात्रात वाढ झाली. एका रात्रीत बहुतांश नद्यांचे पाणी पाच ते दहा फूट पाणी वाढल्याने नदीकाठावरील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. 

पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी नदीवरील पाणी उपसा सुरू होता. परंतु दोन दिवसात दहा फुटांपेक्षा जास्त पाणी वाढल्याने उपसा पंप काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. पाणी गतीने वाढत असल्याने नदीकाठावरील नागरिकांची चिंता वाढली आहे.

घाटमाथ्यावर व पश्चिम भागात बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. पावसामुळे अनेक नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्वदूर पाऊस सुरू होता. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ९० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगेची पातळी ३५ फूट इतकी नोंदली गेली. यामुळे धरणाचे पाणी वेगात वाढत आहे. धरणात ८४ टक्के पाणीसाठा झाला आहे. राधानगरी धरणातून १४०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पाच राज्यमार्ग व नऊ प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण चौदा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते.

मराठवाड्यात हलक्या सरी ः मराठवाड्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामान आहे. तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची हजेरी लागली. जालना व उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी एका मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. जालना जिल्ह्यातील बहुतांशी भागात हलक्या पावसाची हजेरी लागली. जिल्ह्यातील हसनाबाद मंडळात वादळासह १०३.८ मिलिमीटर नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव, सावलदबारा मंडळात हलका पाऊस झाला असून चाळीसगाव मंडळात तुरळक ते हलका पाऊस झाला. वाटुर तर सातोना मंडळात मध्यम पाऊस पडला. बीड जिल्ह्यातील ५० मंडळात तुरळक हलक्‍या पावसाची नोंद झाली. परभणी जिल्ह्यातील आडगाव, सेलू, वालूर मंडळात मध्यम पाऊस पडला असून २९ मंडळात तुरळक ते हलका पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील २७ मंडळात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. लातूरमधील ४४ मंडळात तुरळक ते हलक्‍या पावसाची हजेरी लागली. उस्मानाबाद जिल्ह्यातील ईटकळ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तर इतर भागात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. नांदेड जिल्ह्यातील ६४ मंडळात तुरळक हलक्‍या पावसाची नोंद झाली.

विदर्भात पावसाचा जोर कमी ः विदर्भातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. सध्या अनेक भागात हवामान ढगाळ आहे. तर अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. तर गोंदिया, गडचिरोली, नागपूर जिल्ह्यातील बहुतांशी भागात हलका स्वरूपाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे खरिपातील कापूस, तूर, मूग, उडीद, सोयाबीन या पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.     बुधवारी (ता.५) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस मिमीमध्ये ः कोकण : कुलाबा ५३.२, सांताक्रुझ ८४.३, डहाणू ३८३.१, जव्हार १५९, मोखेडा ८५.८, पालघर ४६०.६, तलासरी ३८७.२, वसई २१८, विक्रमगड १९८, वाडा १८९, अलिबाग ८३.२, भिरा २२६, कर्जत १५०.४, खालापूर १४०, महाड १५५, माणगाव १०५, माथेरान २५२, म्हसळा ९२, पनवेल ११०.२, पेण ८५, पोलादपूर २१६, रोहा ६५, श्रीवर्धन ९०, सुधागडपाली ८७, तळा ८८, चिपळूण १८७, दापोली १२५, गुहागर ७५, हर्णे ५८, खेड ११२, लांजा १४५, मंडणगड १६२, राजापूर २४५, रत्नागिरी २१६.३, संगमेश्वर २३१, देवगड ९५, दोडामार्ग २७९, कणकवली ७९, कुडाळ १७५, मालवण १२१, रामेश्वर १९५.२, सावंतवाडी ११०, वैभववाडी २३७, अंबरनाथ १२३.३, भिवंडी १७५, कल्याण १७५, मुरबाड ५७, शहापूर ५४, ठाणे १६७, उल्हासनगर १३४

मध्य महाराष्ट्र : आजरा १६२, चंदगड १९६, गडहिंग्लज ४८, गगणबावडा ३१०, गारगोटी ५५, हातकणंगले ४८, कागल ४८, करवीर ७०, पन्हाळा ९८, राधानगरी ९५, शाहूवाडी ६६, शिरोळ २८, इगतपुरी १०९, त्र्यंबकेश्वर ५७, घोडेगाव २५, भोर १२८, जुन्नर २३, राजगुरूनगर २८, लोणावळा कृषी १९३, पौड ११०, पुणे ५९, पुरंदर ४६, वडगाव मावळ ४८.४, वेल्हे १८३, कडेगाव ४२, मिरज २५, सांगली ३०, शिराळा ८९, तासगाव २१, वाळवा ३२, जावळीमेढा ९५.४, कराड ३९, खंडाळा ४६.४, खटाव वडूज १९, कोरेगाव ३९, महाबळेश्वर ३२०.९, पाटण ९४, सातारा ६३.९, वाई ६६

मराठवाडा ः औरंगाबाद ११.४, औंढा नागनाथ ४२, हिंगोली ४०, कळमनुरी २४, सेनगाव १३, आंबड २४, घनसांगवी १३, परतूर १०, रेणापूर १०, देगलूर ११, धर्माबाद १८, कंधार २०, लोहा १२, मुदखेड, मुखेड २०, नांदेड १७, उमरी १०, उस्मानाबाद ११.१,  जिंतूर १०, सेलू ३१, सोनपेठ,

विदर्भ :  कुरखेडा १४.७, अर्जुनीमोरगाव १५.४, सडकअर्जुनी ३२.६, काटोल ११.३, पारशिवणी ११.७, रामटेक २८.१, घाटमाथा ः लोणावळा (टाटा) १८६, शिरगाव ३४८, शिरोटा ८२, वाळवण १३३, आंबोणे २४८, भिवपुरी १०५, दावडी ३४८, डुंगरवाडी ३४०, कोयना (नवजा) १९१,कोयना (पोपळी) २१५, खोपोली ११८, खांड १२९, ताम्हिनी ३५८, भिरा ३२६, वैतरणा १४१,विहार १०५, तुलसी १५४, ३०० मिलिमीटर पाऊस झालेली ठिकाणे डहाणू ३८३.१, पालघर ४६०.६, तलासरी ३८७.२, गगणबावडा ३१०, महाबळेश्वर ३२०.९, दावडी ३४८, डुंगरवाडी ३४०, ताम्हिनी ३५८, भिरा ३२६, शिरगाव ३४८ गेल्या दोन दिवसापासून कोकण व मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत आहे. पालघरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर राहणार आहे.  — डाँ. अनुपम कश्यपी, प्रमुख, हवामान अंदाज पुणे वेधशाळा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com