मंडणगड, खेड, दापोलीत पावसाचा तडाखा

पूर
पूर

रत्नागिरी ः वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपलेले असतानाच समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीने मुरुगवाडा, पंधरामाड आणि मिऱ्या बंदरसह गावखडी खारवीवाडा येथे घरांत पाणी शिरल्याने मोठे नुकसानही झाले आहे. पावसामुळे मंडणगडात भारजा नदीला पूर आल्यामुळे दापोलीशी संपर्क तुटला असून पूल, रस्ता आणि किनाऱ्यावरील भातशेती पाण्याखाली गेली. दापोली, खेडमध्येही पावसाने धुमाकूळ घातला आहे.  जिल्ह्यात शनिवारी (ता.३) सकाळी ८.३० पर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी पाऊस १२४ मिमी झाला. मंडणगड १७६, दापोली १७०, खेड १५५, गुहागर ४९, चिपळूण ९१, संगमेश्‍वर १४४, रत्नागिरी ४५, लांजा १६८, राजापूर ११८ मिमी नोंद झाली. शुक्रवारी सुरू झालेला पावसाचा जोर शनिवारीही कायम होता. मुसळधार पावसाबरोबर वेगवान वारे वाहत आहेत. समुद्राला भरती आल्यामुळे सकाळी मुरुगवाडा, पंधरमाडा, मिऱ्या बंधाऱ्याचे दगड वाहून गेले. मुरुगवाडा येथील रस्ता वाहून गेला असून, एका घराला धोका निर्माण झाला आहे; तसेच गावखडी-पेठमाप येथील किनाऱ्यावर असलेल्या मोहल्ल्यात पाणी भरले होते. काजळी नदीवर चांदेराई बाजारपेठेत रात्री पाणी भरले होते. संगमेश्‍वर तालुक्यात गोळवली-करजुवे रस्त्यावर दरड कोसळली. जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे महामार्ग बंद ठेवण्यात आला होता.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com