agriculture news in marathi, Heavy rain in Mahabaleshwar records 480 millimeter in day | Page 3 ||| Agrowon

महाबळेश्वरात ४८० मिलिमीटर पाऊस !!!

विकास जाधव
शुक्रवार, 23 जुलै 2021

सातारा ः महाबळेश्वरात मुसळधार पाऊस सुरू आहे. गूरूवारी सकाळी आठ पर्यंतच्या 24 तासात 480 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सातारा ः महाबळेश्वरात मुसळधार पाऊस सुरू आहे. गूरूवारी सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासात ४८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर सर्वाधिक पाऊस होण्याची दुसरी वेळ असून सर्वाधिक पाऊस आॅगस्ट २००८ मध्ये झाला असल्याची माहिती महाबळेश्वर येथील मौसम विभागा कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

महाबळेश्वरात धुवांधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसाने सर्वच रस्ते जलमय झाले आहेत. महाबळेश्वरात सर्वाधिक पाऊस होण्याची दुसऱ्या नंबरची आकडेवारी आहे. या अगोदर सर्वाधिक पाऊस ११ आॅगस्ट २००८ रोजी ४९०.७ मिलीमीटर पाऊस झाला होता. त्यानंतर गूरूवारी (ता.२२) सकाळी साडेआठ पर्यंतच्या २४ तासात ४८० मिलीमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे महाबळेश्वर - पांचगणी मुख्य रस्त्यावर वेण्णालेक नजिक पाणीच पाणी झाले. वेण्णा लेक ते लिंगमळा परिसरात सर्वत्रच पाणीच पाणी झाल्याचे चित्र होते. शेतीसह अनेकांच्या घरात या परिसरातील हॉटेल ढाब्यांमध्ये पाणी गेले होते. काही ठिकाणी संरक्षक भिंती, लाईट चे खांब कोसळल्याच्या घटना देखील घडल्या. महाबळेश्र्वर प्रतापगड रस्त्यावरील धबधबे ओसंडून वाहत असून घाटरस्त्यावर संपूर्ण पाणीच पाणी होते. हा संपूर्ण रस्ताच धोकादायक झाला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील चतुर बेट व उचाट येथील पुल पाण्याखाली गेल्याने २८ गावांचा संपर्क तुटला आहे. 


इतर अॅग्रो विशेष
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...
भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...
मध केंद्र योजनेंतर्गत साहित्य  स्वरूपात...नाशिक : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग...
ठिबक अनुदान वाटपाच्या  प्रक्रियेवर...पुणे : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून अनुदान...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान...
खानदेशात अतिपावसाने  कापूस पीकस्थिती...जळगाव : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकाची स्थिती...
खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना...पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या...
सौरकृषी पंपाच्या  कुसुम योजनेला अखेर...पुणे : उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे गेली...
पीक नुकसान तक्रारीसाठी धडपड औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
पंधरा हजार एकरवर बांबू लागवडनगर ः जगात सगळ्यात वेगाने वाढणाऱ्या परंतु...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान...
मराठवाड्यात २०० मेगावॉटचा सौर प्रकल्प ः...औरंगाबाद ः मराठवाड्यात येत्या वर्षात २००...
विदर्भ, मराठवाड्यात कमी पावसाचा अंदाजपुणे : कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र आणि...
महावितरणच्या वीजग्राहकांसाठी रूफटॉपमुंबई : महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील...
सोयापेंडेसाठी आयातदारांची अनेक देशांत...पुणे ः केंद्र सरकारने जनुकीय सुधारित...