agriculture news in Marathi heavy rain in Mangaon area Maharashtra | Agrowon

माणगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 मे 2020

जिल्ह्यातील माणगाव (ता.सांवतवाडी) परिसरात वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळल्यामुळे काही भागातील वाहतुक ठप्प झाली. 

सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील माणगाव (ता.सांवतवाडी) परिसरात वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळल्यामुळे काही भागातील वाहतुक ठप्प झाली. ग्रामस्थांच्या मदतीने झाडे हटवुन वाहतुक सुरू करण्यात आली. 

माणगाव परिसरातील गावांना रविवारी (ता.३) सायकांळी ६ वाजण्याच्या सुमारास वादळीवाऱ्याचा तडाखा बसला. अचानक आलेला वादळीवारा आणि पाऊस यामुळे बागायतदारांची चांगलीच धांदल उडाली. सुरूवातीला सुसाट्याचा वारा सुटला होता. त्यानतंर १५ ते २० मिनिटे पाऊस झाला. सांवतवाडी तालुक्यातील वाडोस, आंबेरी, माडाचा उंचवळा, आणि माणगाव या गावांमध्ये जोरदार वादळ झाले. याशिवाय पाऊस देखील झाला. वादळामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळुन पडली, त्यामुळे वाहतुक ठप्प झाली. 

स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्यावरील झाडे हटुवन वाहतुक सुरळीत करण्यास हातभार लावला. तर शिवापुर, वसोली, दुकानवाड या परिसरात चांगला पाऊस झाला. या भागात वाऱ्याचा वेग कमी होता. पावसामुळे आंबा, काजु बागांचे नुकसान झाले आहे. याशिवाय काही गावातील घरांचे पत्रे वादळात उडाले. अचानक आलेल्या पावसामुळे बागायतदारांची तारांबळ उडाली. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...