agriculture news in Marathi heavy rain Marathwada Maharashtra | Agrowon

मराठवाड्यात पावसाचे धुमशान 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे. औरंगाबादमधील आठ व लातूरमधील तीन मिळून अकरा मंडळात अतिवृष्टी झाली

पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे. औरंगाबादमधील आठ व लातूरमधील तीन मिळून अकरा मंडळात अतिवृष्टी झाली. तर लातूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद जालना या पाच जिल्ह्यातील १९६ मंडळात पावसाने तुरळक, हलकी, मध्यम ते दमदार हजेरी लावली. यामुळे ओढे, नाले नद्यांच्या पुराचे पाणी शिरल्याने मूग, कांदा, सोयाबीन, कपाशी, तूर पिकाचे नुकसान झाले. शुक्रवारी (ता. १८) सकाळी आठ वाजेपर्यंत परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे १४० मिलिमीटर पाऊस पडला. 

कोकणातील बहुतांशी भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात हलका पाऊस झाला. संगमेश्वर, चिपळूण, लांजा, राजापूर, रत्नागिरी या तालुक्यात हळव्या भाताची कापणी रखडू शकते. रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पुणे, नाशिक, सातारा, जळगाव, धुळे जिल्ह्यांत ढगाळ हवामान असून काही ठिकाणी पावसाच्या हलक्या पावसाच्या सरी पडत आहेत. नगर, नंदुरबार, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. नेवासा येथे सर्वाधिक ९७ मिलिमीटर पाऊस पडला असून शेवगाव, अक्कलकुवा, मंगळवेढा परिसरात जोरदार पाऊस पडला. 

मराठवाड्यात पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनला कोंब फुटण्याचे प्रकार पुढे येत आहेत. शिवाय काही भागात काढलेल्या व काढणीला आलेल्या उडदाचेही नुकसान झाले. काही ठिकाणी पुरामुळे पीकच वाहून गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. परभणी जिल्ह्यातील दोन आणि हिंगोली जिल्ह्यातील एका मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. विदर्भात पावसाचा जोर नसला तरी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसत आहेत. 

शुक्रवारी (ता.१८) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्त्रोत, हवामान विभाग) 
कोकण : वाडा ३३, रोहा ३१.३, तळा ५२,गुहागर ३०,खेड ५२, मालवण ५५, वैभववाडी २२, शहापूर ६१. 
मध्य महाराष्ट्र : नेवासा ९७, शेवगाव ६७, गगणबावडा ३७, अक्कलकुवा ६१, शहादा २९, चंदगड ४९.५, आटपाडी ५१, मंगळवेढा ५८. 
मराठवाडा : गंगापूर ४३, वसमत ४२,शिरूर अनंतपाळ ४५, अर्धापूर ५५, भोकर ४८, बिलोली ६५, देगलूर ३३, 
धर्माबाद ६४, मुदखेड ५५, परांडा ४०, तुळजापूर ६५, उमरगा ३०, जिंतूर ३४, मानवत ९७, पालम ३८, पाथरी ८३. 
विदर्भ ः आमगाव १९.६, अर्जुनीमोरगाव २०.९, गोरेगाव २८.४ 
 


इतर अॅग्रो विशेष
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...
रिसोर्स बॅंक ः स्तुत्य उपक्रमहवामान बदलाच्या चरम सीमेवर आता आपण आहोत. खरे तर...
कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...मुंबई : कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...
‘बायोमिक्स’ विक्रीतून कृषी विद्यापीठाला...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
जरासं पहा ना साहेब, पाणीच पाणी वावरात...परभणी ः सदोष बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणी...
परतीचा मॉन्सून राज्यातून चार दिवसांत...पुणे ः परतीच्या पाऊस सुरू असताना बंगालच्या...
कृषी कायद्यांविरोधात पंजाबकडून स्वतंत्र...चंडीगड : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
कोरोनामुळे वाढल्या कृषी व्यापार संधीचीनच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची...
कृषी ‘समृद्धी’चा मार्गबाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...