मुंबईसह उत्तर कोकणात जास्त, तर दक्षिणेत कमी जोर

राज्याच्या विविध भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे; तर मुंबईसह उत्तर कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली. तर दक्षिण कोकणात पावसाचा जोर आसरला आहे.
मुंबईसह उत्तर कोकणात जास्त, तर दक्षिण कोकणात कमी जोर
मुंबईसह उत्तर कोकणात जास्त, तर दक्षिण कोकणात कमी जोर

पुणे : राज्याच्या विविध भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे; तर मुंबईसह उत्तर कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईसह पालघर, ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे; तर दक्षिण कोकणात पावसाचा जोर आसरला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार; तर उर्वरित राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. 

सोमवारी (ता.६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक २१३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ठाण्यासह पालघर जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याने शहरासह उपनगरांमध्ये पाणीच पाणी साचत आहे. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाचा जोर ओसरला आहे. पावसाच्या उघडीपीने नदी, नाल्यांना आलेले पूर ओसरू लागले आहे. 

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. महाबळेश्वर, जावली, पाटण, सातारा या तालुक्यांत अनेक ठिकाणी पावसाच्या दमदार सरी येत आहेत. इतर तालुक्यांत तुरळक व हलका पाऊस सुरू आहे. कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरण क्षेत्रातील कोयना ६३, नवजा २६ व महाबळेश्वर ६६ मिलिमीटर पाऊस झाला असून धरणात प्रतिसेकंद १७ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. 

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने तुरळक ठिकाणी हजेरी लावली. काही ठिकाणी कमी अधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने बऱ्यापैकी जोर धरला आहे. त्यामुळे ओढे नाले खळाळून वाहत आहे. धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. 

जळगाव जिल्ह्यातील पावसाने हजेरी लावली असून जळगाव, भुसावळ, जामनेर, यावल, रावेर या पावसाची प्रतीक्षा असलेल्या भागातही चांगला पाऊस झाला. चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागातील काही मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला. अनेक भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळाला. 

सोमवारी (ता.६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत : हवामान विभाग) : 

कोकण : सांताक्रुझ ११६, डहाणू ६०, जव्हार ९३, मोखेडा ७९, पालघर ११६, तलासरी ९०, वसई ३७, विक्रमगड ९५, वाडा ११४, भिरा ५०, कर्जत ५०, खालापूर ६६, माथेरान ९०, पनवेल ७३, सुधागडपाली ५५, उरण ७३, आंबरनाथ १०९, भिवंडी १००, कल्याण १२६, शहापूर ७५, ठाणे २१३, उल्हासनगर १२०. 

मध्य महाराष्ट्र : शिरपूर ४९, अंमळनेर २९, भाडगाव २३, जामनेर ३१,आजरा ५९, गगणबावडा ३१, पन्हाळा ४५, राधानगरी ७४, हर्सूल ४३, इगतपुरी ६२, ओझरखेडा ३४, पेठ २४, त्र्यंबकेश्वर ३८, पौड २३, वेल्हे ८०, जावळीमेढा ३४, महाबळेश्वर ४९, पाटण २४. 

मराठवाडा : खुल्ताबाद २६, कळमनुरी २६, हिमायतनगर ३४, किनवट ३५, सेलू २७. 

विदर्भ : भंडारा १०४, लाखंदूर ३९, लाखणी ४०, साकोली ७१, मलकापूर ३४, बल्लारपूर ५८, भद्रावती ४७, ब्रह्मपुरी ३५, चंद्रपूर ४१, चिमूर ६५, गोंडपिंपरी ४१, जेवती ४५, कोर्पणा ३०, मूल ४६, नागभिड ३४, पोंबुर्णा ६६, सावळी ६५, सिंदेवाही ६३, वरोरा ५३, अहेरी ५३, अरमोरी ७५, भामरागड ३९, चामोर्शी ५६, देसाईगंज ७७, धानोरा ७७, एटापल्ली ३१, गडचिरोली ६४, कुरखेडा ८०, मुलचेरा ५३, सिरोंचा ४७, अर्जुनीमोरगाव ३१, तिरोडा ३१, कामठी ३३, पारशिवणी ४०, रामटेक ४३, सावनेर ४५, बाभुळगाव ४९, दारव्हा ३८, घाटंजी ४९, कळंब ४०, पांढरकवडा ३४, यवतमाळ ३१. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com