नांदेड, परभणी, हिंगोलीत दमदार पाऊस

नांदेड, परभणी, हिंगोलीत दमदार पाऊस
नांदेड, परभणी, हिंगोलीत दमदार पाऊस

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ३० तालुक्यांतील १४९ मंडळांमध्ये शनिवारी (ता. ३) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ओढे, नाले, नद्या पूर आले. हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर आला.

नांदेड जिल्ह्यातील किनवट, हिमायतनगर, हदगाव, नांदेड, भोकर, माहूर, मुखेड तालुक्यांतील १९ मंडळांमध्ये जोरदार झाली. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील ५ मंडळांमध्ये, तर परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील १ मंडळामध्ये मुसळधार पाऊस झाला. किनवट तालुक्यातील बोधडी मंडळामध्ये सर्वाधिक १७३ मिमी पाऊस झाला. शनिवारी (ता. ३) देखील अनेक मंडळांमध्ये संततधार पाऊस सुरू होता. दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ८० मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. परभणी जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांतील ३९ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. पुर्णा, परभणी, जिंतूर, सेलू पावसाचा जोर होता. चुडावा मंडळात सर्वाधिक ७१ मिमी पाऊस झाला. शनिवारी अनेक मंडळांत संततधार पाऊस सुरू होता. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ५ तालुक्यांतील ३० मंडळांमध्ये  मध्यम ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली कळमनुरी, सेनगाव तालुक्यांत पावसाचा जोर होता. 

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) 

नांदेड जिल्हा नांदेड ६०, नांदेड ग्रामीण ५४, वजीराबाद ५९, वसरणी ६५, तरोडा ६३, लिंबगांव ६७, तुप्पा ६७, विष्णुपुरी ६०, अर्धापूर ५८, मालेगांव ४५, मुदखेड ४४, दाभड ४७, मुगट ४५, बारड ६०, हदगाव ६५, तामसा ४४, मनाठा ६५, पिंपरखेड ६३, आष्टी ६८, निवघा ८२, तळणी ८७, माहूर ५०, वाई २९, वानोळा ६६, सिंदखेड २१, किनवट ७२, इस्लापूर १०५, मांडवी १०, बोधडी १७३, दहेली २५, जलधारा १२९, शिवणी १०७, हिमायतनगर १०२, सरसम ९६, जवळगाव ८०, भोकर ५४, किनी ७०, मोघाली ५०, मातुल ५५, उमरी ५३, सिंदी ४०, गोलेगाव ४०, धर्माबाद ४४, जारिकोट ४९, करखेली ४६, नायगाव ३५, नरसी ३४, मांजरम २९, बरबडा ४७, कुंटूर ५२, बिलोली ४५, कुंडलवाडी ३८, सगरोळी ३६, आदमपूर ४०, लोहगाव ४२, देगलूर ४५, खानापूर ४२, शहापूर २८, मरखेल ५२, मालेगाव ४१,हानेगाव ३९, मुखेड ३५, जांब २९, येवती ४२, जाहूर ३८, चांदोळा ३०, मुक्रमाबाद ६५, कंधार ४७, फुलवल ३२, उस्मानननगर ३५, बारुळ ३५, पेठवडज ३२, कुरुला ३८, लोहा ४२, माळाकोळी ४१, कलंबर ५६, शेवडी ४२, सोनखेड ५२, कापसी ४६.
परभणी जिल्हा परभणी ३१, परभणी ग्रामीण ३०, पेडगाव ३२, जांब २१, पिंगळी ३६, सिंगणापूर ४०, दैठणा ३५, झरी ४३, बोरी २८, जिंतूर ३२, चारठाणा २७, बामणी ३८, सावंगी म्हाळसा ५०, आडगाव ३०, सेलू २५, देऊळगाव ३५, कुपटा २७, वालूर २७, चिकलठाणा २९, मानवत ३३, केकरजवळा १८, कोल्हा ३३, पाथरी २९, बाभळगाव १०, हादगाव ४, सोनपेठ २२, आवलगाव २२, गंगाखेड ३७, राणीसावरगाव १८, माखणी २६, महातपुरी ४०, पालम ४८, चाटोरी २३, बनवस १८, पूर्णा ५८, ताडकळस ५५, चुडावा १, लिमला २९,कात्नेश्वर ३४.
हिंगोली जिल्हा हिंगोली ५५, खंबाळा ४८, माळहिवरा ५५,सिरसम ५९, बासंबा २६, नरसी नामदेव २९, डिग्रस ५६, कळमनुरी ९२, नांदापूर ७८, आखाडा बाळापूर ६६, डोंगरकडा ६१, वारंगा फाटा ५६, वाकोडी ७५, वसमत ४१, हट्टा ६२, गिरगाव ३८, कुरुंदा ५८, टेंभुर्णी ४३, आंबा ६०, हयातनगर ५०, औंढा नागनाथ ६२, जवळा बाजार ४७, येळेगाव ६०, साळणा ४५, सेनगाव ४२, गोरेगाव ५२, आजेगाव ८०, पानकनेरगाव ४८, हत्ता ४४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com