agriculture news in marathi, Heavy Rain in Nanded, Parbhani, Hingoli District | Page 2 ||| Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत धुवाधार पाऊस
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 जून 2018

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सोमवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये २५ तालुक्यांमध्ये मृग नक्षत्रात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील २१ मंडलामध्ये तर परभणी जिल्ह्यातील ३ मंडलामध्ये अतिवृष्टी झाली असल्याने नांदेड जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला.

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सोमवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये २५ तालुक्यांमध्ये मृग नक्षत्रात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील २१ मंडलामध्ये तर परभणी जिल्ह्यातील ३ मंडलामध्ये अतिवृष्टी झाली असल्याने नांदेड जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला.

नांदेड, मुदखेड, भोकर, उमरी, धर्माबाद, नायगांव, कंधार तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. नांदेड तालुक्यातील ८ पैकी ७ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. यामध्ये नांदेड (९० मिमी.), नांदेड ग्रामीण (७३मिमी.), वजीराबाद (९५ मिमी), वसरणी (६५ मिमी), तरोडा (९० मिमी), लिंबगांव (६९ मिमी), विष्णुपूरी (७३ मिमी). अन्य मंडलांमध्ये मुदखेड (८० मिमी), मुगट (९० मिमी), बारड (७८ मिमी), नायगांव (७३ मिमी), उमरी (७६ मिमी), सिंदी (७१ मिमी),धर्माबाद (६७ मिमी), कापसी (८०), शेवडी (७१), भोकर (८७ मिमी),  किनी (१०४ मिमी), मोघाळी (९५मिमी), मातुल (८५मिमी), उस्मानगर (८० मिमी).

परभणी जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांतील ३९ मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. मानवत (७५ मिमी), देऊळगांव (७० मिमी), ताडकळस (८१मिमी) या तीन मंडलामध्ये अतिवृष्टी झाली. हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी २५ मंडलामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तीन जिल्ह्यांमध्ये लागवड सुरू असलेल्या कपाशीच्या उगवणीसाठी हा पाऊस फायदेशीर ठरत असला तरी मुसळधार पावसामुळे ओढे, नाल्यांना आलेल्या पुरांमुळे जमीन खरडून जात आहे. त्यासोबत पेरणी केलेले बियाणे वाहून जात आहे. तसेच गाळामुळे जमिनीत खोल गाडल्या जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सतत पाऊस सुरू असल्यामुळे जमीन वापसावर आलेली नाही. त्यामुळे पेरणी सुरू करता येत नसल्याचे चित्र अनेक भागांत दिसत आहे. ओढे, नाल्यांना आलेल्या पुरामुळे छोटे पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क काही काळ तुटला होता.

मंडलनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः नांदेड जिल्हा ः नांदेड ९०, नांदेड ग्रामीण ७३, वजीराबाद ९५, वसरणी ६५, तरोडा ९०, तुप्पा ५०, लिंबगांव ६९, विष्णुपूरी ७३, अर्धापूर ६२, दाभड ५९, मालेगांव ५५, हदगांव २३, तामसा ५३, मनाठा २६, पिंपरखेड २०, निवघा ४०, तळणी ३८, आष्टी ३७, हिमायतनगर ४०, जवळगांव ३२,  माहूर २५, वाई ३७, वानोळा ३५, सिंदखेड १५, भोकर ६७, किनी १०४, मोघाली ९५, मातुल ८५ नायगांव ७४, नरसी ४७, बरबडा ४२, कुंटूर ४५, मुदखेड ८०, मुगट ९०, बारड ७८, उमरी ७६, सिंदी ७१,  देगलूर १३, खानापूर १४, शहापूर ४०, मुखेड २५, येवती २०, जहूर २४, चांडोला  २५, मुक्रमाबाद १६, बाऱ्हाळी १८, धर्माबाद ६७, करखेली ५४, जारिकोट ५०, लोहा ४६, कलंबर ६४, शेवडी ७१, सोनखेड ५८, कापसी ८०, बिलोली ४०, लोहगांव ६०, कुंडलवाडी ४५,सगरोळी ३२, आदमापूर ५४, इस्लापूर २२, बोधनी ३६, दहेली २१, जलधारा २२, शिवणी ३५, कंधार ४०, उस्माननगर ८०, फुलवळ ३०, पेठवडज ३९, बारुळ ५५.परभणी जिल्हा ः परभणी शहर २७, परभणी ग्रामीण ३१, सिंगणापूर ५०, दैठणा १९, झरी २०, पेडगांव २५, पिंगळी २९, जांब २५, बनवस १५, पूर्णा ४२, ताडकळस ८१, चुडावा ६३, लिमला ४६, कात्नेश्वर २६, सोनपेठ ३०, आवलगांव २२, सेलू ३९, देऊळगांव ७०, चिकलठाणा २३, पाथरी ४०, जिंतूर १६, सावंगी म्हाळसा ५५, आडगांव १८, बामणी ५४, मानवत ७५, केकरजवळा ४७, कोल्हा ३५.हिंगोली जिल्हा ः हिंगोली १७, डोंगरकडा २६, वारंगा फाटा २३, हत्ता १७, वसमत ३९, हट्टा ४८, गिरगाव ३९, कुरुंदा १५, टेंभूर्णी २१, आंबा ३५, हयातनगर ५८, जवळा बाजार ४६, साळणा ४०.

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...