उत्तर कोकणला झोडपले

पाऊस
पाऊस

पुणे: उत्तर कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसह मुंबई उपनगराला सोमवारी (ता. १) पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. जिल्ह्यातील तलासरी येथे सर्वाधिक ३६५ मिलिमीटर पाऊस पडला, तर सहा ठिकाणी ३०० पेक्षा अधिक पाऊस झाल्याचे कृषी विभागाने सांगितले. तर, दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गसह उर्वरित राज्यात मात्र पावसाचा जोर ओसरला होता. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, पुणे, सातारा, नाशिक जिल्ह्यांत मध्यम, मराठवाड्यात हलका पाऊस झाला; तर नागपूर, भंडारासह पूर्व विदर्भात पावसाला सुरवात झाली होती.  सिंधुदुर्ग : गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेली संततधार थांबली आहे. सोमवारी सकाळपासून ऊन-पावसाचा खेळ सुरू असून, पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत आहेत. पावसाने उसंत दिल्यामुळे पाणथळीच्या जमिनी नांगरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.  रत्नागिरी : सलग तीन दिवस धो-धो कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी (ता. १) पूर्ण विश्रांती घेतली. त्यामुळे लावण्यांच्या कामाला वेग आला आहे.  पुणे : जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी असलेला पावसाचा जोर सोमवारी ओसरला होता. मावळ, मुळशी, वेल्हा आणि भोर तालुक्याच्या काही भागांत तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या. उर्वरित तालुक्यांत पावसाने उघडीप दिली. नगर : अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी पट्ट्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला पाऊस सोमवारी काहीसा कमी झाला. जिल्ह्याच्या अन्य भागांत मात्र अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा असून, दोन दिवसांपासून पावसाची केवळ रिपरिप सुरू आहे.  सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, सर्वच तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर सोमवारी (ता. १) ओसरला. शहरासह व पूर्व भागातील अनेक तालुक्‍यांत तुरळक सरी वगळता ढगाळ हवामान, ऊन-सावल्यांचाच खेळ सुरू होता. जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील धरण क्षेत्रात पावसाची भुरभूर कायम होती.  सांगली : जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर आणि जत तालुक्यात पावसाची रिमझिम होती. उर्वरित जिल्‍ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून, सकाळपासून थांबून थांबून पाऊस पडत होता.  नाशिक : नाशिक जिल्ह्यात अनेक भागांत दमदार पावसाची सुरवात झाली असून, पेरण्यांना हळूहळू वेग येऊ लागला आहे. येवला, निफाड, नांदगाव, चांदवड, देवळा, सिन्नर, इगतपुरी व त्रंबकेश्वर तालुक्यांतील अनेक भागांत पावसाचे आगमन झाले. अजूनही अनेक भागांत पावसाची प्रतीक्षा आहे.  नांदेड : नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतील १० तालुक्यांत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात मात्र बहुतांश भागात उघडीप होती. या तीन जिल्ह्यांतील बहुतांश भागात अद्याप मोठा पाऊस झाला नसल्याची स्थिती आहे. नागपूर : पूर्व विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून, पेरण्यांना देखील वेग आला आहे. सोमवारी (ता. १) नागपूर शहर व परिसरात ७५ मि.मि. पावसाची नोंद करण्यात आली.  अकोला : मागील २४ तासांत वऱ्हाडात पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी पेरणीचे काम जोमाने सुरू केले आहे. गेल्या आठवड्यात बुलडाणा जिल्हा, अकोल्यातील सातपुड्याला लागून असलेले तेल्हारा, अकोट हे तालुके पावसाने झोडपून काढले. वऱ्हाडातील प्रमुख नदी असलेल्या पूर्णेलाही पूर आला.  सोमवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : कृषी विभाग)      कोकण- ठाणे : बेलापूर १६८, भिवंडी १७०, अंगाव २१३, डिघशी १९६, पडघा १६०. रायगड : रामरज १५२, पनवेल २२०, कर्नाळा १५७, तलोजे १७०, जसई १६५, कसू २०६, नागोठणे १५५. रत्नागिरी : आबलोली ४६, मंडणगड ४२, देवळे ४८, सौंदळ ५५, कोंडये ४७, ओणी ४६, पाचल ४९, लांजा ५१, भांबेड ४७, विलवडे ६२. सिंधुदुर्ग : शिरगाव ६४, पाटगाव ५७, बापर्डे ७१, कणकवली ७१, सांगवे ९१, नांदगाव ७८, कुडाळ १०९. पालघर : विरार २२४, कांचड २७६, डहाणू ३१३, मालयण ३५०, साइवन २७४, कसा २८९, चिंचणी २०१, पालघर २९८, मनवर ३०४, बोईसर २३३, सफला ३०५, अगरवाडी ३३६, तारापूर २०६, तलसरी ३६५, झरी २७७, विक्रमगड २१०, तलवड २६५. मध्य महाराष्ट्र -  नाशिक : इगतपुरी ५८, घोटी ३५, धारगाव ३७, चांडोरी ३३, वेळुंजे ९०, हर्सूल ५६. धुळे : विखरण ४२, नंदुरबार : तोरणमाळ ३६, पाळधी ३१. नगर : जामखेड २०, शेंडी २४, ब्राह्मणवाडा २३. पुणे : पौड २५, माले ५०, मुठे ५६, नसरापूर २५, आंबवडे ३६, काले २५, कार्ला ४०, लोणावळा ३८, वेल्हा ४४, पाणशेत ४६, विंझर ४५, अंभवणे २५.सातारा : परळी २९, हेळवाक ५७, मोरगिरी २९, धोम २०, महाबळेश्‍वर ८६, पाचगणी ३३. कोल्हापूर : कळे ३६.५, कोतोली ३४, करंजफेन ५०, मलकापूर ३५, आंबा ५९, राधानगरी ४७, सरवडे ५२, कसबा ४७, आवळी ४२, कसबा ३२, शिरोली-दुमाला ४८, कसबा बीड ४२, बिद्री ३५, महागाव ३८, नेसरी ५९, गारगोटी ५३, पिंपळगाव ४०, कूर ३३, कराडवाडी ५३, गवसे ७२, मडिलगे ५१, उत्तूर ३४, चंदगड ६८, नारंगवाडी ६१, माणगाव ९२, कोवाड ५४, तुर्केवाडी ६०, हेरे ७४. विदर्भ : अमरावती : नांदगाव ३४, धानोरा ३१, वरूड ३९, शेंदुर्जना ४१, लोणी ३०, पुसाळा ४२, भेंडा ३३, वाठोदा ४०, राजूरा ४२, चिंचोली ३२, मंगरूळ ३७. यवतमाळ : बाभुळगाव २३, घारफळ ३२, कळंब २८, मेटिखेडा २१, मांगकिन्ही २२, लोही २०, शिरजगाव २५, मोझर २८, मालखेड २७, मार्डी २१, झाडगाव २२, वडकी २१, वरध २१. वर्धा : आर्वी ४६, वाढोणा ४६, खारंगणा ४६, विरूळ ४१, रोहणा ४९, सारवडी ४३, कन्नमवरग्राम ४६, ठाणेगाव ४६, वर्धा ४४, सेलू ४४.८, हिंगणी ४३, झाडसी ५०, केळझर ४७, कानदगाव ४५, गिरड ५२, वायगाव ५२, खांढळी ४६, मंडगाव ४२. नागपूर : खापरी ९५, हुडकेश्‍वर ७०, गुमगाव ८६, खाट ७४, धानळा ७३, चाचेर ७९, काटोल ७७, येनवा ११३, परडसिंगा ७२, मेंधळा ७१, धापेवडा ७२, मंधाळ ८७, पाचखेडी ८७, वेलतूर ८५, राजोली ८७. भंडारा : शहापूर ६६, भंडारा ९०, खामारी ६०, मोहाडी ६६, केरडी ७०, आंधळगाव ६८, साकेली ६१. गोंदिया : चिंचगड ३९, महागाव ३१, केशोरी ३१, सौदाद ३२.चंद्रपूर : माधेली ५८, चिमूर ५४, खडसंगी ५५, भिसी ८२, शंकरपूर ५६, नेरी ५९, गांभूळघाट ६०, मासाळ ५२, बह्मपुरी ३८, चौगण ५२. गडचिरोली : कुंघाडा ४५, एटापल्ली ४९. राज्यात आज जोर वाढणार बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पूरक ठरल्याने दोन दिवस राज्यात पाऊस जोर धरणार आहे. आज (ता. २) विदर्भ, कोकणात अतिजोरदार, तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दक्षिण गुजरात आणि मध्य प्रदेशात पोचलेल्या मॉन्सूनने दोन दिवसांपासून प्रगती केलेली नाही.  ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेली ठिकाणे :    तलासरी ३६५, मालयण ३५०, अगरवाडी ३३६, डहाणू ३१३, सफला ३०५, मनवर ३०४ (सर्व पालघर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com