Agriculture News in Marathi Heavy rain Osarla in Pune | Agrowon

पावसाचा जोर  पुण्यात ओसरला 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 सप्टेंबर 2021

पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने जिल्ह्यात जोर ओसरला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या हलक्या स्वरूपाच्या सरी बरसत आहेत.

पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने जिल्ह्यात जोर ओसरला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या हलक्या स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. पूर्व भागात पावसाने चांगलीच उघडीप दिली असून, काही अंशी ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. अधूनमधून ऊन पडत असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. 

गेल्या आठ ते दहा दिवस जिल्ह्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस झाला. मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांत पावसाचा अधिक होता. त्यामुळे भात खाचरे भरून वाहत असल्याने धरणातील पाणीपातळीत वाढ झाली. आतापर्यंत जवळपास १७ ते १८ धरणे शंभर टक्के भरली आहेत. उर्वरित धरणेही लवकरच भरण्याची शक्यता आहे. जी धरणे भरली आहेत, अशा धरणांतून पाण्याचा विसर्स सोडण्यात आला आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत असल्याने पूर्व भागातील धरणातील पाणीपातळीत वाढ होत आहे. 

बुधवारी (ता.१५) सकाळी आठ वाजेपर्यंत नीरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ४१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २२ मिलिमीटर, मुळशी १६, वरसगाव, पानशेत १३ मिलिमीटर पाऊस पडला. तर पिंपळगाव जोगे, माणिकडोह, डिंभे, कळमोडी, चासकमान, वडीवळे, पवना, कासारसाई, खडकवासला, गुंजवणी, भाटघर, वीर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा शिडकावा झाला, तर येडगाव, वडज, घोड, विसापूर, भामा आसखेड, आंध्रा, नाझरे, उजनी, चिल्हेवाडी या धरणक्षेत्रांत पावसाने उसंत दिल्याची स्थिती होती.

आतापर्यत झालेल्या पावसामुळे पिकांना चांगलाच दिलासा मिळाला असून, पिके चांगलीच तरारली आहेत. पूर्व भागात सोयाबीन, बाजरी पिकांची काढणी सुरू असून, काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेत आहेत.

खडकवासल्याच्या आवर्तनाने 
इंदापुरातील शेतकऱ्यांना दिलासा 

इंदापूर तालुक्यातील शेतीच्या सिंचनासाठी खडकवासला कालव्याद्वारे आवर्तन सोडण्यात आले आहे. सध्या पावसाअभावी विहिरी व कूपनलिका यांचे पाणी कमी पडल्याने शेतकऱ्यांना उसासारख्या पिकांना पाणी देण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे गरजेच्या वेळी आवर्तन आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

पावसाळ्याचे चार महिने संपत आले तरी अद्याप इंदापूर तालुक्यात या कालव्याच्या लाभक्षेत्रात दमदार पाऊस अद्यापही झाला नाही. त्यामुळे सिंचनाची सर्व भिस्त खडकवासला कालव्याच्या पाण्यावर सध्या अवलंबून आहे. त्यामुळे खडकवासला कालव्याला आवर्तन सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती.

खडकवासला धरणाच्या पाणलोटात झालेल्या चांगल्या पावसामुळे प्रकल्पात सध्या शंभर टक्के पाणी साठा झाला आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग मागील शनिवारपासून सुरू केला होता. 


इतर बातम्या
संत्रा छाटणी यंत्र ‘पंदेकृवि’त दाखलअकोला : दिवसेंदिवस या भागात संत्र्याची लागवड वाढत...
‘टॅगिंग’ कपात उपक्रमाच्या यादीत ५३ साखर...पुणे ः थकीत देणी वसूल करण्यासाठी राज्य सरकारने...
शेळीमध्ये टेस्ट ट्यूब बेबीची निर्मितीअकोला ः महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ...
शेतीसाठी दिवसा बारा तास विद्युतपुरवठा...नागूपर : शेतकऱ्यांचे धानाचे पीक गर्भात आहे, ते...
द्राक्ष विमा परताव्यासाठी चकरा...नाशिक : मार्च २०२१ अखेरीस संपलेला द्राक्ष...
मॉन्सूनोत्तर पावसाचा पिकांना दणकापुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
देशातील सोयाबीनची केवळ २७ टक्के काढणीपुणे : खरीप हंगाम २०२१-२२मध्ये सोयाबीनची लागवड...
भातपीक कापणीला  सिंधुदुर्गमध्ये सुरुवात सिंधुदुर्गनगरी : सतत पडणाऱ्या पावसामुळे रखडलेल्या...
‘एफआरपी’ ८०-२०च्या सूत्रानुसार  दिल्यास...माळेगाव, जि. पुणे : ‘‘केंद्र व राज्य सरकारने यंदा...
`दत्त’ देणार एकरकमी  ‘एफआरपी’ २९२०...कोल्हापूर : शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी...
  ‘महाबीज’च्या बीजोत्पादन ...परभणी : ‘महाबीज’च्या परभणी विभागातील सहा...
सोयाबीनच्या गंज्या वाहून गेल्या हिंगोली : मराठवाड्यामध्ये रविवारी (ता.१७) सकाळी...
सांगली जिल्हा बँक निवडणूक  जयंतराव...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा धमाका...
मानोरा तालुक्यात धुवाधार  पावसाने...मानोरा, जि. वाशीम : शनिवारी (ता. १६) झालेल्या...
विदर्भातील पाच जिल्ह्यांत  लाख हेक्‍...अमरावती : खरीप गमावलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता...
विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
  ‘डीएपी’ महागणार नाही पुणे : रब्बी हंगामात देशातील खत उत्पादक...
दसऱ्याच्या मुहूर्तावर  आगाप खरीप कांदा...नाशिक : जिल्ह्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर आगाप खरीप...
हे हिंदुत्व नाही, हा नामर्दपणा मुंबई : ‘‘ईडी, सीबीआयच्या माध्यामातून कारवाया करू...
पामतेलातील तेजीने खाद्यतेल दरवाढीला...पुणे : देशात खाद्यतेलाचे दर कमी न होण्यामागे...