पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपले

पाऊस
पाऊस

पुणे : उत्तर कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसह मुंबई उपनगरात तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पालघर जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. अनेक ठिकाणी ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील अगरवाडी येथे सर्वाधिक ३९१ मिलिमीटर पाऊस पडल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. कोकणसह घाटमाथ्यावरही अनेक ठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरी पडल्या. उत्तर कोकणात दमदार बरसणाऱ्या पावसाचा जोर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमी दिसून आला. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्चिम भागात आणि घाटमाथ्यावरही पावसाच्या सरीमागून सरी कोसळत होत्या. या जिल्ह्यांसह उर्वरित जिल्ह्याच्या पूर्व भागात मात्र पावसाचा जोर कमी होता. मराठवाडा, वऱ्हाडात तुरळक ठिकाणी; तर पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडला.  मंगळवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये (स्रोत : कृषी विभाग)      कोकण : ठाणे : ठाणे २५२, बलकुम २०१, भार्इंदर १९४, मुंब्रा १७९, बेलापूर १६३, ठाकुरली १३८, अंगाव १३१, डिघशी १३१. रायगड : चरी १६७, पनवेल २०७, ओवले १९४, कर्नाळा १४९, तलोजे २०८, मोराबी १७०, खालापूर चौक २१२, वौशी १९४, खोपोली १८८, पेण १५४, हमरापूर १९५, वशी १८७, कसू २२७, कामरली १५३, गोरेगाव १५४, म्हसला १६३, तला २४५, मेंढा १५५. रत्नागिरी : कळकवणे ११५, शिरगाव १३७, वाकवली १०६, पालगड ११७, खेड १५०, मंडणगड १७५, देव्हारे १४५. पालघर : वसई ३२१, अगशी ३४७, निर्मल ३४१, विरार ३३१, मनोर १८७, अगरवाडी ३९१, तारापूर ३३०. मध्य महाराष्ट्र : नाशिक : देवळाली ७९, पाथर्डी १०१, पेठ ११५, जागमोडी ७२, चांडोरी १४२, हर्सूल १०१. जळगाव : खिर्डी ३९, ऐनपूर ५४, मुक्ताईनगर ७९, अंतुर्ली ३५, कुऱ्हा ४४, बोदवड ३४, नांदगाव ४८. नगर : जेऊर ७१, आश्‍वी ५३, शिबलापूर ५१, विरगाव ४३, ब्राह्मणवाडा ९०, पोहेगाव ७३, लोणी ४५. पुणे : पौड ७८, घोटावडे ५०, माले ७६, मुठे ६८, पिरंगूट ६१, भोलावडे ७०, नसरापूर ६५, निगुडघर ९४, तळेगाव ५८, काले ७६, कार्ला १२१, खडकाळा ८०, लोणावळा १२०, शिवणे ५५, वेल्हा १४१, पानशेत ५३, विंझर ७८, अंभवणे ५२, कुडे ५७, आंबेगाव ५३. सोलापूर : विंचूर ३३. सातारा : परळी ४९, बामणोली ६१, पाटण ६०, हेळवाक ९९, मरळी ४८, मोरगिरी १०७, ढेबेवाडी ४४, तळमावले ४७, कुठरे ५९, पसरणी ४४, महाबळेश्‍वर १४८, पाचगणी ४१, तापोळा ५८, लामज ७५.सांगली : कोकरुड ३९, सागाव ४५, चरण ४९. कोल्हापूर : कळे ४१, बाजार ४७, कोतोली ७१, बांबवडे ४३, करंजफेन १०७, मलकापूर ६८, आंबा १४०, साळवण ५५. विदर्भ :  यवतमाळ : राजूर ३२, पुनवट ३०, शिंदोळा ३८, कायार ३०, शिरपूर ३९, मारेगाव ४१, मार्डी ३४, कुंभा ३१, वानोजा ३७, मुकुटबन ४६, वडकी ३७, किन्ही ३७. वर्धा : सावळी ३३, समुद्रपूर ३८, जाम ३४, गिरड ३५, निंदोरी ५१, वायगाव ४५, खांढळी ३९. नागपूर : खापरी ४६, दिघोरी ५०, गुमगाव ३६, नागरधन ३६, मौदा ५१, खाट ५५, धानळा ४७, चाचेर ४२, उमरेड ४७, मकरधोकडा ४८, शिर्सी ४१, हेवंती ४८, पाचगाव ६१, मळेवाडा ५१, नंद ५१, भिवापूर ५२, कारेगाव ४९, मंधाळ ४९, पाचखेडी ४५, वेलतूर ४६, राजोली ४८, तितूर ६८. भंडारा : मोहाडी ४८, केरडी ४०, कान्हाळगाव ४४, नाकडोंगरी ४२, मिटेवणी ५०, गाऱ्हा ४६, कोंढा ४७, पवनी ४५, असगाव ४९, आमगाव ५२, साकोली ४४, विरळी ४५, लाखंदुर ५९. गोंदिया : गंगाझारी ५०, रावणवाडी ५५, गोंदिया ८९, खामरी ५४, कामठा ७९, गोरेगाव ६६, कुऱ्हाडी ६५, मोहाडी ६२, महागाव ६५, दारव्हा ६९, सडक अर्जुनी ७३. चंद्रपूर : माधेली ७५, चिकनी ७७, भद्रावती ६३, धोडपेठ ६१, मेंडकी ५९. गडचिरोली : अरमोरी ४६, देऊळगाव ५७.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com